लहान मुलं व्यवस्थित खात नाही, काय करावे?

आपलं लहान मुलं जेव्हा 2 ते 5 वर्षा दरम्यानचे असते तेव्हा प्रत्येक आईला एकच चिंता असतें, ती म्हणजे,


  • माझं लहान मुलं व्यवस्थित कस जेवण करेल?
  • त्याच वजन कस वाढेल?
  • ते कस छान गुटगुटीत होईल?


यासाठी काय उपाय करावेत 


how to do

सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, की प्रत्येक लहान मुलं हे वेगवेगळे असतें. शेजारचे मुलं जेवण एकदम व्यवस्थित करते याचा अर्थ असा नाही की तुमच्याही मुलाने तसंच करायला हवं. तुमचही लहान मुलं जेवण व्यवस्थित करेल पण थोडा वेळ लागेल.
भूक लागण्याचे प्रमाण प्रत्येकामध्ये कमी जास्त असतें. एखाद्या मुलाचा आहार खूप असतो, एखाद्या मुलाचा कमी असतो. खेळण्याच्या बाबतीत एखाद लहान मुलं खूप energetic असतें. एखाद मुलं त्यामानाने कमी खेळते.
तरीही काही पालकांचा हट्टाहास असतो की माझ्या मुलाने व्यवस्थित खाल्लेच पाहिजे.

चला मग यावर काही उपाय शोधू.


1) मुलांची आवड ओळखा.


मुलांसाठी जेव्हा तुम्ही जेवण तयार करता तेव्हा मुलांना काय खायला जास्त आवडते ते बघा. मुलं जर 1 ते 2 वर्षाच्या दरम्यान असेल तर आपण जास्त करुन त्यांना पातळ पदार्थ देतो. आता यातही काही मुलांना ते पदार्थ मिक्सर मधून बारीक करुन खायची सवय असतें.
काही लहान मुलं वरणभात खूप आवडीने खातात.
काही मुलं गोड पदार्थ आवडीने खातात, तर काही मुलांना गोड अजिबात आवडत नाही. तरीही काही पालक त्यांना ते गोड पदार्थ जबरदस्तीने खायला घालतात, परिणामी मुलं उलटी करुन ते बाहेर काढते.

तर आता करायचं काय,

मुलांना जे आवडत तेच खायला द्या. जे पदार्थ मुलांना आवडत नाहीत पण तुमचा हट्टाहास आहे की पोषण देणारे पदार्थ माझ्या मुलाने खायला हवेत तर असे पदार्थ मुलांना हळूहळू थोड्या प्रमाणात द्यायला सुरुवात करा.

सुरुवातीला ते खाणार नाही पण एकदा चव आवडली की न खाणारे पदार्थ सुद्धा तुमचे लहान मुलं खायला लागेल.


हेही वाचा...... लहान मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करावा?


 2) तुमचे लहान मुलं 3 ते 4 वर्षाचे आहे आणि ते पोळी -भाजी खात नाही, तर काय करावे?how to do


बऱ्याच पालकांची तक्रार असतें की माझे मुलं पोळी भाजी खात. त्याला फक्त भात खायची सवय आहे.
3 ते 4 वर्षाचे मुलं शाळेत जाते. आई घरून टिफिन मध्ये पोळी भाजी देते आणि मुलं ती पोळी खातच नाही. टिफिन आहे असा घरी माघारी येतो.
मग पालकांना टेन्शन येते आता काय करावे?

  • टिफिन तयार करताना मुलांना विचारा की, " आज तुला टिफिन मध्ये भाजी कोणती हवी आहे. त्यामुळे तुम्हालाही कळेल की तुमच्या मुलाला कोणती भाजी आवडते.

  • भाजी तयार करताना मुलांना ती भाजी दाखवा. बऱ्याच वेळेला आपण मुलांच्या नकळत टिफिन भरतो. मुलांना माहितही नसते की टिफिन मध्ये काय दिले आहे. त्यामुळे भाजी करताना मुलांना सोबत घ्या. गॅस पासून थोडंसं लांब बसावा आणि त्यांच्या समोर भाजी तयार करुन टिफिन मध्ये भरा. त्यामुळे मुलं ती भाजी आवडीने खातील.

  • मुलांसाठी पोळी / चपाती तयार करताना त्यांनाही बरोबर घ्या. एक छोटीशी चपाती त्यांनाही लाटू द्या. अशाने मुलांना जेवणामध्ये आवड निर्माण होईल.

