उन्हाळ्यात सब्जा बी आपल्या आरोग्यासाठी कसे गुणकारी ठरतात,how to do

 उन्हाळ्यात आपल्याला अनेक आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. अति उन्हामुळे डोके दुखी, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निराश वाटणे, पोटाचे विकार अशा अनेक तक्रारी सुरु होतात.या सर्व तक्रारी साठी सब्जा बी उत्तम उपाय आहे.

सब्जा बी मध्ये कोणते घटक असतात?

सब्जा बी मध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन k, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन B, मॅग्नेशियम, फायबर हे घटक असतात.

सब्जा बीचा वापर कसा केला जातो?

सब्जा बी सरबत मध्ये, कोशिंबीर मध्ये आणि फालुदा मध्ये जास्त प्रमाणात वापरले जाते.

सब्जा बी आपल्या आरोग्यास कसे गुणकारी ठरते?how to do

1) उष्णता कमी होण्यास मदत होते.

उन्हाळ्यात आपल्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढलेले असतें. उष्णता वाढली की त्याचा त्रास आपल्याला विविध प्रकारे जाणवतो. शरीरावर बारीक पुरळ येणे, घामोळ्या येणे, लघवीला त्रास होणे, पोटात जळजळ करणे,तळपायाची आग होणे ही सर्व लक्षणे आपल्या शरीरातील उष्णता वाढल्यानंतर आपल्याला दिसू लागतात. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. त्यातील एक उपाय म्हणजे सब्जा बी.
सब्जा बी चे सेवन आपण दररोज केले तर हे सब्जा बी आपल्याला आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. त्यासाठी रोज दोन चमचे सब्जा बी एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवा व अर्ध्या तासाने हे पाणी प्या. सब्जा बी युक्त पाणी आपण दिवसातून कितीही वेळा पिऊ शकतो. हे पाणी आपल्या पोटाला थंडावा देते व शरीरातील उष्णता कमी करते.

2) वजन कमी करण्यास मदत होते.

आपण वजन कमी करण्यासाठी खूप काही करत असतो. त्यामध्ये व्यायाम, डाईट यांचाही समावेश असतो. आपल्या डाईट मध्ये जर आपण सब्जा बी चा समावेश केला तर वजन कमी होण्यास मदत होते. नॉर्मल पाणी पिण्याऐवजी जर सब्जा युक्त पाणी आपण पिलो तर भूक लागण्याचे प्रमाण कमी होते. म्हणजे जेवणामार्फत अतिरिक्त कॅलरीज आपल्या पोटात जात असतें. सब्जा युक्त पाणी पिल्यामुळे ही अतिरिक्त कॅलरीज पोटात जाणे कन्ट्रोल मध्ये येते.
शिवाय गरम पाण्यामध्ये सब्जा बी भिजवून जेव्हा त्याचे रूपांतर जेल मध्ये होते तेव्हा एक चमचा हे भिजवलेले सब्जा बी खा. त्याने सुद्धा खूप फायदा होईल.


3) पचन क्रिया व्यवस्थित चालण्यास मदत होते.

आपण जे काही खातो ते जर व्यवस्थित पचन झाले तरच आपलें शरीर नीट राहते. पचन क्रिया जर बिघडली तर अनेक पोटाचे विकार होण्याची शक्यता असतें. आपण दिवसभरात काहीही खातो. काही पदार्थ पचायला हलके असतात तर काही पदार्थ पचायला जड असतात. मग अशा परिस्थितीत आपल्याला असा काहीतरी उपाय हवा असतो जो आपल्याला पोटाच्या विकारा पासून लांब ठेवेल.
आपली पचन क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला सब्जा बी उत्तम प्रकारे मदत करु शकते. रोज रात्री झोपताना एक ग्लास पाण्यामध्ये सब्जा बी मिक्स करुन जर आपण घेतले तर आपली पचन क्रिया सुधारते.त्याप्रमाणे सकाळी उपाशी पोटी आपण सब्जा बी युक्त पाणी पिलो तर खूप साऱ्या पोटाच्या समस्या दूर होतात.

