तुम्ही सुद्धा सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातात घेता का?

आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, अगदी 3 वर्षाच्या मुलापासून ते 70 -80 वर्षाच्या वयस्कर व्यक्तीपर्यंत.


पण कधी विचार केलाय का? कि आपण हा मोबाईल वापरतो कि मोबाईल आपल्याला वापरत आहे. म्हणजे बघा सकाळी उठल्याबरोबर आपण पहिलं काही काम करत असू तर ते म्हणजे मोबाईल हातात घेऊन आलेले नोटिफिकेशन चेक करणे. नंतर आपलं इंस्टाग्राम फेसबुक ओपन करतो आणि त्यामध्ये आपलें 1 ते 2 तास कसे निघून जातात आपल्याला कळतही नाही.


माणसाने स्वतःच आयुष्य त्या मोबाईल भोवती इतक गुंतवून घेतलं आहे कि, एखाद्याला झोपेतून उठल्यावर जर त्याचा मोबाईल दिसला नाही तर तो व्यक्ती सैरभैर होतो. सकाळी उठल्याबरोबर त्या मोबाईलच दर्शन झालच पाहिजे असा काही नियमच केला आहे जणू! हा मोबाईलचा अतिवापर तुमच्या शरीराला सुस्त करतो. सकाळी उठल्यावर आपण मोबाईल घेऊन नुसते त्या अंथरुणात लोळत पडलेलो असतो. आपल्या पिढीने सकाळी उठल्यावर काय केले पाहिजे....

1) उठून आपल्या अंथरुणाची घडी घालून ठेवली पाहिजे.

काही काही महापुरुष झोपेतून उठतात आणि मोबाईल घेऊन टॉयलेट मध्ये जाऊन बसतात. मोबाईल वर 2 तास घालवायला यांच्याकडे वेळ असतो, परंतु स्वतःच्या अंथरून, पांघरूनाची घडी घालायला यांच्याकडे वेळ नसतो.

2) सकाळ सकाळी व्यायाम / योगा करा.

आता यातही जर घरात एखाद्या मुलाला किंवा मुलीला आईवडील म्हणाले कि अग तो मोबाईल बाजूला ठेऊन जरा व्यायाम कर. तर मुलं अश्या नजरेने आईवडिलाकडे बघतात जसं काही यांना घरातील सगळी काम करायला सांगितली आहेत. त्या मोबाईलच्या नादामध्ये मुलं आपल्या वयामध्ये आपण सकाळी उठून काय केल पाहिजे हेही विसरून जातात.

3) सकाळची काम झटपट आवरा.

बऱ्याच जणांना सवय असतें. उठायचं लवकर पण अंघोळ, नाष्टा 12 वाजता करायचा आणि याच कारण काय मोबाईल वरती रिल्स बघत बसणे. स्वतःच्या पोटाला भूक लागलीय या पेक्षा त्या रिल्स मध्ये कोण काय करतंय यावर जास्त लक्ष.

4) टॉयलेटला जाताना मोबाईल घेऊन जाऊ नका.

प्रत्येक घरामध्ये एक तरी नमुना असा आहे, ज्याला मोबाईल टॉयलेट मध्ये घेऊन गेल्याशिवाय पोटचं साफ होत नाही 😂 खरंय ना! म्हणजे आपल्या शरीरात होणाऱ्या क्रिया सुद्धा आपण मोबाईलच्या हातात सोपवल्या आहेत. टॉयलेट म्हणजे काही गार्डन नाहीये. लोक तासाभर त्या दुर्गंधी मध्ये मोबाईल घेऊन कसे बसतात हे मला काही आजवर कळलं नाही.

5) रात्री झोपताना तुमचा मोबाईल दुसऱ्या रूम मध्ये ठेवा आणि सकाळी उठल्यावर पहिली आपली सगळी काम आवरा आणि नंतरच मोबाईल हातात घ्या.

बघा तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये किती फरक पडेल. स्वतःसाठी काही नियम बनवा. how to do.मान्य आहे कि जग खूप पुढे जात आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. पण सगळ्याचं नवीन गोष्टी शिकण्यासाठी मोबाईलची आवश्यकता नाहीये. सगळीकडेच मोबाईल वापरला तर पुस्तकी ज्ञान घेणार कधी. त्यामुळे सकाळची सुरुवात मोबाईल घेऊन करण्यापेक्षा एखाद्या छान पुस्तकाच एक पान वाचून करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मग वाट कसली बघताय, चला आज पासूनच सुरुवात करा.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या