  • आपण पोळी भाजी खाल्यानंतर त्यातून आपल्या शरीराला काय मिळते. हे वारंवार मुलांना सांगा. त्यामुळे मुलांनाही कळेल की आपण जर रोज जेवणामध्ये पोळी भाजी खाल्ली तर आपण कसे स्ट्रॉंग होऊ, लवकर मोठे होऊ. त्यासाठी तुमच्या स्वतःचे उदाहरणं द्या, की बघ "मी पोळी भाजी खाते म्हणून मी कशी स्ट्रॉंग आहे."तू पण माझ्यासारखा स्ट्रॉंग होशील."

  • बऱ्याच मुलांनी अडीच ते तीन वर्षापर्यंत पातळ पदार्थ खाल्लेले असतात.त्यामुळे माझ्या मुलाने एक चपाती खाल्लीच पाहिजे हा हट्टाहास करु नका. मुलांच्या कलाने घ्या. सुरुवातीला ते चतकोर चपाती खाईल, नंतर अर्धी आणि हळूहळू त्याला आवड निर्माण होईल.

3) 3 ते 4 वर्षाचे मुलं स्वतःच्या हाताने खात नाही तर काय करावे?how to do


पालकांचा आग्रह असतो मी माझं मुलं आता 4 वर्षाचे आहे, तर त्याने स्वतःच्या हाताने जेवण करावे.
आता काही मुलं अशी आहेत की जी स्वतःच्या हाताने जेवण करतात. त्यात जर नातेवाईकामध्ये एखादे मुलं असे असेल की जे स्वतःच्या हाताने व्यवस्थित जेवण करते तर लगेच आपल्या मुलांकडूनही आपली अपेक्षा वाढते, की माझ्या ही मुलाने स्वतःच्या हाताने खावे.


तर यासाठी काय करावे?

  • तुम्ही मुलांना 3 वर्ष स्वतःच्या हाताने पाठीमागे पळून खायला घातलेले असतें. त्यामुळे मुलांना त्या रुटीन ची सवय लागलेली असतें. तुम्ही जर मुलांना एकदम जेवण भरवणे सोडले तर मुलं उपाशी राहतील, काहीच खाणार नाहीत. मुलांनी स्वतःच्या हाताने खावं अस वाटत असेल तर सुरुवात ड्राय पदार्थ पासून करा जस की चिवडा, शंकरपाळी, फ्रुट मध्ये केळी, सफरचंद. सुरुवातीला ते थोडंसं खातील पण हळूहळू सवय लागेल.

  • भात - एका छोट्याश्या डिश मध्ये थोडासा भात द्या. सुरुवातीला तुम्ही चमच्या मध्ये घास ठेवा आणि तो चमचा मुलांना उचलून घास खायला लावा. हळूहळू मुलं चमच्याने स्वतः खायला शिकतील.

  • तुम्ही जेव्हा जेवायला बसता तेव्हाच मुलांनाही तुमच्या सोबत जेवायला घ्या. काही पालकांना सवय असतें की पहिल्यांदा मुलांना चारायचं आणि मग स्वतः जेवायला बसायच. तर तस न करता तुमच्या शेजारी मुलांना जेवायला बसावा. भले त्यांनी चार घास स्वतःच्या हाताने खाऊ द्या. पण त्यांना तुमच्याबरोबर योग्य वेळी जेवायची सवय लागेल.


4) आपल्याला भूक लागली आहे हे मुलांना समजू द्या, आणि त्यांनी स्वतः तुमच्याकडे खायला मागू द्या.


आपण काय करतो की मुलांना सतत काहीतरी खाण्यासाठी पाठीमागे लागतो.त्यामुळे भूक हा प्रकार मुलांच्या लक्षातच येत नाही.
सकाळी उठल्यावर त्यांना स्वतःला सांगू द्या, की मला भूक लागली आहे, खायला दे.
दुपारी जेवायला त्यांना स्वतःला मागू द्या. मुलं जेव्हा म्हणतील की मला काहीतरी खायला दे, तेव्हा समजायचं की मुलांना भूक लागली आहे.
मुलांच एक रुटीन ठेवा. सकाळी भूक लागली की नाष्टा, दुपारी जेवण,4 ते 5 च्या दरम्यान एखादे फळ किंवा दूध, रात्री जेवण आणि झोपताना दूध. पण हे सगळं रुटीन मुलांनी follow केलंच पाहिजे हा हट्टाहास नका धरू. त्यांच्या पद्धतीने त्यांना हळूहळू सवय लावा.


कोणत्याही बाबतीत मुलांना प्रेशरीज करु नका आणि इतर मुलांबरोबर तुलनाही करु नका. तुमचं लहान मुलं इतर मुलांपेक्षा वेगळं आहे ते त्याच्या पद्धतीने वाढणार आहे. हे लक्षात घ्या.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या