बदलत्या वातावरणामुळे तुमचीही लहान मुलं आजारी पडतात का?

 मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण आजकाल खूप वाढल आहे. दर पंधरा दिवसाला मुलांना सर्दी, खोकला हा झालेला असतोच. अशात लहान मुलं खातपितही नाहीत, त्यामुळे आई लोकांना ते एक वेगळंच टेन्शन असत. मग आता या दरम्यान करायचं काय तो एक मोठा प्रश्न आहे?how to do

तर चला यावर थोडीशी चर्चा करु.

वय 2 ते 10 वर्ष 

1) मुलांना त्यांच्या कलाने घ्या.


मुलं आजारी असल्यास कुठल्याही गोष्टीला त्यांच्या पाठीमागे लागू नका. मुलांना खेळायचं असेल तर खेळू द्या, झोपायचं असेल तर झोपू द्या, त्यांना जेव्हा काही खायचं असेल तेव्हा खाऊ द्या. फक्त त्यांना पाणी भरपूर प्रमाणात देत राहा, म्हणजे एकच वेळेला ग्लास भरुन पाणी पिलं पाहिजे अस काही नाही. दर पंधरा मिनटाला दोन घोट पाणी दिल तरी चालेल याने मुलांना डिहायड्रेशन होणार नाही. पाण्यामध्ये तुम्ही त्यांना ग्लुकोज, किंवा थोडीशी साखर - मीठ टाकून दिल तरी चालेल. त्यामुळे मुलांना तरतरी येईल. त्यांना दर दोन तासांनी खिचडी भात, वरण भात, मुगाच्या डाळीचे सूप असा हलका आहार द्या. त्यांनी चार घास खाल्ले तरी बास झाले. त्यांना नेहमी प्रमाणे खाण्यासाठी फोर्स करु नका. त्यांच्या हिशोबाने त्यांना खाऊ द्या.

2) औषधाची एक्सपायरी डेट.


आता बऱ्याच घरात हे अस काहीस घडत आहे. आपल्या घरामध्ये आपण मुलांसाठी डॉक्टरांनी दिलेली सर्दी, ताप खोकल्याची औषध आणून ठेवत असतो. आता एखाद्या मुलाचा ताप जर दोन दिवसात राहिला तर राहिलेले औषध आपण तसेच ठेवतो आणि नंतर जेव्हा मुलांना ताप येतो तेव्हा तेच राहिलेले औषध आपण मुलांना देतो. पण ही पद्धत खुप चुकीची आहे.
तुम्ही कधीतरी निरीक्षण करा. जेव्हा आपण नवीन औषधाची बाटली आणून मुलांना त्यातलं औषध पाजतो तेव्हा मुलांना लगेच फरक पडतो. पण जेव्हा नंतर मुलं आजारी पडल्यावर आपण ते राहिलेले औषध पाजतो तेव्हा मुलांना फरक पडायला वेळ लागतो. त्यामुळे शक्यतो दोन महिन्यापूर्वी सील ओपन केलेल्या बाटलीतील औषध मुलांना देऊ नका. आता या पाठीमागे काय कारण आहे याबद्दल तुम्ही तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांना एकदा विचारून घ्या.

3) मुलांना खूप जाड कपडे घालू नका.


काही जणांना सवय असतें कि मुलं आजारी पडली कि आपण त्यांना टोपड, स्वेटर, हातमोजे, पायमोजे आणि आतून शर्ट - पॅन्ट हे सगळं घालून पॅक करुन टाकतो. शक्यतो हे टाळा. त्यांना फुल्ल स्लीवज आणि फुल्ल पॅन्ट असा एखादा हलका ड्रेस घाला. सर्दी असेल तर पायमोजे घाला. जर त्यांना खूप थंडी वाजत असेल तर स्वेटर घाला. कारण जेव्हा आपण त्यांना औषध देतो तेव्हा त्यांना घाम यायला सुरुवात होते आणि अंगात खूप जाडसर कपडे असल्यामुळे लहान मुलं चिडचिड करायला लागतात.


4) लहान मुलं आजारी असल्याची सतत त्यांना जाणीव करुन देऊ नका.


बऱ्याच वेळेला अस होत कि मुलांना आपण वारंवार सांगत असतो कि हे करु नको, ते करु नको, तू आजारी आहेस. आराम कर. यामुळे लहान मुलं स्वतःला कमजोर समजायला लागतात. त्यांना अस वाटायला लागत कि आपल्याला खूप मोठा आजार झाला आहे.
याउलट तुम्ही त्यांना सांगा कि "काही नाही,थोडासा ताप आहे औषध घेतलं कि तो निघून जाणार " तुमच्या या एका वाक्य मुळे मुलं स्वतःला स्ट्रॉंग समजायला लागतात आणि लवकर बरी सुद्धा होतात.

5) तुमचं लहान मुलं 3 वर्षाच्या पुढील असेल तर तुम्ही जी औषध मुलांना देताय त्या औषधाची ओळख मुलांना करुन द्या.how to do


हा प्रयोग मी माझ्या मुलीबरोबर करते. तिला कोणत औषध कशाचं आहे हे माहित आहे. मग ते औषध कडू जरी असेल तरी ती ते औषध पिते. कारण तिला माहित आहे कि मी हे औषध पिले कि मी लगेच बरी होणार आहे.
खोकला झाल्यावर डॉक्टर जे औषध देतात त्या बऱ्याच औषधाची चव कडू असतें.मुलं ते औषध पिल्यानंतर उलटी करतात. त्यामुळे त्यांचा खोकला बरा होत नाही. त्यामुळे तुम्ही जी औषध मुलांना देताय ती औषध कशाची आहेत, ते औषध पिल्यानंतर काय फरक पडणार आहे याची माहिती मुलांना वारंवार द्या. थोडासा वेळ लागेल, लहान मुलं रडतील, नको म्हणतील, पण काही काळानंतर मुलं तुम्ही दिलेलं औषध लगेच घेतील.

पण या मध्ये एक काळजी घ्या, औषधाच्या बॉटल मुलांच्या हाताला येणार नाहीत अशा जागेवर ठेवा, नाहीतर काही गोड चवीची औषध लहान मुलं त्यांच्याच हाताने घेतील.आणि त्याचा परिणाम काहीतरी वेगळाच होईल.

तर अशाप्रकारे आपण बदलत्या वातावरणामध्ये लहान मुलं आजारी पडली तरी त्यांची काळजी घेऊ शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या