आयुष्यात पुढे जायला, यशाची पायरी गाठायला कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला आपलं आयुष्य छान आरामात जगायचं असत.
आता हे छान, आरामाच आयुष्य सहज तर मिळणार नाही. जोपर्यंत आपण आईवडिलांचे बोट धरून असतो तोपर्यंत आयुष्यात काहीच कमी पडत नाही. जेव्हा आपण मोठे होतो आणि आपल्यावर जबाबदारी येते तेव्हा कळत नाही ही जबाबदारी कशी पार पडायची मग त्यासाठी आत्तापासूनच नियोजन करायला हवं ना.how to do
हेही वाचा.....स्वतःची नेहमी प्रामाणिक रहा.
शिक्षण चालू असताना
जेव्हा तुम्ही शिकत असता तेव्हा ते शिक्षण अस निवडा कि त्यात तुम्हाला अधिक आवड असेल. तिथे तुमचा अभ्यासही चांगला होईल, मार्क चांगले मिळतील.म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर काम सहज मिळेल आणि पैसाही.
शिकत शिकत तुम्ही तुमच्या कामाविषयी माहिती काढायला सुरुवात करा. तुम्हाला जॉब करायचा असेल तर कुठे हायरिंग चालू आहे ते बघत राहा. व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायासाठी भांडवल किती लागेल? जागा कुठे मिळेल? या सगळ्या गोष्टी आधीपासूनच बघून ठेवा. म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर तुमचा वेळ जाणार नाही.
नेहमी नवीन काहीतरी शिका.how to do
माणसाच्या शिकण्याला वय नसते. तुम्ही जेव्हा नवीन काहीतरी शिकता तेव्हा तुमचे कमाईचे मार्ग वाढतात. आजकाल लोक सोशल मीडिया च्या माध्यमातून सुद्धा पैसे कमवतात. काहीजण आपलें छंद जोपासतात आणि त्याचा बिझनेस सुरु करतात. म्हणजे जॉब आणि बिझनेस पैसे कमवण्याचे दोन मार्ग झाले.
योग्य वयामध्ये कामाला लागा.
बऱ्याच वेळेला कामाच्या शोधात आपलं वय खूप पुढे जात. काम करण्याचं, कष्ट करण्याचं एक वय असत त्या वयातच माणूस स्वतःला कामात झोकून देऊ शकतो, नवनवीन आयडिया वापरून स्वतःची कमाई वाढवतो. जसं वय वाढत जात तशी शरीराला कष्टाची सवय राहात नाही, नवीन आयडिया सुचत नाहीत आणि आयुष्यात आपण आहे तिथेच राहतो.
हेही वाचा......Instagram, Facebook स्वतःच्या फायद्यासाठी वापरा
कमाई चालू झाल्यावर
माणसाच्या हातात पैसा आला कि माणसाचे खर्च वाढायला सुरुवात होते बरोबर ना. तर अस करु नका. तुमचा अनावश्यक खर्च टाळा. आवश्यक खर्च बाजूला काढून बाकीचे पैसे सेव्ह करा.
ठराविक वयापर्यंतच काम करा.
बऱ्याच जणांना आयुष्यभर काम करण्याची सवय असतें मग अशा मध्ये आपण कमवलेल्या पैशाचा उपभोग आपणच घेत नाही. फक्त पुढच्या पिढीसाठी कमवून ठेवायचा आणि एक दिवस मरून जायचं.
तुम्ही प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉब करत असाल किंवा स्वतःचा बिझनेस करत असाल तर एक ठराविक वय ठरवा काम करण्याचं. त्या वयानंतर त्या कामातून निवृत्ती घ्या आणि मस्त आपल्या जोडीदाराबरोबर किंवा मित्र- मैत्रिणीबरोबर फिरा. एन्जॉय करा. जोपर्यंत तुमचे हातपाय तुम्हाला साथ देतायत तोपर्यंत फिरा तुम्ही कमवलेला पैसा तुमच्यावर खर्च करा.
0 टिप्पण्या