नेहमी स्वतःशी प्रामाणिक राहा.

 आपण नेहमी प्रामाणिक राहिले पाहिजे हे तर आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते. आता प्रामाणिक राहायचं म्हणजे कोणाशी, तर आई वडिलांशी, नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात त्यांच्याशी. पण कधी विचार केलाय का?आपण स्वतःशी सुद्धा प्रामाणिक राहायला हवं.

आता तुम्ही म्हणाल स्वतःशी प्रामाणिक राहायचं म्हणजे काय करायचं?how to do

तर तुम्ही रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावरती आज काय काय करायचं ते ठरवता. आता तुम्ही काय ठरवलं आहे हे फक्त तुम्हालाच माहित असतें. मग ते नियोजन तुमच्या कामाविषयी असेल, तुमच्या आहाराविषयी असेल, तुमच्या व्यायामाविषयी असेल जे काही तुम्ही ठरवता ते खरंच तुम्ही सातत्याने करता का? तर याला स्वतःशी प्रामाणिक असणे म्हणतात.

हेही वाचा.....आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर हे करा.

उदा,1)


आपण ठरवतो मी उद्या सकाळी उठून व्यायाम करणार किंवा चालायला जाणार, सकाळी उठण्यासाठी पहाटे 5 वाजल्यापासूनचे दर अर्ध्या तासाचे अलार्म आपण सेट करुन ठेवतो.आणि दुसऱ्या दिवशी त्या अलार्मच्या आवाजाने घरातील सगळे जागे होतात पण आपण काही उठत नाही. खरं आहे ना हे!मग मला सांगा आपण जे ठरवलं होत ते आपण प्रामाणिकपणे केल का? म्हणजेच आपण स्वतःशी प्रामाणिक राहिलो का?


उदा,2)


ज्यांना वजन कमी करायचे असतें ते लोक ठरवतात, मी आज पासून गोड खाणार नाही, जंक फूड खाणार नाही, फक्त हेल्दी आहार घेणार. ज्या दिवशी ठरवतो त्या दिवशी सगळं काही नियमाने करतो आणि दुसऱ्या दिवशी मित्र मैत्रिणी पार्टी साठी बोलावतात. आता काही जण फ्रेंड्सच्या आग्रहाखातर स्वतःच डाईट बाजूला ठेवतात , काहीजण म्हणतात एका दिवसाने काय होतय उद्या पासून करेल सगळं. म्हणजे इथे सुद्धा आपण स्वतःशी प्रामाणिक राहात नाही.


उदा,3)


विद्यार्थी वर्ग : अभ्यास करायचा हे तर सगळेच ठरवतात. कारण शिक्षण खूप महत्वाचं आहे त्याशिवाय आपल आयुष्य सेट कस होणार. एका वर्गातून दुसऱ्या वर्गात गेलं की आपण ठरवतो आता या वर्षी मी खूप चांगला अभ्यास करणार, गेल्यावर्षी पेक्षा छान मार्क मिळवणार. त्यासाठी आपण अभ्यासाचं एक वेळापत्रक तयार करतो. ते भिंतीवरती चिटकवून ठेवतो. एक ते दोन दिवस आपण सगळ ठरवल्याप्रमाणे करतोही आणि मग काही दिवसाने ते तयार केलेले वेळापत्रक फक्त नावाला भिंतीवर चिकटून राहते. काही दिवसाने आपल्याला कंटाळा यायला लागतो. आज करु उद्या करु करत वर्ष संपत जात आणि कधी परीक्षा जवळ येते कळतही नाही. इथे सुद्धा आपण स्वतःशी प्रामाणिक नाही.


उदा,4)


महिन्याच्या कमाईतून थोडेसे पैसे बाजूला काढून ठेवायचे. आता ते पैसे आपण एका विशिष्ट कारणासाठी वापरणार असतो.ठराविक रक्कम जमा झाल्याशिवाय त्या पैशाला हात लावायचा नाही असे ठरवलेले ही असते.दोन महिने आपण कमाईचा काही हिस्सा बाजूला काढून ठेवतो आणि तिसऱ्या महिन्यात काही गरज निर्माण झाली की ते बचत करुन एका विशिष्ट गोष्टीसाठी बाजूला ठेवलेले पैसे आपण खर्च करतो. इथे सुद्धा आपण स्वतःशी प्रामाणिक नाही, बरोबर ना.how to do

हेही वाचा......आपली प्रगती का होत नाही?

अशा एक नाही अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण ठरवतो आणि करत नाही. एखादा व्यवसाय सुरु करण्याची कल्पना असेल, घराची जबाबदारी असेल, काही नवीन शिकणे असेल. त्यामुळे तुम्ही जे नियोजन करता ते स्वतःशी प्रामाणिक राहून पूर्ण करा बघा बदल नक्की होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या