उन्हाळ्यामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये.

जास्त गरम होत असले की आपला जास्त कल असतो ते थंडगार पदार्थ खाण्याकडे. यामध्ये आईसक्रिम, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट शेक, मिल्क शेक. उन्हाळा सुरु झाला की आपल्या घरातील फ्रीज याच गोष्टीने भरलेला असतो.

उन्हाळ्यामध्ये आपल्याला तहान खूप लागते, त्यामुळे आपण भरपूर प्रमाणात पाणी पीत राहतो. आणि यामुळेच भूक म्हणावी तशी लागत नाही.

मग आता उन्हाळ्यामध्ये काय आहार घ्यावा?आणि काय घेऊ नये? म्हणजे पोट पण भरेल आणि पोषणही मिळेल,आणि त्रासही होणार नाही.how to do




1) उन्हाळ्यामध्ये नॉनव्हेज शक्यतो टाळा. कारण हवामान अगोदरच उष्ण असतें आणि त्यात मासे, अंडी, मटण खाल्यामुळे शरीरातील उष्णता अजूनच वाढते आणि त्रास होतो.

काही जणांना नॉनव्हेज खाण्याची खूप आवड असतें पण हीच आवड उन्हाळ्यामध्ये तुमच्या शरीराला घातक ठरते.

त्यात जर कोणाला Piles चा ( मुळव्याधचा ) त्रास असेल तर उन्हाळ्यामध्ये अशा लोकांनी नॉनव्हेज पासून लांब राहिलेलेच चांगले.


2) चहा, कॉफीचे प्रमाण कमी करा.

आपल्या प्रत्येकाचा दिवस हा चहा किंवा कॉफीनेच सुरु होतो. मग तो उन्हाळा असो किंवा हिवाळा, पावसाळा असो.

उन्हाळ्यामध्ये याचे प्रमाण थोडे कमी करा. म्हणजे तुम्ही सकाळी चहा पिलात तर परत 4 ते 5 च्या दरम्यान घेऊ नका. दिवसातून फक्त एकदा. तशी चहा, कॉफी उन्हाळ्यामध्ये न घेतलेलीच चांगली परंतु शरीराला लागलेली सवय मोडणे खूप अवघड असतें. त्यामुळे अगदीच बंद करणे शक्य नसेल तर प्रमाण कमी ठेवा. त्रास कमी प्रमाणात होईल.


हेही वाचा....उन्हाळ्यामध्ये तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी?

 

3) उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असणारी फळे भरपूर प्रमाणात घ्या. उन्हाळ्यामध्ये कलिंगड, तरबुज, आंबे या फळांचा सिझन चालू असतो.

आता तुम्ही म्हणाल आंब्या मध्ये सुद्धा उष्णता असतें. मग खायचा की नाही. तर आंब्याचे पन्हे घ्यायला हरकत नाही. आंब्याचे पन्हे तुमच्या पोटाला थंडावा देते.पिकलेले आंबे सुद्धा खा, परंतु त्याचे प्रमाण तुमच्या शरीराला झेपेल एवढेच असू द्या.


बाकी कलिंगड, तरबुज हे पाणीजन्य फळ आहे. तुम्हाला डिहायड्रेशन झाल्यासारखे वाटत असेल तर ही फळे तुम्ही भरपूर प्रमाणात घ्या. त्यामुळे तुमचे पोट सुद्धा भरेल आणि पाण्याची कमतरता सुद्धा जाणवणार नाही.


4) खूप गरमागरम आहार घेऊ नका.

काही जणांना खूप गरम गरम खायची सवय असते. म्हणजे गरम भाजी, भाकरी, भात.उन्हाळ्यामध्ये खूप गरम खाल्यानेसुद्धा पोटात आग पडल्यासारखी होते. जळजळ होते. त्यामुळे गरमागरम खाण्याची सवय उन्हाळ्यात सोडा.


