व्यायाम करताना उन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी ?how to do

आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी आपण बाराही महिने व्यायाम करत असतो. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या तिन्ही ऋतुमध्ये वातावरण वेगवेगळे असतें.त्यामुळे ऋतुनुसार आपण आपल्या व्यायामाची पद्धत सुद्धा बदलली पाहिजे.

व्यायाम करण्यासाठी हिवाळा हा उत्तम ऋतू मनाला जातो. उन्हाळ्यात सुद्धा व्यायाम करणे चांगले आहे फक्त उन्हाळ्यात काळजी घेऊन व्यायाम करायला हवा.

 उन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी, काय करावे?how to do


Table of content






साधारणपणे आपल्या बॉडीचे temperature 98.4 अंश फॅरेनहाईट किंवा 37 ते 38 अंश सेल्सीअस असतें.

उन्हाळ्यात जेव्हा बॉडी temperature वाढते तेव्हा आपल्याला त्रास होऊ लागतो. आणि व्यायाम करताना आपल्या शरीराचे तापमान वाढते. जेव्हा हे तापमान 40 अंश सेल्सीअस च्या पुढे जाते तेव्हा उलटी होणे, घोळना फुटणे, चक्कर येणे असा त्रास सुरु होतो. मग व्यायाम करताना उन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी ? 


व्यायाम करण्याची वेळ.


उन्हाळ्यात व्यायाम करताना नेहमी पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान करावा. कारण त्यावेळेस आपल्या शरीराचे तापमान नॉर्मल असतें. या वेळेमध्ये तुम्हाला घामही जास्त येणार नाही आणि जास्त थकवा सुद्धा जाणवणार नाही.

जर तुम्ही दिवसभरात कधीही व्यायाम करत असाल तर तुम्हाला उष्माघात होण्याची शक्यता असतें, कारण बाकी वेळेमध्ये तुम्हाला व्यायाम करताना घाम खूप येणार आणि त्यात जर तुम्ही खूप हार्ड वर्कआऊट करत असाल तर घाम येण्याचे प्रमाण जास्त असेल. त्यामुळे शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात व्यायाम हा पहाटे करावा.


हेही वाचा....वाढलेल्या पोटाचा घेर करा कमी करावा?


व्यायाम करताना पाणी न पिणे.


उन्हाळ्यात आपल्याला तहान तर लागते परंतु सततच्या येणाऱ्या घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता उन्हाळ्यात जाणवते.

काही लोक व्यायाम करताना पाणी पिणे टाळतात. कारण त्यांच्या मते व्यायाम करताना पाणी पिले तर व्यायाम चांगला होत नाही किंवा पोट गच्च झाल्यासारखे वाटते. परंतु ही सवय उन्हाळ्यात तुमच्या शरीराला घातक ठरु शकते. कारण व्यायाम करताना व्यायाम करण्यासाठी तुमच्या शरीराला एनर्जी हवी असतें. व्यायाम करताना येणार घाम तुमची एनर्जी कमी करतो. त्यामुळे व्यायाम करताना एक घोट का असेना पाणी प्या. किंवा तुम्ही एनर्जी ड्रिंक सुद्धा घेऊ शकता.


उन्हाळ्यात अति व्यायाम करणे टाळा.how to do


काही जणांनी जिम लावलेली असतें. शरीर चांगले ठेवण्यासाठी काही जणांना अति व्यायाम करण्याची सवय असतें. पण ही सवय उन्हाळ्यात लागू होत नाही. कारण उन्हाळ्यात आपल्याला थकवा लगेच येतो आणि थकवा येऊन सुद्धा तुम्ही व्यायाम करत राहिलात तर त्याचे गंभीर परिणाम तुमच्या शरीरावर होतात.

व्यायाम करताना तुमच्या कॅपॅसिटी नुसार करा. जेव्हा तुमच्या काखेत आणि मानेवर घाम येईल तेव्हा समजून जा की तुमची अर्धी कॅपॅसीटी संपली आहे. उन्हाळ्यात व्यायाम करताना कोठे थांबायचे हे समजायला हवे.

काही जणांचा हा समज आहे की खूप घाम आला म्हणजे खूप चांगला व्यायाम झाला तर तस नाहीये. व्यायाम करताना जेवढा झेपेल तेवढाच व्यायाम करायला हवा.


हेही वाचा....उन्हाळ्यात स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?


व्यायाम करताना शरीराला आराम न देणे.


तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा तो न थांबत करु नका. एक व्यायाम प्रकार करुन झाला की अर्धा किंवा एक मिनिट थांबा आणि नंतर दुसरा व्यायाम प्रकार करा.

कारण उन्हाळ्यात लगेच येणारा थकवा व्यायाम करताना दुप्पट येतो आणि त्यात जर तुम्ही न थांबता व्यायाम करत राहिलात तर त्याच प्रेशर तुमच्या हृदयावरती येते. आणि त्याच मुळे व्यायाम करताना येणारे हार्ट अटॅक वाढले आहेत.

त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला आराम देत व्यायाम करा.


व्यायाम झाला की लगेच अंघोळ करु नका.


उन्हाळ्यात व्यायाम करताना घाम लगेच येतो, त्यामुळे व्यायाम झाला की आपली गडबड असतें ती म्हणजे अंघोळ करण्याची.

व्यायाम करताना आपल्या शरीराचे तापमान वाढलेले असतें आणि आपले हार्ट बीट सुद्धा वाढलेले असतात. त्यामुळे व्यायाम झाल्यावर थोडा वेळ थांबा. शरीराचे तापमान आणि हार्ट बीट नॉर्मल होऊ द्या आणि मग अंघोळ करा.


उन्हाळ्यात व्यायाम करताना योग्य ते व्यायाम प्रकार निवडा. व्यायामाबरोबरच तुमच्या आहारावर सुद्धा लक्ष द्या. शरीराला त्रास होईल अस काहीच करु नका.

प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे आहे. कोणाची तरी स्लिम बॉडी/ सिक्स ऍप्स बघून अति व्यायाम करु नका. तुम्हाला जर खरंच तुमचे शरीर स्लिम किंवा फिट हवे असेल तर चांगल्या exercise expert कडून चांगला exercise plan / dait plan घ्या आणि त्यांच्या सल्ल्याने सगळं काही करत राहा म्हणजे उन्हाळ्यात त्रास होणार नाही आणि तुमचं रुटीनही व्यवस्थित राहील 


हेही वाचा......जगातील सहा सर्वोत्तम डॉक्टर








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या