उन्हाळ्यात आपल्याला टेन्शन असतें आपल्या त्वचेचे. आपण दिवसभर घरात जरी असलो तरी वातावरणातील गरमाई मुळे आपली त्वचा थोडीशी का असेना निस्तेज दिसायला लागते. आणि त्यात ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांना उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी लागते
बरेच लोक कामानिमित्ताने बाहेर जात असतात. काही लोक गाडीवर प्रवास करतात. त्यामुळे त्वचा अजून काळी पडते. महिला गाडीवर प्रवास करताना स्कार्प बांधतात पण फक्त स्कार्प बांधून सुद्धा सूर्यकिरणाचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर होत असतो. काही जणांची चेहऱ्याची स्किन ही खूप सेन्सिटिव्ह असतें अशी लोक उन्हात गेली की त्यांचा चेहरा लालबुंद होतो.
मग आता उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी, हे बघू how to do
उन्हाळ्यामध्ये त्वचेसाठी एक रुटीन ठेवावे लागते.
ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी काय करावे?how to do
चेहऱ्याची त्वचा ऑईली असणाऱ्या लोकांना उन्हाळ्यात त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. कारण चेहरा तेलकट असेल तर तो खूप विचित्र लुक देतो.
मग तुम्ही चेहरा कितीही वेळा धुवा. क्रिम लावा तरी तो पुन्हा पुन्हा तेलकट होतो.
हेही वाचा.....केसांची निगा राखताना होणाऱ्या चूका
यावर उपाय काय.
1)ऑइल फ्री फेसवॉशचा वापर करा.
बऱ्याच वेळेला आपण एकच फेसवॉश बाराही महिने वापरत असतो. ऋतू बरोबर आपण आपला फेसवॉश सुद्धा बदलला पाहिजे.
जर तुमची त्वचा ऑईली आहे तर फेसवॉश घेताना व्हिटॅमिन C ऑइल फ्री फेसवॉश निवडा. आणि त्याचा वापर दिवसातून दोनदाच करा. कारण जास्त फेसवॉशचा वापर सुद्धा त्वचेसाठी हानिकारक आहे.
ऑइल फ्री फेसवॉश तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त ऑइल कन्ट्रोल करायला मदत करतो.आणि त्यात व्हिटॅमिन c असेल तर उन्हामुळे झालेले टॅनिंग दूर व्हायला मदत होते.
2) जर तुम्ही रोज Serum , Moisturizer , किंवा तुमची रेगुलर day cream वापरत असाल तर,
काही लोक हिवाळ्यात घेतलेले ब्युटी प्रोडक्ट उन्हाळ्यात सुद्धा वापरत असतात. हिवाळ्यातील मोईश्चरायजर, लोशन हेच आपण उन्हाळ्यात सुद्धा वापरत बसतो.
हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी असते, त्यामुळे आपण प्रोडक्ट घेताना माझ्या त्वचेचा कोरडेपणा कसा दूर होईल त्या बेसवर ते प्रॉडक्ट घेत असतो.
सिरम किंवा day cream निवडताना सुद्धा ऑइल फ्री निवडा. त्यामध्ये तुम्ही तुमच्या स्किनला सूट होणाऱ्या ब्रँड चे प्रोडक्ट वापरा.
जसं की, Lakme चे हे परफेक्ट रेडियन्स क्रिम . तुम्ही दिवसातून दोन वेळ जरी वापरले तरी तुमचा चेहरा ऑइल फ्री राहतो. आणि चेहऱ्यावर जास्त काही लावायची गरजही पडत नाही. Depend on your skin.how to do
3) Sunscreen वापरायची सवय ठेवा.
बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय असतो की, स्किन तर छान हवीय पण त्यासाठी खर्च करायचा नसतो. आणि उन्हाळा हा ऋतू असा आहे की जर तुम्हाला तुमचा चेहरा उन्हापासून सुरक्षित ठेवायचा असेल तर तुम्हाला sunscreen वरती पैसे खर्च करावेच लागणार.
आता हे sunscreen निवडताना SPF 50 निवडा. जे तुमच्या चेहऱ्यावर एका सुरक्षा कवचासारखं काम करते.
