तुळशीचे पान सर्दी, खोकल्यासाठी गुणकारी.

बदलत्या वातावरणामुळे आजारी पडण्याचे प्रमाण आजकाल खूप वाढले आहे. म्हणजे खोकला जर सुरु झाला तर तो काही वेळेला अगदी महिनाभर आपल्याकडे मुक्कामाला असतो.

सर्दी सुद्धा चार दिवस आली तरी अशक्तपणा मात्र 15 दिवस देऊन जाते. मग अशा वेळेला कितीही टॅबलेट घेतल्या तरी सर्दी खोकल्यामुळे आलेला अशक्तपणा जायला अगदी महिना जातो.
सर्दी खोकला झाल्यावर आपण काही घरगुती उपाय सुद्धा शोधत असतो. मी केलेला एक घरगुती उपाय सांगते..... हा उपाय तुम्हाला सर्दीच्या ऍलर्जी साठी सुद्धा उपयुक्त ठरेलं.how to do

तो म्हणजे तुळशीचे पान

आता आपल्याकडे प्रत्येक घरात तुळस आहे. आपण तिला देवासमान मानून तिची पुजाही करतो. पण हीच तुळस आपल्याला आपल्या आरोग्यासाठी सुद्धा गुणाकारी आहे.


तर करायचं काय?how to do

1) सर्दी जर ऍलर्जी स्वरूपात असेल तर.....

बऱ्याच जणांना सकाळी उठल्यावर खूप शिंका येतात.आता ही सर्दी नसते. म्हणजे शिंका फक्त सकाळी उठल्यावर येतात नंतर दिवसभर काहीच होत नाही. तर अशा वेळेला सकाळी उठल्यावर, ब्रश करुन झाल्यावर तुळशीचे एक पान चघळून खायचे आहे. हे तुम्हाला जवळजवळ सहा महिने करायचं आहे. मी स्वतः हा उपाय केला आहे.

मला दोन वर्षे सर्दी,शिंका याचा त्रास होता.काही केल्या कमी होत नव्हता. मी रोज सकाळी उठल्यानंतर तुळशीचे एक पान खायचे. आता चार वर्षे झाले मला कसलाच त्रास नाहीये.

आयुर्वेदिक उपयांनी फरक पडायला वेळ लागतो.परंतु तो फरक कायम स्वरूपाचा असतो.

2) सतत खोकला किंवा ठसका येणे....

काही जणांचा खोकला बरेच दिवस असतो. आणि त्यातली त्यात जर तो खोकला कोरडा असेल मग तर तो काही केल्या लवकर बरा होत नाही. तर अशा वेळेला करायचे काय?

तर तुळशीची चार ते पाच पाने घेऊन एक कप पाण्यात ती उकळून घ्यायची आणि पाणी अर्धे होई पर्यंत उकळत ठेवायचे आणि पाणी थोडे थंड झाले की पिऊन द्यायचे. असे तुम्ही एक आठवडा करा तुम्हाला फरक नक्की जाणवेल.

माझ्या मुलीला जेव्हा खोकला होतो. तेव्हा मी हा उपाय करते आणि तिला फरकही पडतो. त्यामुळे लहान मुलांना जर खोकला असेल तर तुम्ही हा उपाय करु शकता.


हेही वाचा........आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर हे करा.

3) लहान मुलांचा सर्दी खोकला......

लहान मुलं आजारी पडले की, आपल्याला काहीच सुचत नाही. आणि त्यात जर मुलांना सर्दी खोकला असेल तर मग मुलं अगदी कोमेजून जातात.

अशा वेळेला, एक तांब्याचे भांडे घेऊन त्यात पाणी भरुन त्यामध्ये तुळशीची चार ते पाच पाने टाकून ती रात्रभर तशीच ठेवायची आणि दुसऱ्यादिवशी त्या तांब्याच्या भांड्यातील थोडे थोडे पाणी मुलांना देत राहायचे. त्यामुळे मुलांमध्ये जो सर्दी खोकल्यामुळे अशक्तपणा आलाय तो कमी होण्यास मदत होते.

अशा प्रकारे आपल्या घरामध्ये असलेली ही तुळस आपल्याला खूप वेगवेगळ्या आजारावर उपयुक्त ठरते. उपाय नक्की करुन बघा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या