उन्हाळ्यात उन्हाचा परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर होत असतो. आपली त्वचा, केस, आपले पोट, आपला आहार आणि आपली मानसिकता सुद्धा या उन्हाळ्याच्या दिवसात बदलत असतें.
काही जण दिवसभर घरात फॅन आणि A. C च्या हवेला बसलेले असतात. तर काहीजण दिवसभर उन्हात काम करत असतात, काहीजण कामासाठी उन्हात प्रवास करत असतात. या धावपळीत उन्हाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी? यासाठी काही टिप्स पाहू.how to do
1)काहीही झालं तरी सकाळी उठण्याची आणि रात्री झोपण्याची वेळ बदलू नका.कोणत्याही ऋतू मुळे तुमचं रुटीन बदलता कामा नये. झोप पूर्ण झाली की तुम्ही दिवसभर मानसिकरित्या आनंदी राहाल.
2) उन्हाळा असला तरी व्यायामाची सवय ठेवा. बऱ्याच वेळेला उन्हाळ्यात थकवा जाणवतो आणि मग आपण व्यायामाचा कंटाळा करतो. सकाळी एक तास केलेला व्यायाम तुम्हाला दिवसभर शारीरिक दृष्ट्या स्ट्रॉंग ठेवण्यास मदत करतो.
हेही वाचा......उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये?
3) उन्हाळ्यात भूक मंदावते. तरीही रोज सकाळी नाष्टा करण्याची सवय ठेवा. रात्री झोपल्यानंतर ते सकाळी उठेपर्यंत आपले पोट 8 ते 9 तास रिकामे असतें. आणि त्यात आपण उन्हाळ्यात सकाळी उठल्यावर फक्त पाणी पीत राहिलो तर आपल्याला थकवा जाणवतो. त्यामुळे सकाळचा नाष्टा स्किप करु नका.
4) भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यात आपल्याला तहान तर लागते परंतु उन्हामुळे आलेला घाम आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी करतो. आणि त्यामुळे उष्माघात होतो.त्यामुळे पाणी भरपूर प्या. जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर पाण्याची बाटली आठवणीने तुमच्या बॅगेत ठेवा.
5) द्रवयुक्त फळे जास्त प्रमाणात खा. जसे की कलिंगड, तरबुज, द्राक्षे. त्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित राहते.
6) फ्रिज मधले पाणी पिणे टाळा. उन्हाळा आला की आपली घाई असतें ती म्हणजे फ्रिज मध्ये पाण्याची बॉटल भरुन ठेवणे. थंडगार पाणी घश्याला थंडावा देते परंतु तुमच्या शरीराला ते घातक ठरते. त्यामुळे साधे माठातील पाणी प्या.
नक्की वाचा......पोट कमी करण्यासाठी साधे सोप्पे व्यायाम प्रकार
7) शक्यतो उन्हात जाणे टाळा. अगदीच काही अर्जंट काम असेल तर आपला चेहरा आणि केस स्कार्प ने कव्हर करा.सनकोट चा वापर करा. सनस्क्रीन वापरा.
8) उन्हातून घरी आल्यावर एक गुळाचा खडा खा आणि पाणी प्या. ही सवय तुम्हाला कमजोर होण्यापासून वाचवेल.
9) उन्हातून घरी आल्यावर कपडे लगेच बदला. आपले कपडे घामाने भिजलेले असतात आणि आपण ते तसेच आपल्या अंगावर ठेवले तर अनेक त्वचारोग उद्भवतात. त्यामुळे घामाने भिजलेले कपडे लगेच बदला.
10) घामोळ्यापासून वाचण्यासाठी खूप गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा. काही जणांना उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये अंघोळीसाठी गरम पाणी घ्यायची सवय असतें. उन्हाळ्यात ही सवय मोडा. अगदीत गार नाही पण कोमट पाण्याने अंघोळ करा. आणि दिवसातून दोन वेळा अंघोळ करा.
11) उन्हाळ्यात दिवसातून एकदा तरी लिंबू सरबत, ताक,लस्सी प्या.
12) उन्हाळ्याच्या दिवसात कपडे अगदी हलके आणि सुती घाला. त्यामुळे घामोळ्या येण्याचे प्रमाण काम होईल.
नक्की बघा......उन्हाळ्यात अशी घ्या केसांची काळजी.
13) उन्हाळ्यात चहा कॉफी चे सेवन करु नका.त्यामुळे उष्णतेचा त्रास होणार नाही. आणि ज्यांच्या शरीरात उष्णता आहे अशा व्यक्तींनी सब्जा बी, गुलकंद, गूळ याचे सेवन दिवसातून एकदा तरी करावे.
14) गरम होत आहे म्हणून उन्हाळ्यात जास्त A. C चा वापर सुद्धा करु नये. त्यामुळे अंग जड झाल्यासारखे वाटते.त्यामुळे कितीही गरम होत असेल तरी A. C न लावता फॅनची हवा घ्या.
15) उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या कामामध्ये कितीही व्यस्त असलात तरी स्वतःसाठी वेळ काढा, ऋतू बदलल्या नंतर तुमच्या शरीरात होणारे बदल लक्षात घ्या. आणि काळजी घ्या.
तर अशा प्रकारे आपण पाहिले की, उन्हाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी?
हेही वाचा.....वजन कसे कमी करावे?
0 टिप्पण्या