आपण मार्केट मध्ये अनेक प्रकारचे सिरम बघत असतो. परंतु नेमके कोणते सिरम वापरावे? कसे वापरावे? कोणती काळजी घ्यावी? याविषयी जर आपल्याला ज्ञान नसेल तर आपण वापरत असलेल्या सिरमचा आपल्याला फायदा होणार नाही.how to दोन
Table of content
सिरमचे प्रकार कोणते?
प्रत्येक सिरमचा वापर कसा करावा?
सिरम लावल्याने चेहऱ्यासाठी कोणते फायदे होतात?
हे आपण जाणून घेऊ,
1) Hyaluronic acid serum
हे सिरम कोणत्या वयामध्ये लावावे?
Hyaluronic acid serum वयाच्या 25 नंतर वापरावे.
वापरण्याची योग्य वेळ कोणती?
Hyaluronic acid serun फक्त दिवसा वापरायचे आहे.
कोणत्या स्किनसाठी योग्य आहे?
हे सिरम all skin type साठी आहे.
प्रत्येकजण या सिरमचा वापर करु शकतात.
सिरम लावण्याची पद्धत कोणती?
सर्वप्रथम चेहरा फेसवॉशने स्वच्छ करा.
त्यानंतर टोनर लावा.
नंतर hyaluronic acid serum लावा.
त्यावर तुमचे daily moisturiser लावा.
आणि नंतर लगेच sunscreen लावा.
या सिरमचा फायदा कसा होतो?
चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होण्यास मदत होते.
निस्तेज दिसणाऱ्या त्वचेवर चमक येते.
डेड स्किन रिमूव्ह होण्यास मदत होते.
ओपन पोर्स साठी या सिरमचा उपयोग होतो.
2) Salicylic acid serum
हे सिरम कोणत्या वयामध्ये वापरावे?
ज्या वयामध्ये तुम्हाला पिंपल्स यायला सुरुवात होते तेव्हापासून तुम्ही हे सिरम वापरू शकता.
वापरण्याची योग्य वेळ कोणती?
Salicylic acid serum फक्त रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावायचे आहे. दिवसा या सिरमचा वापर करायचा नाही. जर तुम्ही दिवसा कुठे बाहेर जाणार नसाल तर आठवड्यातून दोन वेळा सकाळी हे सिरम चेहऱ्यावर लावू शकता.हे सिरम आठवड्यातून 2 ते 3 वेळा चेहऱ्यावर लावायचे आहे. रोज या सिरमचा वापर करायचा नाही.
कोणत्या स्किनसाठी योग्य आहे?
हे सिरम फक्त पिंपल्स, acne, निस्तेज दिसणारी त्वचा यासाठी उपयुक्त आहे.
सिरम लावण्याची पद्धत कोणती?
सर्वप्रथम चेहरा फेसवॉश ने स्वच्छ करा.
नंतर Salicylic acid serum चेहऱ्यावर लावा.
हलक्या हाताने हे सिरम चेहऱ्यावर पसरवा.
त्यावर तुमचे daily moisturiser लावा.
आणि झोपून जा.
दिवसा हे सिरम चेहऱ्यावर लावायचे असेल सिरम लावल्यानंतर sunscreen नक्की लावायचे आहे.
या सिरमचा फायदा कसा होतो?
हे Salicylic acid serum पिंपल्स आणि निस्तेज त्वचेसाठी असल्यामुळे रात्रभर ते आपले काम करते.
पिंपल्स वरील सूज कमी करते.
डेड स्किन रिमूव्ह करण्यास मदत करते.
ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स वरती उपयुक्त आहे.
वारंवार चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्स ला रोखते.
3) Glycolic acid serum
हे सिरम कोणत्या वयामध्ये वापरावे?
Glycolic acid serum शक्यतो वयाच्या 22 ते 23 वर्षानंतर वापरण्यास सुरुवात करावी.
वापरण्याची योग्य वेळ कोणती?
Glycolic acid serum तुम्ही सकाळी सुद्धा वापरू शकता व रात्री सुद्धा वापरू शकता.
कोणत्या स्किन साठी योग्य आहे?
ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स चे डाग आहेत, वयानुसार चेहऱ्यावर वांग आला आहे, चेहरा निस्तेज झाला आहे अशा व्यक्तींसाठी हे सिरम अत्यंत उपयुक्त आहे.
सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्या व्यक्तींना हे सिरम लावताना थोडी काळजी घ्यायची आहे.अशा व्यक्तींनी या सिरम चा वापर रोज न करता टप्प्यानुसार करायचा आहे.
आठवड्यातून एकदा, त्यानंतर दोनदा, त्यानंतर 3 ते 4 वेळा. असे करत प्रमाण वाढवायचे आहे.
सिरम लावण्याची पद्धत कोणती?
चेहरा फेसवॉशने स्वच्छ करा.
टोनर लावा.
त्यावर हे Glycolic acid serum लावा.
तुमचे daily moisturiser लावा.
त्यावर sunscreen लावा.
या सिरमचा फायदा कसा होतो?
त्वचेवर असणारे डाग जाण्यास मदत होते.
डेड स्किन रिमूव्ह होण्यास मदत होते.
चेहऱ्यावर चमक येते.
ओपन पोर्स साठी या सिरमचा फायदा होतो.
4) Retinol - vitamin E serum
हे सिरम कोणत्या वयामध्ये वापरावे?
हे Retinol - vitamin E serum तुम्ही वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता.
25 वयोगट - आठवड्यातून 2 ते 3 वेळा.
30 ते 40 वयोगट - आठवड्यातून 4 ते 5 वेळा.
40 वयानंतर - आठवड्यातून 5 ते 6 वेळा.
वापरण्याची योग्य वेळ कोणती?
हे Retinol - vitamin E serum फक्त रात्री चेहऱ्यावर लावायचे आहे.
दिवसा या सिरमचा वापर करायचा नाही.
कोणत्या स्किन साठी योग्य आहे?
ज्यांची स्किन ड्राय आहे, चेहऱ्यावरती टॅनिंग झालं आहे, अशा स्किन साठी हे Retinol - vitamin E serum खूप उपयुक्त आहे.
सिरम लावण्याची पद्धत कोणती?
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा.
त्यानंतर हे सिरम चेहऱ्यावर लावा.
तुमचे daily moisturiser त्यावर लावा
आणि झोपून जा.
या सिरमचा फायदा कसा होतो.
चेहऱ्याची त्वचा मुलायम होते.
उन्हामुळे कळवंडलेला चेहरा उजळतो.
डेड स्किन रिमूव्ह होण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील तेलकट पणा कमी होतो.
5) vitamin C serum
हे सिरम कोणत्या वयामध्ये वापरावे?
वयाच्या 20 वर्षानंतर तुम्ही या vitamin C serum चा वापर करु शकता.
वापरण्याची योग्य वेळ कोणती?
Vitamin C serum दिवसा व रात्री दोन्ही वेळेला वापरू शकता.
कोणत्या स्किन साठी योग्य आहे?
Vitamin C serum all skin type साठी आहे.ड्राय स्किन व ऑइली स्किन साठी व्हिटॅमिन C सिरम घेताना त्यातील घटक बघून घ्यावे.
सिरम लावण्याची पद्धत कोणती?
चेहरा फेसवॉश ने स्वच्छ करा.
त्यावर हे व्हिटॅमिन C सिरम लावा.
नंतर तुमचे रेगुलर moisturiser लावा.
आणि त्यावर sunscreen लावा.
या सिरमचा फायदा कसा होतो?
चेहरा उजळण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील तेलकट पणा कमी होतो.
पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी होते.
चेहरा मुलायम राहतो.
काही महत्वाच्या टिप्स.
1) कोणतेही सिरम जर तुम्ही पहिल्यांदा वापरत असाल तर त्याचा ratio 0.05 असावा
अगदी 20 ते 30 % पासून सुरुवात करु नये.
2) तुमच्या चेहऱ्याला त्या सिरमची सवय लागेपर्यंत त्याचा ratio कमीच ठेवावा व हळूहळू वाढवत जावा.असे केल्याने चेहऱ्यावर कोणतेही साईट इफेक्ट होणार नाहीत.
3) पहिल्यांदा सिरम चेहऱ्यावर लावताना त्याचा वापर रोजरोज करु नये. सुरुवातीला आठवड्यातून 2 वेळा, नंतर 3 वेळा, नंतर हळूहळू वापर वाढवावा.
4) कोणतेही सिरम खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती घ्यावी.
5) तुमची त्वचा कशा प्रकारची आहे त्यानुसार सिरम खरेदी करावे.
6) दिवसा सिरम चेहऱ्यावर लावल्यानंतर sunscreen नक्की लावावे.
0 टिप्पण्या