5) वजन कमी करण्यासाठी काही जण सकाळी जिऱ्याचे किंवा ओव्याचे पाणी पितात. पण हे जिरं आणि ओवा सुद्धा उष्ण आहे. याचा वापर हिवाळ्यामध्ये योग्य आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये जिरं आणि ओव्याचे पाणी पिऊ नका.

त्यापेक्षा सब्जा बी घ्या. रात्री झोपताना एक बॉटल / ग्लास पाण्यामध्ये सब्जा बी मिक्स करुन रात्रभर ठेवा व सकाळी ते पाणी प्या. त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होईल.


हेही वाचा....पोट कमी करण्यासाठी काही साधे सोप्पे 10 व्यायाम प्रकार


6) ज्यांना उष्णतेचा जास्त त्रास आहे अशा लोकांनी दिवसातून एकदा का असेना गुलकंद खावे. त्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहते.

दिवसातून एकदा ताक प्या.दिवसातून एकदा दही खा.फ्रिज मध्ये दूध ठेऊन रात्री झोपण्याआधी ते थंडगार दूध प्या. लस्सी प्या.लिंबू सरबत फ्रिज मध्ये तयार करुन ठेवा.



7) उन्हाळ्यामध्ये बरीचशी फळे आपल्याला खावीशी वाटत नाहीत. सफरचंद,चिकू. तुम्ही याचे फ्रुट शेक तयार करुन घेऊ शकता.

कोणतेही एक फळ आणि त्यामध्ये थाडेसे दूध घालून, मिक्सर मध्ये फिरवून घ्या आणि फ्रीज मध्ये ठेवा. म्हणजे दिवसभरात तुम्हाला जेवायची इच्छा नसेल तर तुम्ही हे फ्रुट शेक घेऊ शकता. त्यामुळे तुमचे पोटही भरेल.


8) सतत फ्रिज मधले पाणी पिऊ नका. त्यापेक्षा माठातले पाणी प्या. फ्रिज मधील पाण्याने तुम्हाला उन्हाळ्यात सुद्धा सर्दी होऊ शकते. त्यामुळे माठातले नैसर्गिकरित्या थंड झालेले पाणी प्या. या पाण्याचा तुमच्या शरीरावर काहीच वाईट परिणाम होणार नाही.


9) उन्हाळ्यामध्ये आहार हा हलका घ्या.how to do

हिवाळा हा ऋतू असा आहे की ज्या ऋतू मध्ये आपण काहीही खाल्ले तरी ते पचते त्यामुळे काही जणांची तब्येत ही हिवाळ्यात सुधारलेली दिसते.

परंतु उन्हाळ्यात तस नाहीये. आपण काहीही खात बसलो तर त्याचा त्रास होतो. ऍसिडिटी होते. त्यामुळे उन्हाळ्यात आहार हा हलका असू द्या. भाकरी, भाजी, डोसा असे वेगवेगळे पदार्थ जे पचयला हलके असतील.


10) तुम्ही कामानिमित्ताने बाहेर जात असाल तर सोबत पाण्याची बाटली, काहीतरी गोड पदार्थ आणि थोडंसं खायला घ्या. ऊन खूप असल्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला चक्कर येते. काही वेळेला आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते,तर काही वेळेला काहीच न खाल्यामुळे चक्कर येते.तर काही वेळेला बराच वेळ पाणी न पिल्यामुळे डोकं दुखायला सुरुवात होते.


शक्यतो उन्हाळ्यात घराच्या बाहेर पडताना खाऊन बाहेर पडा. शक्य नसेल तर सोबत खायला घ्या. म्हणजे कुठेही भूक लागली तर पटकन खाता येईल आणि पाणी पिता येईल.


अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ज्यांची आपण उन्हाळ्याच्या दिवसात काळजी घेतली तर आपल्याला त्रास होणार नाही आणि कितीही कडक उन्हाळा असला तरी आपण तो मजेत एन्जॉय करु.


हेही वाचा......काही किचन टिप्स...... नक्की वाचा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या