घरातील काम केले म्हणजे व्यायाम झाला.

 घरातील काम तर प्रत्येक स्त्रीला असतंच मग ती स्त्री कमवती असू किंवा एक गृहिणी असू. घरातील काम काही कुठल्या स्त्रीला चुकलेलं नाही.पण हे सगळं करत असताना आपल्या शरीराची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. आपला आहार, व्यायाम यावर लक्ष देण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढावा लागतो.how to do

आता काही स्त्रीयांचा असा समज आहे की पूर्वीच्या बायका कुठे व्यायाम करत होत्या. त्या तर घरातील काम करुन सुद्धा व्यवस्थित होत्या की, मग आम्ही पण दिवसभर घरातील काम करतो मग व्यायामाची काय गरज आहे.

पण पूर्वीच्या पिढीमध्ये आणि आत्ताच्या पिढीमध्ये खूप फरक आहे, तो कसा हे मी तुम्हाला वेगवेगळ्या कामातून समजावून सांगते.how to do



1) घर आणि अंगण झाडणे.

पूर्वी बायका सकाळी उठल्याबरोबर घर आणि अंगण झाडायच्या. आणि पूर्वी झाडू नव्हते केरसुनी होती त्यामुळे झाडून काढताना खाली वाकून पूर्ण घर आणि अंगण झाडलं जायचं. त्यामुळे कंबरेचा चांगला व्यायाम होत होता. आणि पूर्वी अंगणही खूप मोठं असायचं त्यामुळे चालणही व्हायचं.


आता आपण फ्लॅट मध्ये राहतो आणि गावाकडे स्वतःच घर जरी असलं तरी क्वचित घरापुढे अंगण आहे. आणि शहरांत तर बऱ्याच घरामध्ये कामासाठी बाई लावली जाते.आता झाडण्यासाठी झाडू आणि काही घरात vaccum clearner आहेत. त्यामुळे पहिल्यासारखे खाली वाकून झाडणे हा प्रकार राहिला नाहीये.


2) कणिक मळणे.

चपातीसाठी कणिक मळणे प्रकार रोजचाच आहे.त्यामुळे आपल्या तळहाताचा आणि बोटांचा चांगला व्यायाम होतो. अस म्हणतात,ज्यांच्या हाताला वातीचा त्रास आहे त्यांनी नेहमी कणिक मळावी त्यामुळे वातीचा त्रास थोड्याप्रमाणात कमी होतो.

आता कणिक मळण्यासाठी काही घरात स्टॅंड मिक्सर आहेत. हल्लीच्या पिढीला कणिक मळताना हात खराब झालेले आवडत नाहीत, त्यामुळे ते कणिक मळण्यासाठी वेगवेगळे यंत्र वापरत असतात. त्यामुळे कामातून जो हाताचा व्यायाम होतो तो होतंच नाही.


हेही वाचा......उन्हाळ्यात व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी?

3) कपडे धुणे.

आता कपडे धुण्यासाठी शहरामध्ये आणि गावाकडेही बऱ्याच घरामध्ये washing machine आहे. पूर्वी प्रत्येक घरातील प्रत्येक बाई हाताने कपडे धूत होती, त्यामुळे खांद्यापासून ते हातांच्या बोटापर्यंत चांगलाच व्यायाम होत होता.

5) बसून शेणाने अंगण सारवणे / फरशी पुसणे

अजूनही खेडेगावात काही ठिकाणी अंगण शेणाने सारवले जाते. फरशी कपड्याने व्यवस्थित पुसली जाते.ही दोन्ही काम करण म्हणजे cardio exercise केल्यासारखं आहे.


नक्की वाचा....वाढलेल्या पोटाचा घेर कसा कमी करावा?



बघा ना अश्या घरातील अनेक कामातून किती व्यायाम होतो. म्हणून तर आपली आई, आज्जी ह्या पन्नाशी पार करुन सुद्धा अगदी ठणठणीत आहेत कारण यांनी स्वतःची काम कमी व्हावीत म्हणून कुठल्या मशीनचा वापर नाही केला. जे काही काम असेल ते स्वतःच्या हाताने केल. मी अस म्हणत नाही की आजच्या पिढीने फक्त घरातील कामचं करावीत, पण मला सांगा घरात किती तरी हजाराचे मशीन घ्यायचे का तर काम थोडंसं हलक होईल आणि मग वजन वाढल की जिम मध्ये पैसे घालवून व्यायामासाठी जायचं, गुडाघेदुखी सुरु झाली की डॉक्टर कडे जायचं हे कितपत योग्य आहे याचा विचार तुम्हीच करा.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या