कोणतेही sunscreen घेतल्यानंतर आधी पॅच टेस्ट घ्या. कारण त्यातील केमिकलचा चुकून तुमच्या चेहऱ्यावर वेगळा इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे कोणतही प्रोडक्ट घेऊन डायरेक्ट चेहऱ्यावर लावू नका.
4) बाहेरून आल्यावर चेहरा स्वच्छ धुवा.how to do
आपण काय करतो की, बाहेरून आल्यावर तसेच इकडेतिकडे फिरत बसतो, नाहीतर कंटाळा आला आहे म्हणून झोपी जातो.
उन्हाळ्यामध्ये धुळीचे कण सगळीकडे असतात. आपण जेव्हा बाहेर असतो तेव्हा ते आपल्या चेहऱ्यावर बसतात आणि घरी आल्यावर चेहरा न धुतल्यामुळे ते तसेच आपल्या चेहऱ्यावर राहतात. मग त्याचा इफेक्ट म्हणजे पिंपल्स, चेहऱ्यावरचा ग्लो जाणे, चेहरा काळवंडणे.
जर तुम्हाला तुमची स्किन छान टवटवीत हवी असेल तर कंटाळा करु नका. बाहेरून आल्यावर चेहरा सध्या पाण्याने धुवा.
5) काही घरगुती उपाय.
काही जणांचा ब्युटी प्रोडक्ट पेक्षा घरगुती उपायांवर जास्त विश्वास असतो.
- चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी तुम्ही बर्फचा वापर करु शकता. सकाळी झोपेतून उठल्यावर एक बर्फचा तुकडा घेऊन तो एका कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या चेहऱ्यावर मसाज केल्यासारखा फिरवत राहा. जास्त प्रमाणात बर्फचा वापर करु नका. चेहरा सुन्न झाल्यासारखा वाटू लागलं की बर्फचा मसाज थांबवा.
- आठवड्यातून एकदा फेसपॅक लावा. त्यामध्ये तुम्ही बेसन, दूध, हळदी, तांदळाचे पीठ, गुलाबजल, अशा वेगवेगळ्या समर्गीचा वापर करुन फेसपॅक बनवू शकता.पण लक्षात ठेवा हा घरी तयार केलेला पॅक चेहऱ्यावर जास्त वेळ लावून ठेऊ नका. त्यामुळे चेहऱ्याची त्वचा ओढून धरली जाते. पॅक सुकला की तो पाण्याच्या साहाय्याने काढून टाका.
- सिरम म्हणून तुम्ही काकडीचा रस, कलिंगडाचा रस, लेमन जूस,बीटचा रस अशा वेगवेगळ्या प्रकारचा रस चेहऱ्यावर लावू शकता. त्यामुळे चेहरावर ग्लो यायला मदत होईल.
हेही वाचा.....वजन कसे कमी करावे
6) पाणी भरपूर प्या.
उन्हाळ्यात तहान तर खूप लागते पण कामाच्या गडबडीत आपण हवे तेवढे पाणी पीत नाही.त्यामुळे बऱ्याच वेळेला त्याचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर आणि ओठांवर दिसतो. तुम्ही निरीक्षण करा उन्हाळा असून सुद्धा आपलें ओठ उललेले असतात. त्याचे कारण म्हणजे पाण्याची कमतरता.
बाहेर कामासाठी जाताना नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवा.
तुम्हाला साधं पाणी पिऊ वाटत नसेल तर ते जूस च्या स्वरूपात घ्या. लिंबू रस प्या, उन्हाळ्यात कलिंगडचा सीजन असतो. तुम्ही त्याचा जूस करुन पिऊ शकता. आंब्याचे पन्हे करा. म्हणजे ज्यातून तुम्हाला पाणी सुद्धा मिळेल आणि पोट सुद्धा भरेल असे जूस तुम्ही घेऊ शकता.
उन्हाळ्यात चेहऱ्याची जेवढी काळजी घ्याल तेवढा चेहरा छान राहील. फक्त चेहऱ्याची काळजी घेण्याबाबत आळस करु नका.
0 टिप्पण्या