जे खायचं आहे ते बिनधास्त खा.

खाण हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे.आपण कमवतो ते पोटासाठीच ना. जर आपण खाल्लंच नाही तर कमवण्यासाठी आपल्या अंगात ताकद राहील का?

आता खाण्याच्या बाबतीतही काहींचे खूप नखरे असतात. तेलकट नको, चिप्स नको, बाहेरच खायला नको. पण मला सांगा जर आपण एक सर्वसामान्य आयुष्य जगत आहोत, तर मग हे नखरे कशाला?

आपल्याला काही miss world competition मध्ये भाग घ्यायचा नाहीये. की त्यासाठी एकदम झिरो फिगर करायची आहे.ना आपल्याला ऍक्टर होऊन फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे.ज्या त्या क्षेत्रातील व्यक्तीने आपल्या क्षेत्रानुसार आपला आहार ठेवावा. पण जर आपण एक सामान्य व्यक्ती असू तर जे खावंसं वाटतंय ते पटकन खाऊन घ्यावं. अस माझं मत आहे.


जेव्हा आपण बाहेर जातो सहज फिरण्यासाठी तेव्हा आजूबाजूला खूप काही खाण्याच्या गोष्टी दिसतात. गरमा गरम भजी, समोसे, इडली - डोसा, पिज्जा - बर्गर. आता हे सगळं खायला कोणाला नाही आवडत. पण आपल वजन वाढेल किंवा वाढलेले वजन कमी करायचे आहे,या विचारात आपलं मन मारुन काहीही न खाता आपण घरी परत येतो.

माझ्या मते माणसाने सगळं खावं. मन तृप्त होण्यासाठी थोड्या प्रमाणात सगळं काही खात राहावं. जर तुम्ही आयुष्यभर हे खायला नको, ते नको अस करत जगत राहिलात तर मग स्वतःच्या मनाप्रमाणे जगणार कधी. आपल्याला काही 24 तास बाहेरचे पदार्थ खात नाही राहायचे. पण जेव्हा केव्हा खावंसं वाटेल तेव्हा खायला काय प्रॉब्लेम आहे.

आणि खाण्याची बाबतीत लोकांचा विचार करणे हा मुद्दा काही मला आज पर्यंत कळला नाही. म्हणजे कोणी जर म्हणाला की, अग / अर्रे थोडी तब्बेत जास्त झालीय वाटत. की लगेच आपण ठरवतो. आजपासून गोड बंद, बाहेरच खाण बंद,चहा - कॉफी बंद आणि मग खाणार काय फक्त पालेभाज्या.



 पालेभाज्या खाण चांगलंच असत ते काही वाईट नाही. पण मग काय आयुष्यभर पालेभाज्याच खाणार. आणि मग जिभेचे चोचले कधी पुरवणार. आणि ज्या लोकांचा तुम्ही विचार करता ना तीच लोक जर आपली तब्येत खूप कमी असेल तर सरळ म्हणतात,काय ग खायला मिळत नाही का तुला?किती बारीक झालीय / झालाय. म्हणजे बघा तुम्ही जाड असू द्या किंवा बारीक असू द्या. लोक नावे ठेवणारच. त्यामुळे लोकांचा विचार करण सोडा. स्वतःच्या मनाप्रमाणे जगा. जे मला वाटत ते मी करणार आणि खाणार.


हेही वाचा......लहान मूल व्यवस्थित खात नाही काय करावे?


आता तुम्ही म्हणाल जर मी सारखं बाहेरच हवं ते खाल्ल तर मग निरोगी आयुष्य कस जगणार?how to do

तर निरोगी आयुष्य म्हणजे फक्त चांगलं खाल्ल्याने मिळत अस नाहीये.तर ते मिळत माणसाच्या दिवसाच्या चांगल्या रुटीनने. तुम्ही सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत तुमचा दिनक्रम कसा आहे. तुम्ही सकाळी उठल्यावर व्यायाम करता का? जो काही तुमचा आहार आहे तो घेण्याचा टाईम फिक्स आहे का? तुम्ही विचार कोणकोणते करता? अति विचार करता का? कोणत्या गोष्टीचे टेन्शन घेता का? यावर ठरत आपलं निरोगी आयुष्य.



हेही वाचा...... आपल्या दिवसाची सुरुवात कशी करावी?


जेवण हे शरीराला जिवंत ठेवण्यासाठी केल जात. आपण जर जेवलो नाही तर आपल्याला चक्कर येते. म्हणजे जस गाडी चालवण्यासाठी पेट्रोल डिझेल लागते तसें शरीराची हालचाल नीट होण्यासाठी जेवणाची गरज आहे. मग त्यामध्ये तुम्ही काहीही खा. जर तुमच्या शरीराला व्यायामाची सवय असेल तर त्या खाल्लेल्या पदार्थाचा तुमच्या शरीरावर परिणाम नाही होणार.

तुम्ही कधी निरीक्षण करा. हडकुळा माणूस सुद्धा वेगवेगळ्या आजारानीं जखडलेला असतो. ज्यांच्याकडे खूप पैसा असतो तो माणूस सुद्धा हॉस्पिटलच्या चकरा मारुन वैतागलेला असतो. जो एकदम फिट असतो तो माणूस कधी हार्ट अटॅक येऊन मरुन जाईल याची गॅरंटी नाही. त्यामुळे आपण काय खातो यापेक्षा आपण सतत कोणत्या गोष्टीचा विचार करतो यावर लक्ष द्या.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या त्या वयात जे आवडत ते माणसाने खाऊन घ्याव. लहान वयात आपल्याला चॉकलेट, बिस्कीट, चिप्स हे सगळं आवडत असत. थोडं मोठ झाल्यावर पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी, नॉनव्हेज मध्ये वेगवेगळे पदार्थ या सगळ्यांमध्ये आवड निर्माण होते. आणि जसजस वय वाढत जात तसतस आपल्या आवडीवर बंधन येतात.त्यामुळे खायच्या वयात सगळं काही खावा. एक दिवस जायचं तर सर्वांनाच आहे. मग आपल्या मृत्यू नंतर घरचे आपल्या दहाव्याला किंवा तेराव्याला किंवा श्रद्धाला आपल्या आवडीचे पदार्थ ठेवतात. पण तेव्हा काही आपण येऊन खाणार नाही. त्यामुळे जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या जिभेचे चोचले पुरवा आणि आनंदी राहा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या