वाढलेल्या पोटाचा घेर कमी कसा करावा?how to do

प्रत्येकाला आपल्या शरीराची रचना ही एकदम छान असावी अस वाटत असत.आपण त्यासाठी खूप काही करतही असतो. डाईट प्लॅन, जिम, योगासन. पण बऱ्याच वेळेला हे सगळं करूनही आपलं पोट कमी होत नाही. आरशासमोर उभा राहील की वाढलेलं पोट बघून टेन्शन यायला लागत. अस वाटत काय करु म्हणजे हे पोट कमी होईल.


आता यावर उपाय सांगण्याआधी एक महत्वाची गोष्ट जी सगळ्यांनी स्वतःच्या मनाला सांगायची.

हे माझं शरीर आहे. कोणत मशीन नाही की जसं फिरवेल तस फिरायला.



म्हणजेच काय तर प्रत्येकाचे शरीर हे वेगवेगळे असतें. कोणाची तरी झिरो फिगर बघून आपल्याला खूप वाटत की माझं सुद्धा शरीर तसच असावं. पण तस नाहीये. प्रत्येक माणसाची जाडी वाढण्यामागे कारणे सुद्धा वेगवेगळी असतात. त्यामुळे स्वतःच्या शरीराला ओळखा. पोट वाढण्यापाठीमागे काय कारण आहे,हे जाणून घ्या.

आता आपण अशीच काही कारणे बघू या आणि त्यावर उपाय ही शोधूया.

 तुमच्या दिवसाच शेड्युल चेक करा.

1) आपलं शरीर हे तुम्ही जसं ठेवता तस राहात असत.
2) तुम्ही वेळेवर झोपता का?
3) वेळेवर उठता का?
4) ठरलेल्या वेळेवर जेवण करता का?
5) जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर तुमचा आहार काय आहे?
☝️हे तुमचं दिवसाच शेड्युल.

आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की मी कमी खातो/खाते तरी माझं पोट का वाढत?

तर याला कारण असत तुमची अपुरी झोप आणि वेळेवर न घेतला जाणारा आहार.

हेही वाचा...... वजन कसे कमी करावे?

आजकाल आपण बघतो की मुलं रात्री 1 ते 2 वाजले तरी मोबाईल घेऊन बसलेली असतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान उठतात. शरीराला योग्य त्या वेळेची 8 तासाची झोप गरजेची असतें. ती मिळालीच पाहिजे. नाहीतर तुम्ही घेतलेल्या आहाराच पचन तर होणारच नाही शिवाय शरीरातील उष्णताही वाढते.मग जरी तुम्ही कमी जेवण केलेले असले तरी अपुऱ्या झोपेमुळे तुमच्या शरीराची प्रक्रिया बिघडते आणि पोट सुटायला लागते.


शिल्लक राहील म्हणून खात राहणे.

हा एक प्रकार प्रत्येक घरात दिसून येतो. आणि जास्त करुन लेडीज मध्ये. घरातील सगळ्यांचे जेवण झाले की केलेले अन्न शिल्लक राहील,वाया जाईल म्हणून घरात कोणीतरी एक व्यक्ती ते अन्न खात असतें. परिणामी क्षमतेपेक्षा जास्त खाल्लं जात आणि मग वाढत्या पोटाला निमंत्रण दिल जात.
त्याचप्रमाणे शिळ अन्न खाल्ल्यानेसुद्धा आपली जाडी वाढत असतें. अधल्या दिवशी रात्री केलेला भात दुसऱ्या दिवशी परतून खाणे हे तर प्रत्येक घरात होतंच होत. शिळ अन्न खाल्ल्याने शरीर सुस्त होत. कोणत्याही कामामध्ये उत्साह राहात नाही. त्यामुळे शिल्लक राहील म्हणून कधीच खाऊ नका.

जेवण करताना स्वतःला नेहमी सांगा " आता थांब खूप खाल्लं "how to do

बऱ्याच वेळेला जेवण करताना स्वतःच्या तोंडावर ताबा राहात नाही. आणि त्यात आवडीचे जेवण असेल मग तर एखादी भाकरी / चपाती जास्तीची जाते. जर तुम्हांला वाढलेले पोट कमी करायचे आहे तर मग आहारावर नियंत्रण ठेवा. ठराविक वेळेमध्ये ठराविकच आहार घ्या. त्यामध्ये सॅलड चे प्रमाण जास्त ठेवा. म्हणजे बाकी जेवण जास्त जाणार नाही. अति आहार न घेता स्वतःला सांगा, आता खूप झाले, खूप खाल्ले, आता थांब.


वाढलेले पोट कमी करायचे आहे म्हणून कधीच उपाशी राहू नका.

हा एक मोठा गैरसमज आहे की, उपाशी राहिल्याने माझे वाढलेले पोट कमी होईल. तर अस नाहीये. उपाशी राहिल्याने पोट कमी नाही होणार तर तुम्हाला अशक्तपणा येईल. शरीराला हव्या असणाऱ्या गोष्टी रोजच्यारोज आहारातून घ्याव्याच लागतात. अन्न हे फक्त पोटाचं नाही जात. खाल्लेल्या अन्नाचे वेगवेगळ्या प्रकारात रूपांतर होऊन ते पूर्ण शरीराला पोषण देते. त्यामुळे शरीराचे प्रत्येक अवयव जर नीट काम करावेत अस वाटत असेल तर उपाशी कधीच राहू नका. तुम्हाला एकाच वेळी खूप खायचं नसेल तरी दोन दोन तासाला काहीतरी खात राहा.

व्यायाम......how to do

खाल्लेलें अन्न व्यवस्थित पचण्यासाठी शरीराची हालचाल होणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जॉब करत असला तर 8 ते 9 तास एका जागेवर बसणे होते. त्यामुळे पोटाची चरबी वाढण्याची शक्यता जास्त असतें. शरीराला रोज व्यायाम करण्याची सवय ठेवा. म्हणजे जेवण व्यवस्थित पचेल आणि पोटाची चरबी सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागेल.तुम्हाला आवडेल झेपेल असाच व्यायाम करा. पण तो रोज नित्यनियमाने करा. काही लोक 8 दिवस व्यायाम करतात आणि काहीच होत नाही म्हणून सोडून देतात. लक्षात ठेवा. पोटाची चरबी ही वर्षानुवर्षे वाढत आलेली आहे. ती फक्त 8 दिवसाच्या व्यायामाने कमी होणार नाही. तुम्हाला त्यासाठी 3 ते 4 महिने हे द्यावेच लागणार. तेव्हा कुठे तुम्हाला थोडा फरक जाणवायला लागेल. त्यामुळे जे काही करताय ते नित्यनियमाने करा. नक्की फरक पडेल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या