काहीतरी काम कराव हा विचार जेव्हा मनात येतो.तेव्हा आपण लगेच गुगल ओपन करतो आणि घरबसल्या मला कसे पैसे कमवता येतील याचा शोध घ्यायला लागतो.how to do
मग या लाईन वाचून आपण काही वेळ त्यांच्या जाळ्यात गुंततो. कारण घरबसल्या पैसा कोणाला नको असतो. आणि तेही दिवसातले फक्त दोन ते तीन तास काम करुन, कोणतेही टार्गेट नसताना.
पण हाच खरा गंभीर विषय आहे. कारण कोरोना काळात बऱ्याच जणांची नोकरी गेली आहे, बऱ्याच जणांचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे पैसे कमवण्यासाठी माणूस या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची मदत घेतो आणि फसतो.
हेही वाचा..... मोबाईलचा वापर करून आपण पैसे कसे कमवू शकतो?
आता ही फसवणूक होते कशी याच एक उदाहरणं.
तर एखादी व्यक्ती ऑनलाईन काम शोधतेय. मग त्या व्यक्तीला form filling चे काम दिसते. तिथे दिलेल्या नंबर वरती कॉल करुन ती व्यक्ती कामाविषयी पूर्ण माहिती घेते आणि काम सुरु करते. 800 फॉर्म भरल्यानंतर 16000 रुपये पेयमेंट स्वरूपात त्या व्यक्तीला मिळणार.आता या प्रोसेजर मध्ये 100 रुपयाच्या स्टॅम्प वरती त्या व्यक्तीबरोबर कॉन्ट्रॅक्ट केल जात. आणि तेही ऑनलाईन.
आता काम काय तर,
सात दिवसामध्ये 800 फॉर्म भरायचे. त्यासाठीचा डेटा इमेज स्वरूपात उपलब्ध असतो.आपण तो बघायचा आणि type करुन फॉर्म भरायचा.
आता यामध्ये अस सांगितलं जात की जर सात दिवसामध्ये 100% accuracy आली नाही, तर त्या काम करणाऱ्या व्यक्तीने 4000 रुपये भरायचे आणि पुढे 4 दिवस वाढवून घेऊन काम पूर्ण करायचे.
आता तुम्ही म्हणाल यात काय फसवणूक आहे. साधं सोप्प काम आहे की,
पण सुरुवातीला वरती सांगितल्या प्रमाणे तेवढीच माहिती दिली जाते. खरी गोष्ट ही आहे की या form filling च्या जॉब मध्ये 100% accuracy येतच नाही. कारण त्या डेटा मध्ये 2 ते 3 फॉर्म हे रिकामेच असतात.
मग सुरु होते खरी फसवणूक.
दिलेल्या वेळेमध्ये काम पूर्ण न झाल्याने त्या व्यक्तीला एक कॉल कॉल येतो.की तुम्ही आमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केल आहे आणि तुमचे काम पूर्ण न झाल्याने तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून 50,000 रुपये भरावे लागतील.नाहीतर तुमच्यावर केस केली जाईल.या भीतीला घाबरून ती व्यक्ती 50,000 रुपये भरते सुद्धा आणि इथेच होते फसवणूक.
त्याच प्रमाणे ऑनलाईन सर्च मध्ये आपल्याला data entry चे जॉब सुद्धा खूप प्रमाणात दिसतात. Without investment. घरबसल्या कमवा 20,000 ते 25,000 रुपये.
याच आकडेवारीला आपण फसतो. ज्यावेळी आपण या जॉब साठी रजिस्टर करायला जातो तेव्हा आपल्याकडून 1000 किंवा 2000 रुपये घेतात रजिस्टर फी म्हणून. आणि सांगतात की हे पैसे तुम्हाला तुमच्या पहिल्या सॅलरी बरोबर परत केले जातील.
पण तस काहीच होत नाही. एकदा पैसे भरल्यानंतर काम ही येत नाही आणि दिलेला कॉन्टॅक्ट नंबरही लागत नाही. इथे होते आपली फसवणूक.
आता या फसवणूकी पासून कसे वाचायचे?how to do
1) जिथून सहज पैसे मिळतात. ती कामे कधीच करायची नाहीत. उदा., form filling job, data entry job.
2) जर पैसे कमवायचे असतील तर काहीतरी स्किल शिका आणि त्याद्वारे चांगल्या कंपनी मध्ये apply करा.
3) ऑनलाईन पैसे कमवायचे असतील तर, शेअर मार्केट शिका, ब्लॉग लिहा, you tube च्या माध्यमातून कमवा, इंस्टाग्राम, फेसबुक च्या माध्यमातून कमवा.
4) कायम लक्षात ठेवा, जिथे सहज पैसा मिळतो तिथे धोका असतोच.
5) कष्ट करा, एखादा आवडीचा व्यवसाय सुरु करा. कष्टाचा पैसा हा खरा असतो आणि तो कायम टिकतो.
6) जर तुम्हाला वाटत असेल की तुमची फसवणूक होतेय तर बोलायला घाबरू नका. लगेच पोलीसांकडे जा. घरच्यांना सांगा. जो माणूस घाबरतो तो फसतच राहतो. नेहमी लक्षात ठेवा.
हेही वाचा.....इंस्टाग्राम, फेसबुक स्वतःच्या फायद्यासाठी वापरा
0 टिप्पण्या