नवीन केस उगवण्यासाठी काही घरगुती उपाय.

केस तर प्रत्येकाचेच गळत असतात. परंतु टेन्शन तेव्हा येते जेव्हा गळलेल्या केसांच्या जागी नवीन केस उगवत नाहीत.



थोडेफार केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. पण जास्त केस गळणे व केसांची रिग्रोथ न होणे ही मात्र गंभीर बाब आहे.आणि याहून गंभीर बाब म्हणजे,
जोपर्यंत आपलें केस आपल्याला पातळ झालेले दिसत नाहीत तोपर्यंत आपण त्यावर इलाज करत नाही.मग आता यावर उपाय काय?

आपल्या किचन मध्ये आणि आपल्या गार्डन मध्ये असणाऱ्या गोष्टी वापरून आपण आपल्या केसांचे गळणे थांबवू शकतो. शिवाय गेलेल्या केसांच्या जागी नवीन केस सुद्धा आणू शकतो. यासाठी काय गरजेचे आहे.how to do
1) स्वतःच्या केसांसाठी वेळ काढणे.
2) खाली दिलेले घरगुती उपाय सातत्याने करत राहणे.
कारण आज तूप खाल्ले म्हणजे लगेच उद्या रुप येणार नाही त्यामुळे कोणताही उपाय करताना तुम्हाला त्यात सातत्य ठेवावे लागेल.

Table of content


घरगुती उपाय 1.how to do

कांदा

कांद्याचा वापर आपण आपल्या स्वयंपाकामध्ये रोजच करत असतो. परंतु हाच कांदा केसांसाठी सुद्धा वापरता येतो.
कांद्यामध्ये असणारे सल्फर नवीन केस उगवण्यास खूप उपयोगी ठरते.
आता या कांद्याचा वापर कसा करायचा?


कांद्याचे तेल.

साहित्य -
खोबरेल तेल + बारीक चिरलेला कांदा.

एका भांड्यामध्ये तुमच्या केसांच्या लांबीनुसार खोबरेल तेल घ्या. ते गरम करायला ठेवा. गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका व तो कांदा लाला होईपर्यंत परता. कांदा लाला झाला की तेल गार करायला ठेवा. एका गळणीच्या साहाय्याने हे गार झालेले तेल गाळून घ्या.

हे तेल केसांना कसे लावायचे?
केस धुण्याच्या एक तास आधी कापसाच्या साहाय्याने ते कांद्याचे तेल केसांच्या मुळाशी लावा व हलक्या हाताने मालिश करा.एका तासानंतर केस तुमच्या रेगुलर शाम्पूने धुवा.
हे तेल आठवड्यातून दोनदा केसांना लावा.

कांद्याचा रस किंवा पेस्ट.

साहित्य -
कांदा व थोडेसे पाणी

एक कांदा घेऊन त्यात थोडेसे पाणी घालून मिक्सरच्या साहाय्याने त्याची बारीक पेस्ट करा.ही पेस्ट सुद्धा तुम्ही केसांना लावू शकता. पेस्ट नको असेल तर गळणीच्या साहाय्याने त्यातील पाणी वेगळे करा.

कांद्याची पेस्ट किंवा रस केसांना कसा लावावा?
केस धुण्याच्या एक तास आधी ही पेस्ट किंवा रस केसांना लावा. कांद्याचा वास तुम्हाला उग्र वाटत असेल तर कोणतेही एक सुगंधी केसांचे तेल तुम्ही यामध्ये मिक्स करु शकता.
एका तासाने केस शाम्पूने धुवा.

काळजी घ्या --- केस धुतल्यानंतर जास्त वेळ केस टॉवेलने बांधून ठेऊ नका. कारण असे केल्यास केसांना कांद्याचा वास तसाच राहील. टॉवेल ने केस पुसून ते सुकण्यासाठी रिकामे ठेवा.

घरगुती उपाय 2.how to do

वडाच्या पारंब्या 

आपण वापरत असलेल्या बऱ्याच तेलामध्ये वडाच्या पारंब्याचा वापर केला जातो.केसांना मजबूत करण्यासाठी व केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या पारंब्याचा खूप उपयोग होतो.
खूप कमी वयामध्ये टक्कल पडणे, केसांची रिग्रोथ थांबणे, केसांचे अति गळणे यासारख्या समस्यावर या वडाच्या पारंब्या खूप उत्तम उपाय करतात.

वडाच्या पारंब्याचे तेल.

साहित्य -
वडाच्या कोवळ्या पारंब्या + खोबरेल तेल.

एका भांड्यामध्ये केसांच्या लांबीनुसार खोबरेल तेल घ्या. त्यात वडाच्या कोवळ्या पारंब्या ठेचून टाका. हे तेल गरम करायला ठेवा. ठेचून टाकलेल्या पारंब्याचा रंग थोडासा बदलला की गॅस बंद करा. तेल थंड होऊ द्या. तेल थंड झाल्यानंतर एका बाटलीमध्ये ओतून ठेवा. हे तेल तुम्ही एका महिन्यासाठी सुद्धा साठवून ठेऊ शकता. ठेचून टाकलेल्या वडाच्या पारंब्या या तेलामध्ये तशाच राहू द्या.

