गरोदरपणात शाकाहारी आहार कोणता घ्यावा?

 

बाळाला पोटात नऊ महिने वाढवणे म्हणजे आईसाठी एक मोठी जबाबदारी असतें. नऊ महिने आईच्या द्वारे पोटातील गर्भाला सगळे पोषण मिळत असतें. त्यासाठी आईने सकस आहार घेणे महत्वाचे असतें. पोटातील बाळाच्या वाढीसाठी कोणते घटक महत्वाचे असतात?

1) प्रोटीन 

2) कार्बोहायड्रेट 

3) कॅल्शियम 

4) आयर्न 

5) व्हिटॅमिन 

काही स्त्रिया शाकाहारी असतात तर काही स्त्रिया मांसाहारी असतात. बाळाच्या वाढीसाठी लागणारे घटक दोन्ही प्रकारच्या आहारामार्फत मिळू शकतात.फक्त आहार घेताना योग्य संतुलन राखणे खूप महत्वाचे आहे.how to do

गरोदरपणात शाकाहारी अन्न कसे घ्यावे? कोणत्या अन्नातून कोणते घटक मिळतात? ते आपण पाहू.

1) दूध, दही, तूप, डाळ, कडधान्ये, सोयाबीन, पनीर इ.

डाळ, कडधान्ये, सोयाबीन, पनीर, दूध, दही, तूप या मार्फत गरोदर स्त्रीला भरपूर प्रमाणात प्रोटीन व कॅल्शियम मिळते.गरोदर स्त्रीने सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास दूध प्यावे. शरीरामध्ये उष्णता जास्त असेल तर दही गरोदर स्त्रीच्या शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.

आठवड्यातून दोन ते तीन वेळा गरोदर स्त्रीने कडधान्ये आहारामध्ये घ्यावे. कडधान्ये भाजी स्वरूपात घेऊ शकता किंवा सॅलड स्वरूपात सुद्धा घेऊ शकता.

ज्या स्त्रिया मांसाहार करत नाहीत त्यांच्यासाठी सोयाबीन उत्तम पर्याय आहे. सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतें. आठवड्यातून एकदा तरी सोयाबीनचा समावेश आहारामध्ये असायला हवा.सोयाबीनची भाजी तुम्हाला आवडत नसेल तर बारीक सोयाबीन गव्हामध्ये टाकून त्या पिटाची चपाती रोज तुम्ही खाऊ शकता.

डाळीमध्ये तुरडाळ, मूगडाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ अशा वेगवेगळ्या डाळीचा समावेश असू द्या. तुमची पचन शक्ती कमजोर असेल तर तुम्ही फक्त मूगडाळ आहारामध्ये घेतली तरी चालेल.

तुपाचा समावेश रोज आहारामध्ये असावा. गरोदरपणात स्त्रीने रोज एक चमचा तूप खाल्लेच पाहिजे. तूप तुम्ही वरणभाता मध्ये खाऊ शकता. दूध भाता मध्ये घेऊ शकता किंवा रोज तूप लावलेली एक चपाती खाऊ शकता.

ज्या स्त्रियांना दूध, तूप, दही आवडत नाही अशा स्त्रियांसाठी पनीर हा उत्तम पर्याय आहे. दूध, तूप, दह्या मार्फत मिळणारे घटक तुम्ही पनीर खाऊन सुद्धा मिळवू शकता.


2) पालेभाज्या

लोह व फायबर ची कमतरता पालेभाज्या मधून भरुन निघते.

रोजच्या जेवणामध्ये एका तरी पालेभाजीचा समावेश असावा. रोज मेथी, पालक किंवा इतर पालेभाजी नको असेल तर सकाळी नाष्ट्यामध्ये मेथीचे पराठे किंवा पालकाचे पराठे खाऊ शकता.
डाळीच्या वरणामध्ये थोडी पालक टाकून ते वरण भाताबरोबर खाऊ शकता. जेवण करताना कच्ची पालेभाजी जेवणाबरोबर खाल्ली तर शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते. बऱ्याच वेळेला गरोदरपणात स्त्रीच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते, त्यासाठी कच्ची पालेभाजी जेवणाबरोबर खाणे हा एक उत्तम उपाय आहे.



3) फळे 

गरोदरपणात बऱ्याच वेळेला जेवण जात नाही अशा वेळेला फळांचा उपयोग ऊर्जा मिळवण्यासाठी होतो.ज्यांना गरोदरपणात ओमेटिंगचा त्रास होतो, खाल्लेले काहीच पचत नाही. अशा परिस्थितीमध्ये शरीरात अशक्तपणा येतो, थकवा जाणवतो. अशा वेळेला फळांची खूप मदत होते. सफरचंद, केळी, चिकू, द्राक्षे, केवी अशी वेगवेगळी सिझनेबल फळे तुम्ही खाऊ शकता.

