जॉब, व्यवसाय, पैसा आणि आनंद

      आजच्या युगात जगायचं म्हणजे पैसा खूप महत्वाचा झाला आहे. प्रत्येकाचे पैसे कमवण्याचे मार्ग वेगवेगळे, कोणी जॉब करत, कोणी व्यवसाय तर कोणी शेती आणि मिळालेल्या पैशातून आपल्या दैनंदिन गरजा आपण पूर्ण करतो.

     पण कधी विचार केला आहे का? की आपण करत असलेल्या कामात आपल्याला आनंद किती मिळतो? आपण ते काम किती मग्न होऊन करतो? खरंतर आपण आपल्या गरजा एवढ्या वाढवून ठेवल्यात की आपली आवडनिवड जपण आपण विसरून गेलो आहोत. पैसे मिळवण्यासाठी माणूस हवं ते काम करायला तयार असतो. आणि हे सगळं कशासाठी तर जगाला दाखवण्यासाठी की मी किती छान आयुष्य जगतोय. जगाला देखावा करण्याच्या नादात माणूस स्वतःचा आनंद गमावून बसतोय.

     मग आता तुम्ही म्हणाल जगायला पैसा तर हवाय मग तो कमवायचा कसा?how to do

    पैसा कमवा पण तो तुमच्या आवडीच्या कामातून! पैशासाठी पडेल ते काम करून नको. चार पैसे कमी मिळतील पण ते काम करताना जो आनंद असेल ना तो लाखमोलाचा असेल.

    आपण ठरवायचं "पैसा महत्वाचा की आनंद"

   लोकांना दाखवण्यासाठी नको फक्त आपल्या आनंदासाठी पैसे कमवा. आणि तोही आपल्या आवडीच्या कामातून.how to do
   
   तुम्ही व्यवसाय जरी करत असला तरी तुमच्या आवडीचा व्यवसाय करायला लाजू नका. आजकालच्या पिढीची ना मानसिकता खूप वेगळी आहे. कुठल्याही कामाला सुरुवात करण्याआधी ही पिढी फक्त त्यातून नफा किती मिळेल यायचं विचार करते. थोडीशी मानसिकता बदला, तुमचा आनंद शोधा. माणूस म्हणून जन्माला आल्यावर तुम्ही कितीही पैसे कमवले तरी एक दिवस हे सगळं आहे तिथे ठेऊन जावं लागणार आहे. त्यामुळे मनुष्य म्हणून मिळालेला जन्म मला किती आनंदाने जगता येईल याचा विचार करा 

     तात्पर्य काय तर, पैसे किती मिळतील या पेक्षा मला मी करत असलेल्या कामातून आनंद किती मिळतोय हे बघा, बघा थोडासा विचार करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या