विचारांची क्षमता

      माणूस जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा लहानपणी तो अगदी निरागस असतो. कुठल्याही गोष्टीची काळजी नाही, कुठल्या जबाबदारीच ओझं नाही, हसत खेळत त्याच बालपण निघून जात.

       तो जसजसा मोठा होत जातो ना तसा तो एका वेगळ्याचं विश्वात रमला जातो. माहित नाही का पण ज्या गोष्टींना काही अर्थच नसतो अश्या गोष्टींना तो महत्व द्यायला लागतो.हे असच का झालं! ते तसंच का होत! आणि माझ्या बाबतीतच का होत? अश्या अनेक विचारांमध्ये माणूस आपला वेळ खर्ची करतो. म्हणजे बघा ना! आपल्या एखाद्या कामात अपयश जरी आलं ना तरी आपण हा विचार नाही करत की माझे प्रयत्न कमी पडले असतील, आपण फक्त हा विचार करतो की माझं नशीबच खराब आहे, माझ्या बाबतीत काही चांगलं होतंच नाही.सगळं काही नशिबावर टाकून मोकळे होतो.


  माणसाचं मन स्वतःच्या बाबतीतही चांगला विचार करत नाही. "तुम्ही बघा ना, कधी तरी आपण एकटे बसलेलो असतो आणि विचार करत असतो स्वतःच्या बाबतीत. "किती वेळा आपल्या मनात स्वतःच्या बाबतीत चांगले विचार येतात?आणि किती वेळा आपण मन आपल्याला सांगत की तुझं सगळं काही नीट, चांगलं चाललेलं आहे? बघा कधी एकटे बसा आणि हा प्रयोग करा. 99% आपलं मन आपल्याला झालेल्या वाईट गोष्टींचा विचार करायला लावत. म्हणजे सगळं नीट जरी चाललेलं असलं तरी न मिळालेल्या गोष्टींच दुःख हे होतंच.आणि याला कारण म्हणजे आपलें विचार! ते म्हणतात ना दुसऱ्या विषयी चांगला विचार केला म्हणजे स्वतःच नेहमी चांगलं होत, पण मी म्हणेल' "आधी स्वतः विषयी चांगला विचार करा म्हणजे आपण ते कृतीत आणू आणि एक छान आयुष्य जगू".

हे करायचं कस,how to do

उदा,

 तुमच्या घरात जर कोणी कचरा आणून टाकला तर तुम्ही तो कचरा तुमच्या घरात ठेऊन घ्याल का? नाही ना. तसंच तुमच्या मनात नकारात्मक विचारांना जागा देऊ नका.

आता हे एवढं सोप्प नाहीये, पण ठरवलं तर अवघड सुद्धा नाहीये. आपल्या मनात नकारात्मक विचार केव्हा येतात.जेव्हा आपण निवांत बसलेले असतो. कधी निरीक्षण करा. जेव्हा आपण एखाद काम करतो, तेव्हा आपल्या मनात एकच विचार असतो की हे काम मला व्यवस्थित कस करता येईल. आणि आपण ते काम व्यवस्थित करतो सुद्धा. तसंच जेव्हा तुम्ही एकटे बसता तेव्हा विचार करा की मला माझ्या मनातील नकारात्मक विचार घालवण्यासाठी काय काय करावे लागेल. त्यासाठी you tube आहे, google आहे, search करा. किंवा घरातील व्यक्तींबरोबर याविषयी चर्चा करा. बोलण्यातून, चर्चेतून सुद्धा खूप मार्ग सापडत असतात.

हेही वाचा.....आपली प्रगती का होत नाही?

परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या. पॉसिटीव्ह विचार कोणते निगेटिव्ह विचार कोणते हे सुद्धा कळायला हवं.

उदा,

सहज रस्त्यावरून चालताना कोणीतरी त्रास देण्याच्या हेतूने तुम्हाला धक्का मारला तर तिथे आपली पॉजिटीव्हटी नाहीये दाखवायची. जर तुम्हाला कोणी त्रास देतोय आणि तुम्ही पॉजिटीव्ह विचार करुन शांत बसलात तर तो तुम्हीच तुमच्यावर केलेला अन्याय असेल.मला प्रत्येक वेळी पॉजिटीव्हच राहायचं आहे याचे प्रेशर घेऊ नका ते तुमच्या शरीराला घातक असेल.

पॉजिटीव्ह काय आणि निगेटिव्ह काय यातील फरक ओळखा.

how to do👇🏻

Visit this video.....पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी मधील फरक ओळखा


 तात्पर्य काय तर, माणूस जसा विचार करतो तसंच माणसाचं आयुष्य घडत. विचार चांगले करा,मी हे करु शकतो यावर विश्वास ठेवा. बघा काय बदल होतोय आयुष्यात.

     

हेही वाचा......जॉब, व्यवसाय, पैसा आणि आनंद





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या