लहान मुलांचा स्क्रीन टाईम ( मोबाईल आणि टीव्ही ) कसा कमी करावा? how to do

 आजकाल आपण बघतो प्रत्येक लहान मुलाच्या हातात मोबाईल हा दिसतोच. You tube वरती वेगवेगळे song, cartoon बघणं मुलांना खूप आवडत असत.

काही लहान मुलं तर मोबाईल बघितल्याशिवाय जेवणही करायला तयार नसतात, मग काय आई मोबाईल वरती cocomelon लावून देते आणि मग मुलं छान एका जागेवर बसून जेवण करतात.


पण आपल्या मुलांना ही मोबाईल आणि टीव्ही ची लागलेली सवय कशी सोडवायची याचा विचार केला आहे का? how to do

चला मग यावर काही उपाय शोधू.

1) मुलांना सांगण्याआधी आपला मोबाईल स्वतःपासून लांब ठेवा

म्हणजे बघा ना आपण मुलांना सांगत असतो की मोबाईल बघू नको, त्यामुळे आपले डोळे खराब होतात. चष्मा लागतो आणि हे सांगत असताना आपल्याच हातात मोबाईल असतो. एक लक्षात घ्या मुलं घरामध्ये त्यांच्या पालकांच्या ज्या सवयी बघतात तेच शिकतात आणि तसंच अनुकरण करतात.

त्यामुळे पालकांनी आधी त्यांचा स्क्रिन टाईम कमी करायला हवा, म्हणजे लहान मुलं सुद्धा आपोआपच मोबाईल पासून लांब राहतील.

2) वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये मुलांना गुंतवून ठेवणे.

यासाठी जास्त वेगळं काहीच करण्याची गरज नाही. तुम्ही जेव्हा बाजारातून भाजी आणता त्यामध्ये बटाटे असतील कांदे असतील मुलांना ते वेगवेगळे करायला सांगा. कपड्यांच्या घड्या घालत असताना त्यांनाही बरोबर घ्या. छोटे छोटे रुमाल फोल्ड करायला द्या. खेळायला काढलेली खेळणी त्यांनाच आवरून ठेवायला सांगा. डब्यांची झाकण लावायला द्या.

अशा छोट्या छोट्या ट्रिक वापरून आपल्या घरात जे काही उपलब्ध आहे त्यात आपण मुलांना खूप वेळ  गुंतवून ठेऊ शकतो.


3) सतत घरामध्ये मुलांना ठेऊ नका.

आपण बघतो की काही पालक माझं लहान मुलं आहे म्हणून त्यांना जास्त बाहेर खेळायला पाठवत नाही. तर अस करु नका. लहान मुलं त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर जेवढी खेळतात तेवढी ती कोणाबरोबर खेळत नाहीत. घरातील कोणाला तरी त्यांच्या बरोबर पाठवून मुलांना बाहेर खेळायला जाऊ द्या. ते जेवढे खेळतील तेवढे जास्त ऍक्टिव्ह राहतील.

4) खेळण्यांची योग्य निवड,how to do

हल्ली मुलांकडे एवढी खेळणी आहेत की एक पूर्ण रूम त्यांच्या खेळण्यांनी भरलेली असतें. पण आपण कधी विचार केलाय का की लहान मुलं ही खेळणी सोडून मोबाईल टीव्ही कडे आकर्षित का होतात. खेळणी खूप आहेत पण मुलांना ती खेळावीशी वाटत नाहीत कारण खेळणी घेताना आपण विचार केलेला नसतो की या मध्ये माझं मुलं किती रमेल.

मुलांसाठी खेळणी घेताना यातून माझ्या मुलाची फिजिकल ऍक्टिव्हिटी किती होईल याचा विचार करुन खेळणी घ्या.

5) घरामध्ये आज्जी आजोबा असू द्या

आजकाल एकत्र कुटुंब पद्धती फारशी राहिली नाहीये. कामासाठी नवरा बायको दोघेच एकत्र राहतात आणि याचा परिणाम मुलांवरती होतो. लहान मुलं आज्जी आजोबांजवळ जेवढी रमतात ना तेवढी ती त्यांच्या आई बाबांजवळ पण रमत नाहीत. आज्जी आजोबा वेगवेगळ्या गोष्टी सांगतात, बाहेर फिरायला घेऊन जातात त्यामुळे मुलं हळूहळू मोबाईल पासून लांब राहायला लागतात.

कोणतीच सवय ही एकदम सुटत नाही त्यामुळे वरती दिलेले प्रयोग करत असताना मुलांचा मोबाईल टीव्ही एकदम बंद करु नका, असे केल्याने ते चिडचिड करतील. हळूहळू मोबाईल टाईम कमी करत जा. लहान मुलं दोन तास मोबाईल बघत असेल तर रोज त्यातली 15 मिनिट कमी करत जा म्हणजे लहान मुलं त्रास देणार नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या