आपली प्रगती का होत नाही?

                              how to do

बऱ्याच वेळेला अस होत ना कि आपण खूप काही करत असतो,पण आपली प्रगतीच होत नाही. तुम्हाला काय वाटत अस का होत असेल ? चला तर मग आपण यावर थोडी चर्चा करु.

तर याची काही कारण आहेत ती आपण जाणून घेऊ.

1) आपण फक्त बोलत राहतो मी हे करणार मी ते करणार, पण आपण करत मात्र काहीच नाही.

तुम्हाला सुद्धा हे पटलं असेल ना, बघा ना जेव्हा आपल्याला कोणी विचारात कि तू काय करतोय सध्या? तेव्हा त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे तयार असतें. मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. माझा असा असा प्लॅन आहे, मी हा व्यवसाय सुरु करणार आहे. पण मला सांगा आपण जे बोलतो ते आपण खरंच करतो का?
आपलें नियोजन फक्त आपल्या बोलण्यातच राहते ते कृतीत मात्र उतरत नाही.कष्ट करण्याची तयारी आपण दाखवत नाही मग आपली प्रगती कशी होईल.


2) आपण लोकांचा खूप विचार करतो.

जेव्हा आपण काही करायचं ठरवतो तेव्हा आपण लोकांचा खूप विचार करत बसतो कि लोक काय म्हणतील. आणि याच विचारात आपण आपल्या कामाची सुरुवातच करत नाही.
हे बघा लोक काय म्हणतील या पेक्षा तुम्हाला काय वाटत हे जास्त महत्वाचे आहे. लोक काय तुम्ही काहीही केल तरी नाव ठेवणारच. तुम्ही जॉब करत असाल तर लोक म्हणणार तुम्ही व्यवसाय का करत नाही. आणि तुम्ही व्यवसाय करत असाल तर लोक तुम्हाला जॉब करण्याचा सल्ला देतील. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता कामाला लागा.

3) आपल्याला सगळं काही लगेच हवं असत.

म्हणजे आज दुकान टाकलं कि पैशाने गल्ला भरला पाहिजे. गाडी, बंगला, आरामाच आयुष्य लगेच मिळालं पाहिजे.अशी आपली इच्छा असतें.
हे सगळं होण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करुन थोडा संयम ठेवावा लागतो. आयुष्यात सहज आणि झटपट कधीच काहीच मिळत नाही. तुम्ही जेवढे कष्ट करणार संयम ठेवणार त्या त्या पद्धतीने तुम्हाला सगळं मिळणार. त्यामुळे शॉर्ट टर्म चा विचार सोडून द्या संयम ठेवायला शिका.

4) आपली संगत ठरवते आपली प्रगती कि अधोगती.

संगतीचा परिणाम आपल्या आयुष्यावर खूप होत असतो मग ती संगत तुमच्या मित्रपरिवाराची असू द्या किंवा नातेवाईकाची.
चांगली संगत नेहमी आपल्याला चांगल्या मार्गांवर घेऊन जाते आणि वाईट संगत नेहमी अधोगतीकडे घेऊन जाते. त्यामुळे तुम्ही कोणाच्या संगतीत आहात ते नक्की बघा. आपला मित्र किंवा आपलें नातेवाईक आपल्याला कसे, कोणत्या प्रकारचे सल्ले देतात ते बघा. जर संगत वाईट असेल तर ती ताबडतोब सोडा.

5) कोणत्याही कामात आपल्याला अपयशी होण्याची भीती वाटते.

जेव्हा आपण एखाद काम सुरु करण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात लगेच एक विचार येतो कि मला या कामात यश मिळेल कि नाही. तुम्ही तुमचं काम सुरु करा यश किंवा अपयश याचा विचार करत नका बसू. हा विचारच तुम्हाला तुमच्या कामाची सुरुवात करु देत नाही, नेहमी सकारात्मक विचार करा आणि काम करत राहा.

                                how to do 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या