उन्हाळा आला की टॅनिंग ची समस्या ही येतेच. आणि काही वेळेला सनस्क्रीन लावुनही त्वचा टॅन होतेच.
टॅनिंग हे विशेष करुन मानेवर, हातावर आणि पायाच्या पंजावर जास्त प्रमाणात होते. चेहरा आपण बाहेर जाताना कव्हर करतो तरीही थोड्या प्रमाणात चेहरा सुद्धा टॅन होतोच.
टॅनिंग वरती जर आपण लगेच उपाय केला तरच ते पटकन जाते.नाहीतर दोन ते तीन महिने तुम्ही टॅनिंग होऊन दिले आणि नंतर त्यावर उपाय करायला गेलात तर तुमची स्किन रिपेअर व्हायला वेळ लागेल.
Table of content
1) लिंबू व गुलाबपाणी मिश्रण
2) टोमॅटो स्क्रब आणि पॅक
3) एलोवेरा ( कोरफड )
4) दही चेहऱ्यासाठी फायदेशीर
5) बेसन टॅनिंग साठी उत्तम
मार्केट मध्ये काही क्रिम उपलब्ध आहेत ज्यांनी लगेंच टॅन रिमूव्ह होते पण सामान्य माणसाच्या खिशाला त्या क्रीम परवडत नाहीत. कारण त्यांची किंमत खूप जास्त आहे.
मग आपण काही घरगुती उपाय पाहू ज्यांचा वापर करुन तुम्ही टॅन घालवू शकता.how to do
हेही वाचा......उन्हाळ्यात अशी घ्या केसांची काळजी.
1) लिंबू आणि गुलाबपाणी मिश्रण.
आपल्याकडे लिंबू तर फ्रिज मध्ये असतेच आणि गुलाब पाणी सुद्धा असतें. नसेल तर उन्हाळ्यासाठी एक बॉटल आणून ठेवा.
एका वाटी मध्ये गुलाबपाणी आणि त्यात थोडेसे लिंबाचे थेंब टाका. ( तुम्हाला या मिश्रणाचा वापर किती करायचा आहे त्याप्रमाणे मिश्रण तयार करा.)
आपल्या सर्वांना माहित आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन C आहे. बऱ्याच skin brightening cream मध्ये व्हिटॅमिन C चा समावेश असतो. जे तुमच्या स्किनचा रंग उजळवण्यासाठी मदत करते.
गुलाबपाणी आपल्या त्वचेला थंडावा देते. आपण पार्लर मध्ये एखाद्या स्किन ट्रीटमेंट साठी जातो तेव्हा तेथे जास्त प्रमाणात गुलाबपाणी वापरले जाते.
तुम्ही जेव्हा उन्हातून घरी येता,तेव्हा फ्रेश होऊन हे तयार केलेले मिश्रण तुमच्या टॅन झालेल्या स्किन वरती लावा आणि अर्ध्या तासाने साध्या पाण्याने धुवा.
हा उपाय तुम्ही रोज एक आठवडा करा. तुम्हाला फरक जाणवेल.
जर तुमची स्किन ड्राय असेल तर या मिश्रणामध्ये लिंबाचा वापर थोडा कमी करा. आणि त्यात थोडासा मध मिक्स करा म्हणजे तुमची स्किन अजून ड्राय होणार नाही. आणि टॅन रिमूव्ह करायला मदत होईल.
हे मिश्रण तुम्ही एका आठवड्यासाठी फ्रिज मध्ये तयार करुन ठेऊ शकता.
हेही वाचा......उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी?
2) टोमॅटो स्क्रब आणि पॅक
तुमच्या चेहऱ्यावर नॉर्मल टॅन असले आणि ते तुम्हाला इन्स्टंट रिमूव्ह करायचे असेल तर टोमॅटो स्क्रब उत्तम उपाय आहे.
टोमॅटो मध्ये असणारे व्हिटॅमिन C आणि E तुमच्या स्किनला ब्राईट करण्यासाठी मदत करते.how to do
एक टोमॅटो घेऊन तो अर्धा कापून तुमच्या चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा.
तुम्हाला ओपन पोर्स कमी प्रमाणात असतील तर तुम्ही टोमॅटोवर थोडीशी साखर टाकून स्क्रब करु शकता. त्यामुळे तुमचे ओपन पोर्स क्लीन होतील.
रात्री झोपण्याआधी टोमॅटोवर थोडीशी हळद टाकून चेहऱ्यावर स्क्रब करु शकता. त्यामुळे स्किन ब्राईट होईल आणि टॅन रिमूव्ह होण्यासाठी मदत होईल.
त्याचबरोबर तुम्ही टोमॅटोचा फेस पॅकही बनवू शकता.
पॅक तयार करताना टोमॅटोचा गर घ्या तो बारीक करा.
जर तुमची स्किन ऑईली असेल तर टोमॅटोच्या गरामध्ये तुम्ही थोडे लिंबू आणि बेसन मिक्स करुन पॅक तयार करु शकता.
जर तुमची स्किन ड्राय असेल तर टोमॅटोच्या गरामध्ये मध आणि हळद मिक्स करुन त्यात थोडी चंदन पावडर किंवा मुलतानी माती मिक्स करुन पॅक तयार करु शकता.याने डेड स्किन रिमूव्ह होण्यास मदत होते.
हा तयार केलेला पॅक झोपण्याआधी चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.10 ते 15 मिनिट ठेऊन साध्या पाण्याने धुवा. हा पॅक तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन वेळा लावा. तुम्हाला फरक जाणवेल.
