पैसे कमवण्याचे खूप मार्ग आहेत , जॉब,व्यवसाय, शेती वैगरे वैगरे. पण तुम्हाला माहित आहे का? जो मोबाईल आपल्या हातात दिवसभर असतो त्या मोबाईल वरून सुद्धा आपण घराबसल्या पैसे कमवू शकतो.how to do
आत्ता तुम्ही म्हणाल मोबाईल वरून पैसे ते कस शक्य आहे? शक्य आहे. तुमच्याकडे असलेल काही कौशल्य वापरून आपण पैसे कमावू शकतो.
1) ब्लॉगिंग
ब्लॉग लिहिणे हा प्रकार तुम्ही ऐकला असेलच.गुगल वरती जेव्हा आपण एखादा टॉपिक सर्च करतो तेव्हा त्यावर आपल्याला वेगवेगळ्या वेबसाईट वरती खूप सारी माहिती मिळते. तुम्हाला काय वाटत ती माहिती कुठून येते.
तर तो असतो ब्लॉग. म्हणजे एखादी व्यक्ती एक टॉपिक घेऊन त्यावर पोस्ट तयार करते आणि ती उपलोड करते. जेवढे जास्ती लोक त्या ब्लॉग ला व्हिजिट देतील त्यावर त्या ब्लॉग तयार केलेल्या व्यक्तीची कमाई सुरु होते
YouTube वरती थोडंसं सर्च केल्यानंतर आपल्याला ब्लॉग कुठे आणि कसा लिहावा,तो अपलोड कसा करावा याविषयी सगळी माहिती मिळते.आणि हे सगळं आपण आपल्या मोबाईल वरती करु शकतो तेही फ्री मध्ये.
2) इंस्टाग्राम
तुम्ही इंस्टाग्राम वरती ज्या रिल्स बघता ना त्या रिल्स तयार करुन सुद्धा तुम्ही कमवू शकता. फक्त तुमच्याकडे रिल्स साठी एक चांगला विषय आणि थोड्याश्या अकटिंग ची गरज आहे.
हेही वाचा......दहावी नंतर काय करावे?
0 टिप्पण्या