केसांच्या वाढीसाठी कोणते तेल वापरावे?

केस गळण्याचे प्रमाण आजकाल खूप वाढले आहे. जो तो सर्च करत असतो की काय करावे? म्हणजे केस गळण्याचे प्रमाण कमी होईल.केसांची काळजी कशी घ्यावी ?how to do

आपण केसांना तेल तर लावतो, परंतु तेलाचा वापर जर आपण वेगवेगळ्या व योग्य पद्धतीने केला तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. तर आपण बघू या की केसांच्या वाढीसाठी कोणते तेल वापरावे?व तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती?


Table of content




1) खोबरेल तेल



प्रत्येक घरामध्ये खोबरेल तेल असतें. खोबरेल तेलाचा वापर आपण प्रत्येक जण करत असतो. तर हेच खोबरेल तेल आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरले तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होईल.

कसे वापरावे?how to do

1) खोबरेल तेल + स्टीम.

एका वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन थोडे गरम करा व केसांना लावून छान मालिश करा.हेअर स्टीमर असेल तर त्याने केसांना वाफ द्या.जर तुमच्याकडे हेअर स्टीमर नसेल तर एक नॅपकीन किंवा कॉटन चा कपडा घेऊन तो गरम पाण्यामध्ये भिजवा आणि तुमच्या केसांना गुंडाळा.5 ते 10  मिनिट केसांना वाफ घ्या.

स्टीम घेण्याचा फायदा काय?
तर केसांना स्टीम घेतल्यामुळे पोर्स ओपन होतात आणि तुम्ही केसांना लावलेले तेल छान केसांमध्ये absorb होते. त्यामुळे केसाची थांबलेली ग्रोथ पुन्हा व्हायला सुरुवात होते.

2) खोबरेल तेल + लिंबाचा रस.

बऱ्याच वेळेला आपल्या केसांमध्ये कोंडा होतो. त्याच कारण धूळ / वेळेवर केस न धुणे / व्यवस्थित केस न धुणे.
मग अशा वेळेला तुम्ही खोबरेल तेल व लिंबाचा रस समप्रमाणात मिक्स करुन केसांना लावू शकता. त्यामुळे केसांमधील कोंडा कमी होईल आणि लिंबाच्या रसामुळे तुमची स्काल्प क्लीन राहील.

3) खोबरेल तेल + मध + दही.

काही जणांचे केस अगदी रफ झालेले असतात.केसांना अजिबात शाईन नसते. तर अशा रफ झालेल्या केसांसाठी  हा पॅक खूप फायद्याचा ठरतो.
तुमच्या केसांच्या लांबीनुसार खोबरेल तेल घ्या व त्यात एक चमचा मध व दोन चमचे दही मिक्स करुन ते तुमच्या केसांना लावा. एक तास हा पॅक केसांना ठेऊन नंतर केस धुवा. या पॅक मुळे केसांचा रफपणा कमी होईल व केसांना छान चमक येईल.
हा पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा केसांना लावू शकता.

2) एरंडेल तेल



एरंडेल तेल तर आपल्याला सर्वाना माहित आहे. याच्या वापराने केस तर वाढतातच शिवाय केसांचे आरोग्य खूप छान राहते. परंतु एरंडेल तेल वापरण्याची एक पद्धत आहे.
कारण,
हे तेल खूप चिकट आणि थिक असते. तुम्ही एरंडेल तेल डायरेक्ट केसांना लावू शकत नाही तसे केल्यास हे तेल एका वॉश मध्ये केसांमधून निघणार नाही शिवाय वारंवार केसांना तेलाचा वासही येईल. मग हे एरंडेल तेल वापरायचे कसे?

साहित्य 
एरंडेल तेल + ऑलिव ऑइल
एरंडेल तेल + बदाम तेल
एरंडेल तेल + खोबरेल तेल

कसे लावावे?

एक चमचा एरंडेल तेलामध्ये तुम्ही वरील पैकी कोणतेही तेल मिक्स करु शकता. तुमच्या केसांच्या लांबीनुसार एरंडेल तेलामध्ये बाकी तेल मिक्स करा.एका वाटीमध्ये दोन्ही तेल मिक्स करुन थोडेसे गरम करा म्हणजे त्याचा घट्ट पणा कमी होईल व तुम्हाला तेल केसांना लावण्यासाठी सोप्पे जाईल.
हे तेल आठवड्यातून 2 वेळा केसांना लावा. कमीतकमी 4 तास केसांना तेल राहू द्या.

Note - एरंडेल तेलाचे प्रमाण कमी असू द्या व जे तेल तुम्ही मिक्स करणार आहात त्याचे प्रमाण जास्त असू द्या.

फायदा
1) केसांची मुळे मजबूत होतात.
2) केसांची थांबलेली ग्रोथ परत सुरु होते.
3) कोंडा कमी होण्यास मदत होते.
4) केसांना शाईन येते
5) केस सिल्की होतात.




3) बदाम तेल


बुद्धी वाढवण्यासाठी बदाम तर खाल्ले जातातच शिवाय याच्या तेलापासून तुम्ही तुमच्या केसांचे सौन्दर्य वाढवू शकता.

घटक 
बदाम तेलामध्ये असणारे ओमेगा 6, ओमेगा 3, ओमेगा 9, फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन E, मॅग्नेशियम हे घटक केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

Note- बदाम तेल खरेदी करताना ते शुद्ध असेल याची काळजी घ्या.