3) एलोवेरा ( कोरफड )
कधी कधी आपण बाहेरून एलोवेरा जेल विकत आणतो. कारण ते लावायला सोप्पे जाते. परंतु आपल्याकडे घरी कुंडीत असणारी कोरफड सुद्धा आपल्या स्किन साठी तितकीच उपयोगी आहे.how to do
तुम्ही कोरफडीचा गर काढून फ्रिज मध्ये साठवून ठेऊ शकता. रोज सकाळी उठल्यानंतर थोडासा गर तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. टॅन घालवण्यासाठी तुम्ही हा कोरफडीचा गर हाताला आणि पायाला सुद्धा लावू शकता. अंघोळ करताना धुवून टाका.
एलोवेरा मध्ये उपलब्ध असणारे गुणधर्म तुमच्या स्किनला hydrate ठेवण्यासाठी मदत करते. एलोवेरा जेल तुम्ही वेगवेगळ्या पॅक मध्ये सुद्धा मिक्स करु शकता.
जर तुमची त्वचा ऑईली असेल तर तुम्ही बेसन आणि एलोवेरा जेलचा पॅक तयार करु शकता. तो मानेवर व चेहऱ्यावर लावून 10 ते 15 मिनिट ठेवा आणि साध्या पाण्याने स्वच्छ करा. याने तुम्हाला टॅन रिमूव्ह होण्यास मदत होईल.
हेही वाचा........केसांची निगा राखताना होणाऱ्या चूका
4) दही
दही सर्वांच्या घरी असतेच. आपण ते खाण्यासाठी जमा करुन ठेवतो. आणि उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दह्याचा खूप उपयोगी होतो.
खाण्याबरोबरच आपण हे दही आपल्या त्वचेसाठी सुद्धा वापरू शकतो. दह्यामध्ये असणारे zinc आपले skin cell renewal करण्यास मदत करते.
तुमची स्किन ऑईली असेल तर डायरेक्ट दही चेहऱ्यावर न लावता त्यात थोडेसे लिंबू आणि बेसन मिक्स करा. बेसन चेहऱ्यावरील तेलकट पणा कमी करण्यास मदत करते.
स्किन ड्राय असेल तर तुम्ही फक्त दही चेहऱ्यावर लावू शकता. दह्याने स्किन मुलायम होते आणि डेड स्किन रिमूव्ह होण्यास मदत होते.
दह्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ मिक्स करुन त्यात थोडेसे गुलाबपाणी टाकून पॅक बनवू शकता. हा पॅक तुमच्या चेहऱ्याला आणि हाताला थंडावा देईल शिवाय टॅन रिमूव्ह करण्यास मदत करेल. आठवड्यातून दोन वेळा हा पॅक तुम्ही वापरू शकता.
अगदीच काही करणे शक्य नसेल तर झोपण्याआधी दह्यामध्ये थोडीशी हळद टाकून टॅन झालेल्या भागावर लावून मालिश करा. हा उपाय आठवड्यातून तीन ते चार वेळा करा.टॅनिंग कमी होईल.
ज्यांना ओपन पोर्स जास्त आहेत अशा व्यक्तींनी दह्या मध्ये काकडीचा रस टाकून चेहऱ्यावर लावावा. अर्धा तास ठेऊन नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. ओपन पोर्स साठी आणि टॅनिंग जाण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.
5) बेसन
आपल्या पूर्ण शरीराच्या त्वचेसाठी बेसन सारखा दुसरा ब्युटी प्रॉडक्ट नाही.
आपण रोज सकाळी चेहरा धुण्यासाठी फेसवॉश वापरतो. त्याऐवजी थोडेसे बेसन पीठ घेऊन त्याने चेहरा धुतला तर पूर्ण उन्हाळा तुम्हाला टॅनिंग चा प्रॉब्लेम होणार नाही.
बेसन तुमच्या स्किनला ब्राईट ठेवण्यास करते. शिवाय याने डेड स्किन सुद्धा रिमूव्ह होतात. याचा पॅक तुम्ही तुमच्या स्किन नुसार बनवू शकता.how to do
ऑईली स्किन = बेसन + हळद + लेमन ज्युस + गुलाबपाणी
ड्राय स्किन = बेसन + मध + गुलाबपाणी + ग्लीसरीन
जसा पॅक तुम्हाला हवा आहे तसा तयार करा आणि लावा.
5 ते 10 मिनिटाने साध्या पाण्याने स्वच्छ करा आणि तुमचे रेगुलर मोईश्चरायजर लावा.बेसन पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा लावलात तरी पुरेसा आहे.
Note = बेसन पॅक चेहऱ्यावर जास्त वेळ ठेऊ नये. कारण स्किन ओढली जाते आणि रॅशेष येण्याची शक्यता असतें. स्किन लाल पडते. त्यामुळे शक्यतो बेसन पॅक चेहऱ्यावर 5 मिनिटचं ठेवावा आणि तो हाताने चोळून न काढता डायरेक्ट पाण्याने स्वच्छ करावा.
हेही वाचा........वजन कसे कमी करावे?
तर अशा प्रकारे आपल्या घरातील सामग्रीचा वापर करुन आपण टॅनिंग रिमूव्ह करु शकतो. लक्षात ठेवा कोणताही घरगुती उपाय हा रेगुलर करत राहावा लागतो. तरच त्याचा फरक दिसतो. एकदा किंवा दोनदा लावून फरक जाणवत नाही.
त्यामुळे वरती दिलेले सर्व उपाय कमीतकमी एक महिना करा. टॅनिंग जाण्यास मदत होईल.
0 टिप्पण्या