4) त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते.how to do

उन्हाळ्यात उन्हामुळे आणि घामामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होते. आणि याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसायला लागतो. त्वचा निस्तेज होते, ओठ कोरडे पडतात, पायाच्या टाचा उलतात. काहीजणांची त्वचा उन्हाळ्यात खूप तेलकट दिसायला लागते. उन्हाळ्यात सुद्धा आपली त्वचा छान राहावी असे प्रत्येकाला वाटत असतें. त्वचेला जेव्हा आतून पोषण मिळते तेव्हाच त्वचा वरून चांगली राहते.अशा वेळी त्वचा नीट ठेवण्यासाठी सब्जा बी खूप उपयुक्त ठरतात.सब्जा बी मिक्स पाणी पिल्याने त्वचेमधील कोरडेपणा दूर होतो. त्वचा छान टवटवीत दिसायला लागते.
त्याचप्रमाणे खोबरेल तेल व सब्जा बी मिक्स करुन चेहऱ्यावर लावल्यास चांगला फरक पडतो. त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. त्वचा मुलायम होते.


5) मानसिक त्रास कमी करण्यास मदत होते.

माणूस मानसिक रित्या स्थिर असेल तरच तो निरोगी आयुष्य जगतो.डिप्रेशन, ताण, चिडचिड, डोकेदुखी, मायग्रेन, निद्रनाशाचा त्रास ही सर्व मानसिक त्रासाची लक्षणे.
उन्हाळ्यात याचे प्रमाण जरा जास्त असतें. उन्हामुळे डोकेदुखी आणि चिडचिड वाढते. अस्वस्थपणा जाणवायला लागतो. अशा वेळी सब्जा बी चे सेवन केल्यास हा त्रास आटोक्यात येतो.कोशिंबीर, फालुदा, सरबत या मार्फत सब्जा बी चे सेवन आपण करु शकतो.
उन्हाळ्यात सब्जा बी सरबतामध्ये टाकून घेतल्यास डोकेदुखी व अस्वस्थपणा दूर होतो. पोटाला आणि मनाला थंडावा मिळतो.ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे अशा लोकांनी तर सब्जा बी चे सेवन दररोज करावे. मायग्रेन मध्ये डोक्याची अर्धी बाजू दुखते म्हणजे ज्याला आपण अर्धशीश दुखणे असे म्हणतो. यावर सब्जा बीचे सेवन करणे उत्तम उपाय आहे.



काही प्रश्नोत्तरे

1) गरोदरपणात सब्जा बीचे सेवन योग्य आहे का?
उत्तर - हो, बऱ्याच वेळेला गरोदरपणात स्त्री च्या शरीरातील उष्णता वाढते. अशा वेळेला ही उष्णता कमी करण्यास सब्जा बी मदत करतात.

2) शुगर असणाऱ्या व्यक्ती सब्जा बीचे सेवन करु शकतात का?
उत्तर - नक्कीच करु शकतात. रोज उपाशी पोटी एक ग्लास पाण्यामध्ये सब्जा बी टाकून पिल्यास शुगर कन्ट्रोल मध्ये राहते.

3) दिवसातून किती वेळा सब्जा बीचे सेवन आपण करु शकतो?
उत्तर - एका बॉटल मध्ये चार चमचे सब्जा बी मिक्स करु तुम्ही ठेऊ शकता आणि दिवसभर हे पाणी पिऊ शकता. जर तुम्हाला अजून कोणती शारीरिक समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

4) कोणकोणत्या सरबता मध्ये सब्जा बी वापरू शकतो?
उत्तर - सगळ्या प्रकारच्या सरबता मध्ये आपण सब्जा बी वापरू शकतो.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या