उन्हाळ्यात धूळ, माती, प्रदूषण आणि घाम यामुळे केस खराब होतात. तेलकट होतात.
काहीजण जॉबच्या निमित्ताने रोजरोज बाहेर जातात.उन्हामुळे आणि घामामुळे केस तूटतात आणि केसातून वास यायला सुरुवात होते. आपण रोज रोज केस धुवू शकत नाही मग अशात केसांची काळजी घेणार कशी?
आपण काही घरगुती उपाय पाहू! ज्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा तुमचे केस चांगले राहतील.how to do
Table of content
केसांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय
5) केसांची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स
1) कोरफड
आपल्या सर्वांनाच माहित आहे की कोरफड आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी किती फायद्याची आहे. कोरफड मध्ये असणारे व्हिटॅमिन E, C, A आणि B12 तुमच्या केसांना पोषण देण्यास मदत करते.शिवाय कोरफड थंड असल्यामुळे ती केसांना लावल्यानंतर आपल्या केसांना सुद्धा थंडावा मिळतो.कोरफड मुळे केस गळायचे थांबतात शिवाय केसांना शाईन सुद्धा येते. उन्हाळ्यात घामामुळे तेलकट दिसणारे केस कोरफड च्या वापरामुळे छान राहतात आणि तेलकटपणा सुद्धा कमी होतो.
हेही वाचा......उन्हाळ्यात येणारा घाम आणि घामोळ्या पासून कसे वाचावे?
आता करायचं काय आहे तर,how to do
केस धुण्याआधी एक तास केसांना हा कोरफडीचा गर लावायचा आहे.
कोरफड मध्ये तुम्ही लिंबू सुद्धा मिक्स करु शकता. त्यामुळे केसांमध्ये जर कोंडा झाला असेल तर तो कोंडा कमी होण्यास मदत होते.
कामामुळे तुम्हाला कोरफड केसांना लावणे शक्य नसेल तर त्याचा वापर तुम्ही शाम्पूमध्ये सुद्धा करु शकता. केस धुण्यासाठी तुम्ही जो शाम्पू वापरता त्यात कोरफडचा गर मिक्स करा आणि केस धुवा. केसांना छान चमक येईल.
घामामुळे केस तुटत असतील तर खोबरेल तेला मध्ये कोरफडचा गर मिक्स करा. ते तेल थोडेसे गरम करुन घ्या आणि केसांना लावा. 3 ते 4 तासाने केस धुवा. केस तुटण्याचे प्रमाण कमी होईल.
कोरफडचा वापर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा. उन्हाळ्यात याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.
2) ग्रीन टी
यामध्ये तुम्ही ग्रीन टी पिऊन झाल्यावर जे ग्रीन टी पॅकेट मध्ये उरते ते सुद्धा वापरू शकता.
ग्रीन टी चे 1 किंवा 2 पॅकेट गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिट ठेवा. केस शाम्पूने धुतल्यानंतर तयार केलेले ग्रीन टी चे पाणी केसांवरती ओता. आणि 5 मिनिट केसांना हलक्या हाताने मालिश करुन केस परत धुवा.
या उपायाने केसांची गळती तर थांबतेच शिवाय उन्हामुळे ऑईली आणि निस्तेज झालेल्या केसांना चमक येते.
तुम्ही जर केसांना मेहंदी लावत असाल तर त्यात सुद्धा तुम्ही हे ग्रीन टी वापरू शकता. त्यामुळे केसांची पोत अजून चांगली होते.
ग्रीन टी चे आईस क्यूब तयार करु तुम्ही ते केसांच्या मुळाशी लावू शकता.
ग्रीन टी चे हेअर सिरम सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यामुळे केसांना येणारा घामाचा वास कमी होईल.
हेही वाचा......केसांची निगा राखताना होणाऱ्या चूका
3) लिंबू
उन्हाळ्यात घामामुळे आणि धुळीमुळे केसामध्ये कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. बऱ्याच वेळेला केसामध्ये खाज सुटते.
तर यावर उपाय म्हणून तुम्ही लिंबाचा वापर करु शकता. लिंबामध्ये असणारे व्हिटॅमिन C आपल्या डोक्याची स्काल्प स्वच्छ करायला मदत करते.
फक्त लिंबाचा रस डायरेक्ट केसांना लावू नका तर तुम्ही लिंबाचा रस तेलामध्ये मिक्स करुन लावू शकता. केस धुण्याआधी 1 तास हे लिंबू मिक्स केलेले तेल केसांना लावा. कोंडा कमी होण्यास मदत होईल.
केस खूप गळत असतील तर व्हिटॅमिन E ची एक कॅप्सूल घ्या आणि त्यात 3 ते 4 थेंब लिंबाचा रस मिक्स करा आणि तो फक्त केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मालिश करा. आणि 2 तासाने केस धुवा. यामुळे तुमच्या केसांची मुळे मजबूत होतील. केस गळण्याचे प्रमाण कमी होईल.
