केस गळतीवर घरगुती उपाय.... मेथी दाणे.

केस गळणे थांबवण्यासाठी खूप सारे घरगुती उपाय आहेत. त्यातील एक उपाय म्हणजे मेथी दाणे. आपल्याकडे प्रत्येक घरात मेथी दाणे उपलब्ध असतात. त्याचा वापर आपण आपल्या त्वचेसाठी व केसांसाठी करु शकतो. मेथी दाणे केसांसाठी कसे वापरायचे हे आपण पाहू.how to do

सर्वप्रथम आपण यातील घटक बघू.

प्रोटीन आणि निकोटीनिक ऍसिड केसांना आतून पोषण देण्यास मदत करते.
लेसीथिन केसांना मजबूत बनवते.
पोटॅ्शिअम केस पांढरे होण्यापासून वाचवते.

Table of content





मेथी दाणे केसांसाठी कसे वापरायचे?how to do



घरगुती उपाय क्रमांक 1.

* साहित्य 

मेथी दाणे आणि तेल.


* कसे तयार करायचे?how to do

नेहमी जे तेल तुम्ही केसांसाठी वापरता तेच तेल एका वाटीमध्ये घ्या.
ते तेल गरम करुन त्यात एक किंवा दोन चमचे मेथी दाणे टाका.
मेथी दाणे तेलामध्ये तोपर्यंत उकळून घ्या जोपर्यंत तेलाचा कलर थोडा बदलत नाही.
नंतर हे उकळलेले तेल थंड करायला ठेवा.

* हे तेल केसांना कसे लावावे?
तेल थोडे थंड झाल्यानंतर कापसाच्या मदतीने केसांच्या मुळाला हे तेल लावायचे आहे.
तेल लावून झाल्यानंतर हलक्या हाताने केसांना मालिश करायची आहे.
कमीतकमी 4 तास हे तेल केसांना ठेऊन नंतर तुमच्या नेहमीच्या शाम्पूने केस वॉश करायचे आहेत.
मेथी दाणे व तेल यांचे मिश्रण करुन तुम्ही ते महिन्याभरासाठी साठवून ठेऊ शकता.
या तेलाचा उत्तम रिजल्ट येण्यासाठी हे तेल  तुम्हाला 3 महिन्यापर्यंत न चुकता केसांना लावायचे आहे.
आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे तेल तुम्ही वापरू शकता.

* याचा केसांना होणारा फायदा काय?
केसांची मुळे मजबूत होतात.
केस गळायचे कमी होतात.
केसातील कोंडा कमी होतो.
अकाली केसांचे पांढरे होणे थांबते.
पुरुषांना पडलेले टक्कल यावर सुद्धा हा घरगुती उपाय उत्तम आहे.



घरगुती उपाय क्रमांक 2.

* साहित्य

मेथी दाणे, पाणी, कढीपत्ता, कोरफड.



* कसे तयार करायचे?how to do
केस धुण्याच्या अधल्या दिवशी रात्री दोन चमचे मेथी दाणे, 8 ते 9 कढीपत्त्याची पाने, व कोरफडीचा गर एका बाउल मध्ये टाका. त्यात एक ग्लास पाणी ओता व हे मिश्रण रात्रभर तसेच झाकून ठेवा.
किंवा,
ज्या दिवशी केस धुवायचे आहेत त्या दिवशी एका भांड्यामध्ये दोन चमचे मेथी दाणे, कढीपत्ता, कोरफडीचा गर घ्या. त्यात एक ग्लास पाणी ओतून ते पाणी उकळायचा ठेवा. हे मिश्रण तोपर्यंत उकळवा जोपर्यंत एक ग्लास पाणी अर्धा ग्लास होत नाही.
नंतर एका गळणीच्या साहाय्याने हे पाणी गाळा. व थंड करायला ठेवा.

* हे वापरायचे कसे?
हे तयार केलेले पाणी कापसाच्या साहाय्याने केसांच्या मुळाला लावा.
राहिलेले पाणी केसावरती ओता व केस क्लचरच्या साहाय्याने 2 तासासाठी बांधून ठेवा.
किंवा,
केस धुण्यासाठी तुम्ही जो शाम्पू वापरता तो शाम्पू या तयार केलेल्या पाण्यामध्ये मिक्स करा व याच पाण्याने केस धुवा.
किंवा,
केस धुवून झाल्यावर हे तयार केलेले पाणी केसांवरती ओता व 10 मिनिटाने केस साध्या पाण्याने धुवा.

* याचा केसांना होणारा फायदा काय?
केस दाट होण्यास मदत होते.
केस मुलायम होतात.
केस वाढण्यासाठी मदत होते.
केसामध्ये येणारी खाज कमी होते.
केसांचा पोत सुधारतो.


घरगुती उपाय क्रमांक 3.

* साहित्य

मेथी दाणे व पाणी.



यापासून आपण केसांसाठी पॅक तयार करु शकतो.
* कसे तयार करायचे.how to do
एका वाटीमध्ये चार चमचे मेथी दाणे व पाणी द्या.
हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवा.
सकाळी उठल्यावर हे मिश्रण मिक्सरच्या साहाय्याने वाटून घ्या.
यामध्ये तुम्ही तुम्हाला हवे असेल तर एलोवेरा जेल मिक्स करु शकता.
किंवा,
यामध्ये केसांना तेल लावले नसेल तर या पॅक मध्ये दोन चमचे तेल मिक्स करु शकता.


* हे वापरायचे कसे?
हा तयार केलेला पॅक तुम्ही ज्याप्रमाणे मेहंदी केसांना लावता त्याप्रमाणे केसांना लावायचा आहे.
2 तास हा पॅक केसांना ठेऊन नंतर तुमच्या नेहमीच्या शाम्पूने केस धुवायचे आहेत.
पुरुषांना जर टक्कल पडले असेल तर हा पॅक खूप उपयुक्त आहे.
टक्कल पडलेल्या भागावर हा पॅक लावायचा आहे.
आठवड्यातून एकदा हा पॅक तुम्ही केसांवरती लावलात तरी 2 महिन्यांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल.

* याचा केसांना होणारा फायदा काय?
नवीन केस उगवण्यास मदत होते.
केसांचे गळणे थांबते.
रफ झालेले केस मुलायम होतात.
कोंडा दूर होण्यास मदत होते.
केसांची मुळे मजबूत होतात.

अजून काही टिप्स.

1) मेथी दाणे पाण्यात भिजवून ते पाणी तुम्ही सिरम स्वरूपात सुद्धा वापरू शकता.
2) केसांमध्ये खाज सुटत असेल तर मेथी दाणे व दही यांचा हेअर पॅक तयात करुन केसांना अर्धा तास लावू शकता, यामुळे खाज बंद होईल.
3) केसांच्या बाबतीत तुम्हाला अजून काही समस्या असतील तर कोणताही घरगुती उपाय करण्याअगोदर तुमच्या ब्युटीशिअनचा सल्ला घ्या.
4) कोणताही घरगुती उपाय कमीतकमी 2 ते 3 महिने करावा लागतो तेव्हा त्याचा रिजल्ट तुम्हाला दिसेल. एकदा किंवा दोनदा उपाय करुन फरक लगेच जाणवत नाही.
5) केस कशामुळे गळत आहेत हे जाणून घ्या व त्यानुसार त्यावर घरगुती उपाय करा.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या