आपल्या दिवसाची सुरुवात कशी करावी? हे आजच्या पिढीला सांगणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे आपण झोपेतून उठलो की सगळ्यात पहिले मोबाईल बघतो. मला रात्रभरात किती msg आले.
(झोपताना मोबाईल नेहमी दुसऱ्या रूम मध्ये ठेवा म्हणजे सकाळी उठल्यावर तो समोर दिसणार नाही.) हेही वाचा......तुम्ही सुद्धा सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातात घेता का? तुम्हाला माहित आहे,आपलें आजोबा आणि आपले वडील सकाळी उठल्यावर त्यांच्या दिवसाची सुरुवात कशी करायचे देवाचे आभार मानून, मला रात्री एवढी छान झोप दिली म्हणून! आपलं रुटिन ना आपण कुठेतरी चेंज करायला हवं. सकाळी उठून देवाला नमस्कार करून, छान व्यायाम करून आपल्या दिवसाची सुरुवात करायला हवी. |
दिवसाची सुरुवात छान होण्यासाठी ना रात्रीची झोप पूर्ण होणं खूप महत्वाचे आहे. रात्री 2 वाजता झोपून जर आपण सकाळी 9 वाजता उठत असू तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या कामावर नक्कीच होतो.
काय काय परिणाम होतात?
1) दिवसभर आळस येणे.
2) करायला घेतलेले काम पूर्ण न होणे.
3) आपण केलेले जेवण व्यवस्थित पचन न होणे.
4) खूप कमी वयामध्ये वेगवेगळे आजार होणे.
सकाळी किती वाजता उठायला हवे या बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती दिली आहे.
पण ब्राम्हमुहूर्तावर उठणे हे खूप चांगले मानले जाते. आपल्या भारतीय वेळेनुसार पहाटे 4 ते 6 ची वेळ म्हणजे ब्राम्हमुहूर्त.
अस म्हणतात की विद्यार्थी वर्गाने जर या वेळेमध्ये अभ्यास केला तर तो त्याच्या कायम लक्षात राहतो. या वेळेमध्ये केलेला व्यायाम निरोगी आयुष्य देतो.
सकाळी उठल्यावर आपण आपलं रुटिन सर्वोत्तम करायला हवं.how to do
1) सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या.
2) मेडिटेशन करा.
3) चांगली पुस्तके वाचा.
4) सकाळी मोबाईल पासून थोडंसं लांब राहा.
5) सकाळचा सूर्यप्रकाश घ्या, म्हणजे डॉक्टरांकडून व्हिटॅमिन D च्या गोळ्या नाही घ्याव्या लागणार.
Visit this video....डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
ज्या त्या वयात जर आपण आपल्या शरीराला चांगल्या सवयी नाहीत लावल्या, तर पन्नाशी नंतर आपल्या पाठीमागे शारीरिक व्याधी लागतात.त्यावेळी आपण कितीही पैसे खर्च केले, डॉक्टरांनी सांगितलेला व्यायाम केला तरी त्यावेळेला आपले शरीर आपल्याला साथ देत नाही. कारण आपण पहिल्यापासून आपल्या शरीराला चांगल्या सवयी लावलेल्या नसतात.
नंतर त्रास करुन घेण्यापेक्षा आत्ता पासूनच तुमच्या दिवसाची सुरुवात छान करा.याने तुमचा मेंदूची विचार क्षमता वाढेल. दिवसभरात तुम्हाला नवनवीन आयडिया सुचतील. तुमच्या कामामध्ये तुम्हाला प्रगती जाणावेल. काम करण्यासाठी उत्साह निर्माण होईल. आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही नेहमी स्ट्रॉंग राहाल.
थोडक्यात काय तर,
0 टिप्पण्या