यामध्ये एक समज आहे कि, गरोदरपणात पपई, केळी, आंबा ही फळे खावीत कि नाही.

तर ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त आहे त्यांनी पपई, आंबा खाणे टाळावे किंवा जास्त प्रमाणात याचे सेवन करु नये. कारण पपई व आंबा ही उष्ण फळे मानली जातात.केळी अवश्य खावी कारण गरोदरपणात गर्भाचे वजन वाढण्यासाठी केळीची खूप मदत होते.सकाळी नाष्ट्यामध्ये एक तरी केळी आवर्जून खावी.

रोज फळे खाऊ वाटत नसतील तर रोज एका तरी फळाचा ज्युस करुन घेऊ शकता. यामध्ये कलिंगडाचा ज्युस, सफरचंद ज्युस, संत्री ज्युस असे वेगवेगळे ज्युस तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. फळांच्या ज्युस मुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते शिवाय शरीरातील पाण्याची पातळी सुद्धा व्यवस्थित राहते. 

4) सुकामेवा ( ड्रायफ्रूट )

शरीरातील लोह, कॅल्शियम व व्हिटॅमिन ची कमतरता ड्रायफ्रूटने भरुन निघते. यामध्ये बदाम, काळे मनुके, खजूर, खारीक याचे सेवन गरोदरपणात स्त्रीने नक्की करावे. 

गरोदर स्त्रीने रोज चार ते पाच काळे मनुके खाल्ले तर शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, शिवाय पित्ताचा त्रास सुद्धा कमी होतो.रोज सकाळी एक ग्लास गरम दुधामध्ये खजूर टाकून ती भिजलेली खजूर खाल्ल्यास गरोदर स्त्रीचे व पोटातील बाळाचे वजन वाढण्यास मदत होते.रोज रात्री चार ते पाच बदाम भिजत खालून ते सकाळी खाल्ल्यास पचन शक्ती वाढते शिवाय व्हिटॅमिन A सुद्धा मिळते. खारकेची बारीक पावडर करुन ती पावडर दुधात मिक्स करुन घेऊ शकता, त्यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते. कोणतेही ड्रायफ्रूट खाताना ते बारीक चावून खावा तरच त्याचा उपयोग होईल. 

रोज ड्रायफ्रूट खाऊ वाटत नसतील तर बदाम व खारीक याची पावडर करुन ठेवा व रोज एक चमचा पावडर दुधामधून घ्या.

खजूर व काळे मनुके किंवा अक्रोड तुपामध्ये थोडेसे परतून घ्या व त्यात थोडासा गूळ टाकून त्याचे लाडू करुन ठेवा. रोज एक लाडू खाल्ला तरी गरोदर स्त्रीला योग्य ते पोषण मिळते.


जाणून घ्या.....गरोदरपणात मांसाहारी आहार कोणता घ्यावा?

 पाणी 

गरोदरपणात सगळ्यात महत्वाचे काय असेल तर ते पाणी आहे. कारण स्त्रीने पाणी जास्त पिले तरच पोटातील गर्भाची / बाळाची वाढ व्यवस्थित होते व डिलेव्हरी होताना काही अडचणी येत नाहीत.

अगदी सुरुवातीपासून ते डिलेव्हरी होईपर्यंत गरोदर स्त्रिला दिवसाला 2 ते 3 लिटर पाणी पिणे खूप गरजेचे आहे. नाहीतर युरीन इन्फेकशन, डिहायड्रेशन, अचानक चक्कर येणे, खूप थकवा जाणवणे, पाण्याच्या कमतरते मुळे आठव्या किंवा नवव्या महिन्यात डिलेव्हरी होणे किंवा सगळे नॉर्मल असताना सुद्धा सीझर होणे अशा समस्या निर्माण होतात.

गरोदरपणात स्त्रीने नारळ पाणी सुद्धा घ्यावे. रोज नारळ पाणी पिणे शक्य नसेल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की नारळ पाणी घ्यावे.

गरोदरपणात पाणी पिण्याच्या वेळेमध्ये खूप गॅप पडत असेल तर आपण मोबाईल वरती वॉटर अलार्म सुद्धा लावू शकतो. ज्यामुळे दिवसाला हवे तेवढे पाणी पिणे शक्य होईल. आणि गरोदरपणात स्त्रीच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही.


गरोदरपणात प्रत्येक स्त्रीचा आहार हा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे तुमच्या शरीराला जे पचेल त्या पदार्थाचा समावेश तुमच्या आहारामध्ये असू द्या. कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या