हे तेल कसे वापरावे?
रात्री झोपण्यापूर्वी किंवा केस धुण्याआधी चार तास हे तेल केसांना लावा. तेल केसांना लावण्यासाठी तुम्ही कॉटनचा (कापूस) वापर करु शकता. त्यामुळे केसांच्या मुळानां तेल व्यवस्थित लावले जाईल. किंवा तुम्ही एखाद्या ड्रॉप च्या साहाय्याने सुद्धा तेल केसांना लावू शकता.
या तेलामध्ये काहीही मिक्स करण्याची गरज नाही कारण यातील घटक केसांना पोषण देण्यासाठी पुरेसे आहेत.हे तेल आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना लावा.
या तेलाचे फायदे काय?

फायदे 
1) अकाली केस पांढरे होण्यापासून वाचवते.
2) केसांचे गळणे कमी करते.
3) कोंडा कमी होण्यास मदत होते.
4) केसांची रिग्रोथ होण्यास मदत होते.
5) केसांना दाट व मजबूत करते.

4) ऑलिव्ह ऑइल.



अनेक ब्युटी प्रॉडक्ट मध्ये या तेलाचा समावेश असतो. केसांसाठी जर या तेलाचा योग्य प्रकारे वापर केला तर नक्कीच फायदा होईल.
ऑलिव्ह ऑइलला एक उत्तम कंडिशनर म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे तेल केसांना लावल्यानंतर तुम्हाला केसांना कंडिशनर वापरण्याची गरज नाही पडणार.

कसे लावावे?
केस धुण्याच्या दोन तास आधी हे ऑलिव्ह ऑइल केसांना लावा. केसांना हलक्या हाताने मालिश करा. ऑलिव्ह ऑइल लावताना तुम्हाला जाणवेल की केसांमध्ये जास्त गुंता होत नाही. दोन तासाने केस धुवा.

फायदे 
1) केसांना फाट्या फुटणे बंद होईल.
2) केसांना चमक येईल.
3) केसांचा फार गुंता होणार नाही.
4) केसांच्या वाढीसाठी मदत होईल.
5) केस मुळापासून मजबूत होतील.

ऑलिव्ह ऑइल मास्क स्वरूपातही वापरू शकता.

1) ऑलिव्ह ऑइल + अंडे

केसांची पोत चांगली होण्यासाठी या मास्क चा उपयोग होतो.

मास्क कसा तयार करावा?how to do

चार चमचे ऑलिव्ह ऑइल मध्ये अंड्याचा पांढरा भाग मिक्स करावा. त्याला व्यवस्थित एकजीव करावे.
हे मिश्रण केसांना अर्धा तास लावावे व नंतर तुमच्या रेगुलर शाम्पूने केस धुवावे.

2) ऑलिव्ह ऑइल + मध

मधाचा वापर जसा त्वचेसाठी होतो. तसाच तो केसासाठी सुद्धा होतो. हेअर मास्क बनवण्यासाठी आपण मधाचा वापर ऑलिव्ह ऑइल मध्ये करु शकतो.

मास्क कसा तयार करायचा?how to do
तुमच्या केसांच्या लांबीनुसार एका वाटीमध्ये ऑलिव्ह ऑइल घ्या. व त्यात एक चमचा मध मिक्स करा.
मध चिकट असतो त्यामुळे केसांना हे मिश्रण लावण्यासाठी अवघड जाईल. त्यासाठी हे मिश्रण तयार केलेली वाटी थोडा वेळ गरम पाण्यात ठेवा त्यामुळे मिश्रण योग्य स्वरूपात येईल. व लावण्यासाठी सोप्पे जाईल.
एक तासाने केस तुमच्या रेगुलर शाम्पूने वॉश करा.


केसांना तेल लावताना केसांची काळजी कशी घ्यावी?

केसांची निगा राखताना होणाऱ्या चूका


1) केसांना अति तेल लावू नये, जर तुमची स्काल्प ऑईली असेल तर आठवड्यातून एकदाच स्काल्प वरती तेल लावावे.
2) तेल गरम करताना ते अति गरम करु नये. फक्त कोमट करावे
3) केसांना मालिश नेहमी हलक्या हाताने करावी.
4) तेल लावताना जास्त गुंता होणार नाही याची काळजी घ्यावी, त्यामुळे केस जास्त तुटणार नाहीत.
5) केसांना तेल लावल्यानंतर ते कमीतकमी एक तास तरी केसांना लावून ठेवावे. लगेच केस धुवू नयेत.
6) कितीही काम असले तरी तेल न लावता केस धुवू नयेत. अशाने केस कोरडे होतात व जास्त तूटतात.
7) तुमच्या केसांना व स्काल्प ला सूट होईल अशाच तेलाची निवड करावी.


काही महत्वाचे


कोणतेही तेल वापरत असताना त्याचा रिजल्ट तुम्हाला  लगेच दिसणार नाही.
कोणत्याही तेलाचा वापर हा सातत्याने 3 महिने करावा लागतो.
3 महिन्यानंतर तुम्हाला केसांचे गळणे कमी झाल्याचे जाणवेल.
केसांची रिग्रोथ होण्यासाठी तुम्हाला तेलाचा वापर हा सातत्याने 6 ते 7 महिने करावा लागेल.

पटकन रिजल्ट देणाऱ्या तेलांच्या फसव्या जाहिरातींना फसू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या