या तेलाचा वापर कसा करायचा?
तुम्ही खोबरेल तेल ज्या पद्धतीने केसांना लावता त्याच पद्धतीने हे तेल केसांना लावायचे आहे. कापसाच्या साहाय्याने हे तेल केसांच्या मुळाशी लावा. हलक्या हाताने मालिश करा. रात्रभर तेल केसांना राहू द्या. नंतर दुसऱ्या दिवशी शाम्पूने केस धुवा.

घरगुती उपाय 3.how to do

कापूर.

कापूर मध्ये अँटीबायोटिक व अँटीफंगल घटक आहेत जे केसांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते.कापूर थंड असल्याने ते आपल्या केसांच्या स्काल्प ला आराम देते. केसातील कोंडा देखील कमी करते. नवीन केस उगवण्यास मदत करते.


साहित्य -
कापूर + खोबरेल तेल.

एका भांड्यामध्ये तुम्हाला जेवढे हवे आहे तेवढे तेल घ्या व त्यात कापुराची वडी किंवा कापूर बारीक करुन टाका.
हे तेल एका बाटलीमध्ये दोन दिवस तसेच राहू द्या. दोन दिवसाने तेल गाळून घ्या.
किंवा
एका भांड्यामध्ये तेल गरम करा व त्यात कापूर बारीक करुन टाका. कापूर विरघळला की तेल थंड करुन एका बाटलीमध्ये भरुन ठेवा.

या तेलाचा वापर करायचा कसा?
केस धुण्याच्या दोन ते तीन तास आधी केसांना कापसाच्या साहाय्याने हे कापुरचे तेल लावा आणि नंतर केस शाम्पूने धुवा.


घरगुती उपाय 4.how to do

लिंबू.

लिंबामध्ये फॉलिक ऍसिड व व्हिटॅमिन C चे प्रमाण जास्त असल्यामुळे ते केसांना निरोगी ठेवण्यास मदत करते.
केसामध्ये जर कोंडा झाला असेल तर लिंबाच्या एक किंवा दोन वेळेच्या वापराने कोंड्यापासून सुटका मिळते.


हे लिंबू विविध प्रकारे वापरले जाऊ शकते.


1) लिंबाचा रस खोबरेल तेलामध्ये मिक्स करुन केसांना लावू शकतो.

2) कोंडा जास्त असेल तर डायरेक्ट लिंबाचा रस केसांच्या मुळाशी लावू शकतो.

3) एलोवेरा जेल व लिंबाचा रस मिक्स करुन केसांना लावू शकतो. त्यामुळे केसांचे गळणे थांबते व केसांना चमक येते.

4) लिंबाचा रस व व्हिटॅमिन E ची कॅप्सूल मिक्स करुन
 केसांना लावल्याने केसांची रिग्रोथ होण्यास सुरुवात होते.

5) लिंबाची साल वाळवून तिची पावडर करुन हेअर पॅक च्या स्वरूपात आपण ही पावडर केसांना लावू शकतो. त्यामुळे रुक्ष झालेले केस छान मुलायम होतील.

6) केस धुण्यासाठी जो शाम्पू वापरला जातो त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिक्स करुन केस धुवावेत त्यामुळे केसांच्या खूप साऱ्या समस्या दूर होतात.

घरगुती उपाय 5.how to do

जास्वंद.

जास्वंदामध्ये फ्लेव्होनॉइडस आणि एमिनो ऍसिड असतें जे केसांच्या आरोग्य साठी खूप उपयुक्त ठरते.वेगवेगळ्या तेलामध्ये जास्वंद वापरली जाते. जास्वंदीचे फुल आणि पान या दोन्हीचा वापर आपण आपल्या केसांसाठी करु शकतो.


जास्वंदीचे तेल व हेअर पॅक 


1) एका भांड्यामध्ये खोबरेल तेल घेऊन ते गरम करा व त्यात जास्वंदीची 2 ते 3 फुले टाका. तेल थंड झाले की एका बाटलीमध्ये भरुन ठेवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे जास्वंदीचे तेल केसांना लावू शकता.

2) त्याचप्रमाणे जास्वंदीची पाने खोबरेल तेलामध्ये टाकून ते तेल गरम करा. तेल थंड झाले की केसांना लावा.

3) जास्वंदीचा हेअर पॅक करुन तो सुद्धा केसांना लावू शकता.
 जास्वंदीची पाने व फुले वाटून घ्या. त्यात थोडेसे दही मिक्स करा. एक तास हा पॅक केसांना लावा व नंतर शाम्पूने धुवा. या पॅक मुळे रुक्ष झालेले केस मुलायम होतील व केसांची वाढ व्हायला मदत होईल.

4) अनेक शाम्पूमध्ये जास्वंदीच्या फुलाचा वापर आपल्याला केलेला दिसतो. आपण सुद्धा आपल्या रेगुलर शाम्पूमध्ये जास्वंद वापरू शकतो. जास्वंदीची 8 ते 9 फुले एक ग्लास पाण्यात उकळून घ्या व या पाण्यामध्ये तुमचा रेगुलर शाम्पू टाकून याने केस धुवा.

5) केसांना मेहंदी लावताना त्यात आपण जास्वंदीची पाने वाटून टाकू शकतो. त्यामुळे केसांचे आरोग्य अजून चांगले होईल व नवीन केस उगवण्यास मदतही होईल.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या