पार्लर आणि घरगुती उपाय

आपण छान दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असतें आणि त्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. मग त्यासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओ बघतो. गुगल वरती सर्च करतो.वेगवेगळ्या पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळे महागडे फेसिअल, ब्लिच, क्लीनउप करुन घेतो. व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे काही घरगुती उपाय करतो. बेसनचा लेप, टोमॅटो स्क्रब, असे खूप काही वेगवेगळे उपाय आपण करत असतो.

Table of content




पण आपण जे करतो ते झालं वरवरच. आपली स्किन किंवा आपलें केस खराब होण्यापाठीमागे खरं कारण काय आहे तर आपली जीवनशैली.

आपण रोज काय खातो, काय पितो यावर आपली त्वचा आणि आपल्या केसांच आरोग्य अवलंबून असत.

हेही वाचा......उन्हाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

how to do

उदा,

1) तुम्ही तुमच्या जेवणामध्ये रोज तेलकट पदार्थ खाताय.


तर काय होईल तुमच्या त्वचेवर तेलाचा एक थर जमा होईल. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला जाणवेल तुमचा चेहरा आधी पेक्षा जास्त तेलकट दिसतोय. दिवसातून कितीही वेळा चेहरा धुतला तरी तो परत परत तेलकट दिसतो. आणि मग पिंपल्स यायला सुरुवात होतात. त्यावेळी आपण कितीही चेहऱ्यावर काहीही लावले तरी त्याचा इफेक्ट फक्त काही वेळेपूरता होतो.

2) पाण्याची कमतरता


आपल्या शरीराला हवे तेवढे पाणी मिळाले नाही की त्याचा परिणाम आपल्या स्किन वरती दिसायला लागतो. त्वचा निस्तेज दिसायला लागते, कोरडी होते. ज्याला आपण त्वचा उलणे असे म्हणतो.मग आपण वरतून कितीही, कोणत्याही ब्रँडचे लोशन लावले तरी जो ओलसरपणा त्वचेला आतून हवा असतो तो बाहेरून लोशन लावून मिळत नाही. लोशनचा इफेक्ट फक्त काही तासापूरता असतो.

3) झोपेची कमतरता


हल्ली खूप कमी वयाच्या मुलांमध्ये डार्क सर्कल हा प्रकार आढळून येतो, याच कारण आहे झोपेची कमतरता. आता डार्क सर्कल जाण्यासाठी काही जण डोळ्यावरती काकडी ठेवतात. बर्फचा वापर करतात, वेगवेगळ्या महागड्या क्रिमचा वापर करतात, पण तुमच्या शरीराला हवी असणारी 8 ते 9 तासाची झोप मिळत नसेल तर हे काकडी गाजर डोळ्यावर ठेऊन काहीच उपयोग होणार नाही.

4) जेवनामध्ये सॅलड न खाणे.


हल्ली लोक काकडी,गाजर, बीट खाण्यापेक्षा ते चेहऱ्यावर लावणं जास्त पसंद करतात. त्याचा रस काढून लावणे,त्याचा फेस पॅक तयार करुन लावणे. पार्लर मध्ये जाऊन त्याचे फेसिअल करणे. पण जर हे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये खाल्लं तर त्याचा किती चांगला परिणाम होईल याचा विचार कोणीच करत नाही.

5) जीवनसत्वाची कमतरता.


हल्ली आपण बघतो केस गळण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. लोक केसांची गळती थांबवण्यासाठी हवा तेवढा पैसा खर्च करत आहेत. कोणी डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेत आहे, कोणी पार्लरमध्ये जाऊन स्पा करत आहे. परंतु केस का गळत आहेत, आपल्या शरीरात काय कमी आहे हे कोणीच बघत नाही.

लोक एवढे हुशार आहेत की डॉक्टरांकडे जाऊन B12, व्हिटॅमिन D च्या गोळ्या घेतील पण घरी मेथीची भाजी, पालकची भाजी, अंडी,नारळपाणी, सकाळचं कोवळ ऊन घेणार नाहीत.how to do
तुम्ही जे व्हिटॅमिन टॅबलेट खाऊन घेताय ते तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात सुद्धा घेऊ शकता. पार्लरमध्ये जाऊन महागडे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा ते पैसे तुमच्या आहारावर खर्च करा. रोज एक तरी सिझनेबल फळ खावा, पाणी भरपूर प्या, झोप व्यवस्थित घ्या. काही दिवसाने तुम्हाला तुमच्या शरीरात होणारा बदल जाणवेल. तुमची त्वचा तुमच्या केस गळतीमध्ये झालेला फरक तुम्हाला जाणवेल. बघा आज पासूनच सुरुवात करा.




काही महत्वाचे

जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेसाठी किंवा केसांसाठी कोणते उपाय करता किंवा तुमचा आहार त्या दृष्टीने घेता, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की आज तूप खाल्लं म्हणजे लगेच उद्या रुप येणार नाही. काही गोष्टी तुम्हाला सातत्याने कराव्या लागतात तेव्हा कुठे 2 ते 3 महिन्याने तुम्हाला रिजल्ट दिसायला लागतो. त्यामुळे जे काही कराल त्यात सातत्य ठेवा.
कोणत्याही फसव्या जाहिरातींना फसू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या