छोट्या सवयी आणि मोठे बदल

 प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या आवडीनिवडी असतात. काही छंद असतात, काहीतरी नवीन शिकण्याची, करण्याची आपली इच्छा असतें.पण आपलं होत काय माहित आहे, आपण घाबरून सुरुवातच करत नाही. मला जमेल की नाही? यातून काय होईल की नाही? लोक काय म्हणतील? हा विचार तर आयुष्यभर पाठ सोडत नाही.आणि मग जेव्हा आपण पन्नाशी पार करतो तेव्हा आपल्याला वाटत थोडी हिम्मत करुन काहीतरी आवडीच शिकलो असतो तर आज आयुष्य वेगळं असत.how to do.

Table of content

अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण काहीतरी करण्याची सुरुवात करु शकतो. नवीन काहीतरी शिकू शकतो. या जगामध्ये ज्ञान कमी नाहीये. आपण कमी पडतो ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी.

उदा,

पुस्तके वाचणे.


वाचनाची आवड तर प्रत्येकाला असतें. परंतु आपण त्यात सातत्य ठेवत नाही. म्हणजे विचार करा आज आपण 10 पान वाचली तर वर्षभरामध्ये 3650 पाने वाचून होतील.....
पुस्तकी ज्ञान कधीच वाया जात नाही. आपण जे काही वाचतो ते आपल्या कायम लक्षात राहत. आपल्या आयुष्यात कधी काही अडचण आली तर हेच पुस्तकी ज्ञान आपल्याला त्यातून बाहेर पडण्यास मदत करते.जेव्हा आपण एखाद्या ग्रुप मध्ये कोणत्याही टॉपिक साठी चर्चा करायला बसतो तेव्हा आपण आपलें मुद्दे खूप आत्मविश्वासाने मांडू शकतो कारण आपलें तेवढे वाचन झालेले असतें.

बचत


रोजच्या खर्चातून जर आपण 60 रुपयांची बचत केली तर वर्षभरात आपण 21,900 रुपयांची बचत करु. रोजच्या खर्चातून तुम्ही किती बचत करु शकता हे तुम्ही ठरवा. ही बचतीची सवय तुम्हाला आर्थिक दृष्ट्या खूप फायद्याची ठरेलं.
पैसे येतात आणि जातात. वरचेवर सगळ्याचं गोष्टी खूप महाग होत चालल्या आहेत त्यामुळे आलेला पैसे कसा किती खर्च होतो हे कळतच नाही त्यासाठी काही नियोजन करा.

रोज एक तास स्वतःसाठी द्या.how to do


प्रत्येकाला रोज काहीतरी नवीन शिकायचे असतें. पण वेळच नसतो. तर रोज स्वतःसाठी एक तास देऊन तुमच्या आवडीचे स्किल शिका बघा वर्षभरात तुम्ही त्या स्किलमध्ये परफेक्ट होऊन जाल.गरज आहे फक्त सातत्य ठेवण्याची, तुम्ही जे काही शिकत आहात ते सातत्याने एक वर्ष शिका जेवढे शिकत जाल तेवढे त्यामध्ये मास्टर होत जाल.

विचार नका करु की मी जे शिकणार आहे त्यासाठी वेळ किती लागेल, त्याने काय फायदा होईल. पैशासाठी सगळेच शिकतात कधीतरी स्वतःसाठी काहीतरी शिकावे. पन्नाशी नंतरचे आपलें आयुष्य आपण या आपल्या आवडीच्या स्किलमध्ये गुंतवून ठेवावे. माणसाच्या शिकण्याला वय नसतं. म्हणजे बघा आपण एखाद्या 40 पार केलेल्या व्यक्तीला म्हणाल की अर्रे तू भाषण खूप छान करतो तर अजून थोडंसं वाचन करुन स्पर्धेमध्ये भाग का घेत नाहीस. तर त्या व्यक्तीचं लगेच उत्तर येत. " आता काय माझं वय आहे का वाचन करुन स्पर्धेत भाग घेण्याचं. "
बराचश्या व्यक्ती वय जास्त आहे म्हणून आपलें छंद आपल्या आवडी निवडी पासून लांब राहतात. आपलेच विचार आपल्याला या पासून लांब ठेवतात. विचारांमध्ये खूप क्षमता असतें.

नक्की वाचा......विचारांची क्षमता

आपल्यामधला रोज 1% बदल आपल्याला वर्षभरात खूप उंचावर नेऊ शकतो. आपल्यामधल्या खूप छोट्या छोट्या सवयी आपल्यामध्ये मोठा बदल घडवू शकतात.तर मग आजच सुरुवात करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या