केसांची निगा राखताना होणाऱ्या चूका

स्वतःच्या शरीरावर प्रेम हे प्रत्येकाचेच असतें. त्यातली त्यात केस म्हणजे आपलें जीव की प्राण. ते जपत असताना आपण आपल्या केसांची काळजी घेत असतो.

तर आता केसांची काळजी घेताना आपल्याकडून काय काय चूका होतात यावर थोडंसं लक्ष देऊ.how to do


1) केसामध्ये कोंडा असताना केसांना तेल लावणे.


आपल्या केसामध्ये जर कोंडा असेल तर आपलें केस गळत असतात आणि त्यात आपण आपल्या केसांच्या मुळाशी तेल लावत असतो. त्यामुळे तो कोंडा आपल्या केसांच्या मुळाशी तसाच चिटकून राहतो आणि केस अजून गळायला लागतात.

त्यामुळे तुमच्या केसात जर कोंडा झाला असेल तर तो कोंडा पूर्णपणे जाईपर्यंत केसांच्या मुळाशी तेल लावू नका. या प्रयोगाने तुमच्या केसातील कोंडा कमी होण्यास मदत होईल.

2) शाम्पूने केस धुण्याची पद्धत.


केस धुण्यासाठी प्रत्येकजण शाम्पू वापरत असतो. आता स्त्रियांचे केस हे लांब असतात ज्यावेळी आपण केस शाम्पूने धूत असतो त्यावेळी आपण खूप हळुवारपणे केसांना स्वच्छ केल पाहिजे. काहीजनांना सवय असतें खूप खसखस आपलें हात केसांवरती रगडायचे. त्यामुळे केसांमध्ये गुंता होतो आणि केस जास्त प्रमाणात तुटायला सुरुवात होतात.

त्याचप्रमाणे शाम्पूचा वापर योग्य प्रमाणात करायला हवा. काहीजणांचा असा समज असतो की खूप फेस केला म्हणजे केस खूप स्वच्छ होतील. तर अस नाहीये तुम्ही जेवढा जास्त शाम्पूचा वापर कराल तेवढे तुमचे केस जास्त रफ होतील आणि तुटतील.

हेही वाचा.....आपल्या दिवसाची सुरुवात कशी करावी?

3) केस धुतल्यानंतर बराच वेळ टॉवेल केसांवरती गुंडाळून ठेवणे.


हा प्रकार प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्री करते. सकाळी केस धुतल्यानंतर घरातील सगळी कामे आवारे पर्यंत त्या केसांवरती टॉवेल गुंडाळलेला असतो. ही पद्धत खूप चुकीची आहे. केस धुतल्यानंतर ते लगेच सॉफ्ट टॉवेल च्या साहाय्याने हळुवारपणे कोरडे करा आणि सुकण्यासाठी मोकळे सोडा.

4) अतीप्रमाणात तेलाचा वापर.


केस धुण्यासाधी केसांना तेल लावावे हे बरोबर आहे. पण ते किती प्रमाणात लावावे हे कळायला हवं. बऱ्याच जणांना खूप पचपचित तेल लावायची सवय असतें. लक्षात घ्या अति तेल लावल्याने सुद्धा केस गळतात. कारण आपली स्कॅल्प अगोदरच ऑयली असतें. तुम्ही कधीतरी निरीक्षण करा, जेव्हा आपण केस धुवून 4 ते 5 दिवस होतात तेव्हा आपले केस तेल न लावुनही ऑयली झालेले असतात. त्यामुळे तेल हे योग्य प्रमाणातच वापरा.

5) वेगवेगळ्या स्टाईल करण्याच्या नादात जास्त केमिकल प्रोडक्ट चा वापर.


आजकालची जनरेशन बघतो आपण त्यांच्यामध्ये केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल करण्याची क्रेज खूप जास्त आहे. कोणी कलर करण्याच्या नादात खूप केमिकल युक्त प्रोडक्ट आपण आपल्या केसांसाठी वापरत आहोत यांच्याकडे त्यांचं लक्षही जात नाही. कलर केलेले केस जेव्हा ते कलर जायला सुरुवात होते तेव्हा बघा केस किती रफ आणि निर्जीव असल्यासारखे वाटतात. त्यापेक्षा केस आहे असेच खरे राहू द्या. ते natural केस खूप वर्षे छान राहतील तुम्ही जेवढे त्यांना केमिकल गोष्टीपासून लांब ठेवाल तेवढे ते छान राहतील.

केस छान राहावेत आणि छान वाढवेत वाटत असेल तर केसांची काळजी व्यवस्थित  घ्या. केसांसाठी एक रुटीन ठेवा, केसांना ऑयलिंग कस करायचं आहे किती प्रमाणात करायचं आहे. शाम्पूचा वापर आणि आहार यावर लक्ष द्या.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या