केस धुण्यासाठी तुम्ही जो शाम्पू वापरता त्या शाम्पू मध्ये लिंबाचे 4 ते 5 थेंब मिक्स करा आणि केस धुवा. धूळ आणि प्रदूषणामुळे अस्वच्छ झालेले केस स्वच्छ होतील.
घरच्याघरी हेअर स्पा करायचा असेल तर तुमच्या रोजच्या वापरातील कंडिशनर आणि त्यामध्ये लिंबाचे 4 ते 5 थेंब मिक्स करुन हे मिश्रण तुम्ही हेअर मास्कच्या स्वरूपात वापरू शकता. उन्हामुळे रफ झालेले केस मुलायम होण्यास मदत होईल.
4) दही
आपल्या सर्वांना माहित आहे की उन्हाळ्यात दही किती महत्वाचे आहे. रोज एक वाटी दही खाल्ल्याने तुमच्या शरीरातील उष्णता कमी होते. हेच दही उन्हाळ्यात तुमच्या केसांचे सौदर्य सुद्धा वाढवते.
उन्हाळ्यात आपण उकडते म्हणून केसांचा सतत बन करुन ठेवतो. त्यामुळे केसांना फाट्या फुटण्याचे प्रमाण वाढते.यावर उपाय म्हणून तुम्ही केसांना दही लावू शकता. दही केसांना फाट्या फुटण्याचे प्रमाण कमी करते आणि केसांची चमकही वाढवते.
फक्त दही तुम्ही केसांना लावू शकता. तस नको असेल तर दह्यामध्ये व्हिटॅमिन E ची कॅप्सूल मिक्स करु शकता. एलोवेरा जेल मिक्स करु शकता. हे मिश्रण अर्धा तास केसांना ठेऊन केस धुवा. केसांना छान चमक येईल.
पूर्ण केसांना दही लावायचे नसेल तर फक्त केसांच्या मुळाशी खोबरेल तेलामध्ये दही मिक्स करुन लावू शकता. दह्यामुळे कोंडा सुद्धा कमी होतो आणि केसांचे गळणे सुद्धा कमी होते. शिवाय केसांचा अतिरिक्त तेलकट पणा कमी होण्यास मदत होते.
आता काही जणांना दही केसांना लावायला नको वाटते. अशा वेळेला तुम्ही दह्यात पाणी टाका आणि ते पाणी गाळून घ्या. हे गाळेलेले पाणी केसांच्या मुळाशी लावा आणि एका तासाने केस धुवा. याने सुद्धा चांगला फरक पडतो.
हेही वाचा.......पार्लर आणि घरगुती उपाय
केसांची काळजी घेण्यासाठी काही टीप्स.....how to do
1) उन्हात जाताना केस स्कार्प किंवा टोपीने कव्हर करा.
2) उन्हाळा असला तरी तेल न लावता केस धुवू नका. तेल न लावल्यामुळे केस अजून निस्तेज आणि रफ होतात.
3) घाम येतो म्हणून केसांचा दिवसभर बन करु नका. कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. केस लांब असतील तर व्यवस्थित विंचरुन वेणी घाला. केस शॉर्ट असतील तर विंचरुन रबर लावा.
4) उन्हामुळे स्काल्प तेलकट झालीय म्हणून जास्त शाम्पूचा वापर करु नका. अति शाम्पूचा वापर केसांना कमजोर करतो.
5) उन्हाळ्यात गरज असेल तरच कंडिशनर वापरा. अन्यथा वापर टाळा.
6) केस धुताना जास्त गरम किंवा जास्त गार पाण्याचा वापर टाळा. कोमट पाण्याने केस धुवा.
7) उन्हाळ्यात हेअर ड्रायर चा वापर करु नका. आणि फॅशन च्या नादात केमिकल युक्त प्रॉडक्ट केसांवरती वापरू नका. केस जेवढे नॅचूरल ठेवाल तेवढे ते चांगले राहतील.
8) केसांच्या आरोग्यासाठी तुमच्या आहारावर लक्ष द्या. रोजच्या जेवणामध्ये लिंबाचा वापर असू द्या.काकडी,गाजर
आहारात असू द्या. केसांसाठी गरजेचे असणारे व्हिटॅमिन्स आहारामार्फत घ्या.
9) पाणी भरपूर प्या. उन्हाळ्यात घामामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचा परिणाम केसांवरती सुद्धा होतो. त्यामुळे उन्हाळ्यात तहान लागली की लगेच पाणी प्या.
10) केसामध्ये सतत घाम येत असेल तर सुती कापड थंड पाण्यामध्ये भिजवून केसांच्या मुळाशी लावून घाम पुसून घ्या.
अति जागरण टाळा आणि झोपेचे शेड्युल ठेवा.
0 टिप्पण्या