आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स का येतात?
1) हार्मोन्स चेंजेस.
2) धूळ, प्रदूषण.
3) वारंवार चेहऱ्यावर हात फिरवणे.
4) योग्य आहार न घेणे.
5) मासिक पाळीचे चक्र व्यवस्थित न असणे.
Table of content
वरील सगळी कारणे आपल्याला माहित आहेत.चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग कसे घालवायचे यासाठीचे बरेच घरगुती उपाय सुद्धा आपल्याला माहित आहेत. परंतु बऱ्याच वेळा काही घरगुती उपाय करुन सुद्धा हवा तसा फरक दिसत नाही. असे का होते?
1) घरगुती उपाय करताना त्यासाठी वापरणाऱ्या घटकांची पूर्ण माहिती न घेणे.
2) कोणताही घरगुती पॅक लावला की लगेच दुसऱ्या दिवशी दुसरा उपाय करणे.
3) घरगुती फेस पॅक लावण्याची योग्य पद्धत आणि वेळ माहित नसणे.
4) झटपट फरक पडेल ही चुकीची अपेक्षा ठेवणे.
चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग आपण बऱ्याच घरगुती उपयांनी घालवू शकतो.परंतु बऱ्याच वेळेला चुकीच्या माहितीमुळे आपण काही चूका करुन बसतो.त्यासाठी कोणती काळजी घ्यावी?how to do
1) चेहऱ्यावर वाफ घेताना होणाऱ्या चूका.
चेहऱ्याला वाफ घेतल्याने आपल्या चेहऱ्यावरील रोम छिद्रे मोकळे होतात आणि त्वचेवर छान ग्लो येतो. चेहऱ्यावरील पिंपल्स व डाग घालवण्यासाठी जेव्हा आपण एखाद्या डॉक्टर कडे जातो तेव्हा आपल्याला दिवसातून एकदा वाफ घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु वाफ घेण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. आणि त्यात जर चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर खूप काळजी घ्यावी लागते.
1) वाफ जर तुम्ही स्टीमरने घेत असाल तर वाफ फक्त 10 मिनिट घ्या. चेहरा स्टीमर पासून जरा लांब असू द्या.
2) वाफ घेताना खूप घाम आला म्हणजे खूप चांगला फरक पडेल हा गैरसमज आहे. अति वाफ तुमच्या चेहऱ्यावरील स्किनला बर्न करते.
3) पाणी गरम करुन वाफ घेत असाल तर पाणी खूप उकळवू घेऊ नका. वाफेपासून चेहरा थोडा लांब ठेवा आणि अगदी 5 मिनिट वाफ घ्या.
4) वाफ घेतल्यानंतर चेहऱ्याला mousturezer लावा आणि शक्यतो सूर्यकिरणाच्या संपर्कात लगेच जाणे टाळा.
2) लिंबू डायरेक्ट चेहऱ्यावर कधीही लावू नये.
लिंबाचा रस आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी वरदान आहे, हे सर्वांना माहित आहे. म्हणून फक्त लिंबाचा रस डायरेक्ट कधीच चेहऱ्यावर लावू नये. कारण लिंबाच्या रसामुळे स्किन जशी रिपेअर होते तशीच ती कोरडी / ड्राय सुद्धा पडते.
लिंबाचा रस चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत कोणती?
लिंबाचा रस चेहऱ्यावर लावताना त्यात ग्लीसरिन किंवा गुलाबपाणी मिक्स करावे.लिंबाचे दोन ते तीन थेंब गुलाब पाणी किंवा ग्लीसरिन मध्ये टाकून फक्त पिंपल्स वरती हे मिश्रण लावावे. यामध्ये आपण एक चुक करतो ती म्हणजे, रात्रभर हे मिश्रण चेहऱ्यावर लावून ठेवतो. असे करु नये. त्यामुळे पिंपल्स च्या आजूबाजूची त्वचा काळी पडते.लिंबाचा रस चेहऱ्यावर फक्त अर्धा तास लावावा. त्यामुळे पिंपल्स वरील सूज कमी होते. त्यानंतर पुढचे 12 तास चेहऱ्यावर काहीही लावू नये.लिंबाचा वापर चेहऱ्यासाठी वारंवार न करता आठवड्यातून एकदाच करावा. त्यामुळे पिंपल्स जाण्यास मदत होईल. शिवाय पिंपल्स मुळे आलेले काळे डाग सुद्धा जातील व त्वचा कोरडी पडणार नाही.
3) हळद चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत.
बऱ्याच फेस पॅक साठी आपण हळदीचा वापर करत असतो.
परंतु हळद किती प्रमाणात वापरावी व हळदीचा फेस पॅक किती वेळ चेहऱ्यावर ठेवावा? हे कळणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे.
1) बेसन पॅक तयार करताना त्यात तुम्ही हळद टाकत असाल तर ती अगदी चिमूटभर टाका. कारण बेसन मुळे त्वचा थोडी ओढली जाते. आणि त्यात हळदीचे प्रमाण जास्त असेल तर त्वचा अजून ड्राय होते. शिवाय हळदीचा पिवळा रंग त्वचेला तसाच राहतो.
2) बरेच जण दही आणि हळद मिक्स करुन चेहऱ्यावर लावतात. त्यात सुद्धा हळदीचा वापर प्रमाणात असावा. दह्या मध्ये थोडासा तेलकट पणा असतो. दह्यामुळे पिंपल्स जाण्यास मदत होते परंतु त्यात हळदीचे प्रमाण जास्त असेल तर चेहऱ्यावर रॅशेष येतात. आपल्या चेहऱ्याचा जो भाग संवेदनशील आहे त्या भागावर थोडी खाज यायला सुरुवात होते. त्यामुळे दह्यामध्ये हळद अगदी थोडीशी टाका.
3) हळदीचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर तो जास्त काळ चेहऱ्यावर ठेऊ नये.हा पॅक 10 ते 15 मिनिट चेहऱ्यावर ठेऊन पाण्याने चेहरा धुवावा.
4 ) हळदीचा फेस पॅक धुताना कधीही साबण किंवा फेसवॉश चा वापर करु नये. फक्त पाण्याच्या साहाय्याने चेहरा धुवावा. कारण हळदीचा प्रभाव तुमच्या चेहऱ्यावर दिसण्यासाठी 12 ते 24 तास द्यावे लागतात.
5) हळदीचा फेस पॅक चेहऱ्यावर नेहमी सुट्टीच्या दिवशी लावावा. कारण हळदीचा वापर तुम्ही चेहऱ्यावर केला आणि सूर्यप्रकाशात गेला तर चेहऱ्याचा रंग बदलतो आणि चांगला परिणाम होण्याऐवजी त्याचा साईट इफेक्ट होतो. त्यामुळे हळदीचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर कमीतकमी 8 ते 9 तास सूर्याच्या संपर्कात येऊ नका.
4) पिंपल्स जाण्यासाठी लसूण किंवा दालचिनी वापरत असाल तर....how to do
बऱ्याच ठिकाणी पिंपल्स जाण्यासाठी लसूण किंवा दालचिनी वापरण्याचा सल्ला दिला जातो. याने पिंपल्स जायला मदत होते परंतु त्याचा वापर जर योग्य प्रकारे झाला नाही तर आपल्या चेहऱ्याचे नुकसान होते.
लसूण हा antibacterial असल्यामुळे तो पिंपल्स ला पसरण्यापासून थांबवतो.परंतु हा लसूण वापरायचा कसा? याची एक पद्धत आहे.
1) लसूण ठेचून तो चेहऱ्यावर सगळीकडे लावायचा नाहीये. तर लसूनचा रस हा ज्या ठिकाणी पिंपल्स आहेत त्याच भागावर फक्त 20 ते 30 सेकंड लावायचा आहे आणि लगेच पाण्याने चेहरा स्वच्छ करायचा आहे.
2) लसूणचा रस जर तुम्ही चेहऱ्यावर खूप वेळ ठेवला तर चेहऱ्यावर जळल्यासारख्या खुणा निर्माण होतात.
3) लसूण ठेचून कधीच लावू नये फक्त त्याचा थोडासा रस लावावा.
4) लसूण किंवा लसूणचा रस कोणत्याही फेस पॅक मध्ये मिक्स करु नये. लसूणचा रस आठवड्यातून एकदा आणि फक्त 30 सेकंडासाठी लावावा.
दालचिनी मध्ये सुद्धा antibacterial गुणधर्म असल्यामुळे ते पिंपल्स व चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यास मदत करते.दालचिनीचा वापर करताना सुद्धा एक प्रकारची काळजी घ्यावी लागते.
1) घरीच दालचिनीचा स्क्रब तयार करुन वापरू नका. कारण दालचिनी जर चांगल्या प्रकारे बारीक झाली नाही तर त्याचा स्क्रब चेहऱ्याला इजा करु शकतो.
2) दालचिनीचा फेस पॅक तयार करुन लावायचा असेल तर दालचिनी एकदम पावडर स्वरूपात बारीक असायला हवी.
3) दालचिनीचा फेस पॅक तयार करताना त्यात शक्यतो फक्त गुलाब पाणी किंवा दूध मिक्स करा. बाकी स्ट्रॉंग घटक जसं की लिंबाचा रस / संत्र्याचा रस मिक्स करु नका. कारण दालचिनी गरम असतें आणि त्यात जर स्ट्रॉग घटक मिक्स केले तर चेहरा लाल पडतो.
4) दालचिनीचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर बाहेर जाणे टाळा. चेहऱ्यावरील फेस पॅक काढताना चेहरा रगडू नका. फक्त कोमट पाण्याच्या साहाय्याने अगदी अलगद हा फेस पॅक चेहऱ्यावरून काढा.
5) दालचिनी चेहऱ्यासाठी पंधरा दिवसातून एकदाच लावा. दालचिनीची गणना गरम मसाल्यामध्ये होत असल्यामुळे तिचा अति वापर टाळा.
5) कोणताही घरगुती पॅक तयार करताना कोणती काळजी घ्यावी?how to do
1) फक्त इंटरनेट वरती बघून किंवा कोणाच्याही सांगण्यावरून कोणताही फेस पॅक तयार करुन चेहऱ्यावर लावू नका.
2) प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असतें.
• ऑइली स्किन साठी कधीही दही / तापवलेले दूध / ग्लिसरीन फेस पॅक मध्ये वापरू नये.
• ड्राय स्किन साठी कधीही लिंबाचा रस / अति बेसनचा फेस पॅक / अति बर्फचा वापर करणे टाळावे.
3) स्किन वरती जर पिंपल्सचे प्रमाण जास्त असेल तर घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
4) वारंवार चेहऱ्याला हात लावणे, पिंपल्स फोडणे, सतत कोणताही उपाय करत राहणे टाळावे.
5) कोणताही घरगुती उपाय एका रात्रीमध्ये रिजल्ट देत नाही. कोणताही घरगुती उपाय जेव्हा तुम्ही चांगल्या रीतीने करता तेव्हा एक ते दीड महिन्याने तुम्हाला तुमच्या स्किन मध्ये फरक जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे खोट्या अफवांना फसू नका.
0 टिप्पण्या