वजन कसे कमी करावे?

    अति वजन कोणालाच आवडत नाही. वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. कोणी व्यायाम करत, कोणी योगा करत तर कोणी आपल्या आहारामध्ये बदल करत असत.

कोणत्याही गोष्टीवरती उपाय करण्याआधी ती गोष्ट का होतेय हे शोधून काढा. म्हणजे त्यातून उपाय काढणं सोपं जात.


हेही वाचा......पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही 10 व्यायाम प्रकार



वजन का वाढते?

1) योग्य आणि योग्य प्रमाणात आहार न घेणे
2) खूप वेळ बैठे काम करणे
3) व्यायामाचा आळस
4) जंक फूड
5) कमी झोप
6) मानसिक तणाव
7) महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी
8) एखादा दुर्बल आजार
   प्रत्येक व्यक्तीची वजन वाढण्याची कारण वेगवेगळी असतात.

  यावर उपाय काय?how to do

1) आपल्या दिवसाच वेळापत्रक तयार करा. उठल्याबरोबर चहा, कॉफी न घेता कोमट पाणी प्या. त्यामध्ये तुम्ही मध, लिंबू किंवा जिरे सुद्धा मिक्स करु शकता

2) नाष्ट्याची सवय ठेवा. सकाळी 9 च्या आत आपल्या पोटामध्ये नाष्टा हा गेलाच पाहिजे.

3) जेवण वेळेवर आणि पुरेसं करा. जेवणामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा आहार घ्या.जेवणामध्ये काकडी, गाजर, बीट यांचाही समावेश असू द्या.


4) 4 ते 6 च्या दरम्यान एखाद फळ खा.फळामध्ये सिझन नुसार जे काही उपलब्ध असेल त्या फळांचा समावेश करा.

5) रात्रीचा आहार हा हलका असू द्या म्हणजे खूप पोट भरुन नको. त्यामध्ये तुम्ही खिचडी भात किंवा एक भाकरी आणि भाजी यांचा समावेश करु शकता.

6) सगळ्यात महत्वाचे आपल्या शरीराला पुरेशी झोप मिळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा ना काही लोक खूप कमी खातात तरीही त्यांचं वजन वाढत. याच कारण म्हणजे पुरेशी झोप न होणं. त्यामुळे रात्रीची झोप ही चांगली झालीच पाहिजे. तरच तुम्ही घेतलेला आहार व्यवस्थित पचेल आणि आपलं वजनही आटोक्यात राहील.

7) व्यायामाची सवय


यामध्ये तुम्ही तुमच्या शरीराला झेपेल असाच व्यायाम निवडा. काही जण लवकर वजन कमी करण्याच्या नादात अति व्यायाम करतात. असे केल्याने हर्टअटॅक येण्याची शक्यता असतें. कुठलीही गोष्ट आपण अति केली की आपल्या हृदयावर ताण येतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करु नका.तुम्हाला योगा आवडत असेल तर तुम्ही योगा करा, काहीजण जिम जॉईन करतात, काहीजण सकाळी उठून चालायला जातात. आपल्याला जे आवडत ना ते आपण खूप मनापासून करतो त्यामुळे व्यायाम सुद्धा तुम्हाला आवडेल आणि झेपेल असाच निवडा.

नक्की वाचा.....तुळशीचे पान सर्दी खोकल्यासाठी गुणकारी

लक्षात ठेवा प्रत्येकाचे शरीर हे वेगवेगळे असतें. शरीराला कोणत्याही गोष्टीची सवय होण्यासाठी वेळ हा द्यावा लागतो. तुम्ही व्यायाम करा किंवा डाईट करा जेव्हा तुम्ही त्यात सातत्य ठेवाल तेव्हाच तुम्हाला फरक जाणावेल.चार दिवस प्रयोग करुन काहीच होणार नाही, 3 ते 4 महिने तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागेल तेव्हाच तुम्हाला फरक जाणावेल.

फक्त अतिरेक टाळा आणि सातत्य ठेवा.

हेही वाचा......उन्हाळ्यात येणारा घाम आणि घामोळ्या पासून कसे वाचावे?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या