तुमचं आयुष्य तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगता का?

खरंच आपण आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगतो का? माणूस जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत कशापद्धतीने आयुष्य जगतो?कधी हसत, कधी रडत, कधी कुटूंबाचा विचार करत, तर कधी आयुष्यात काय काय झालं, याचा विचार करत आयुष्य कस निघून जात कळतही नाही.
पण या सगळ्यात माणूस स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगायचे विसरून जातो.

म्हणजे लहान मुलं हे आईवडील सांगतील त्याप्रमाणे मोठे होत जातात . अर्थात आईवडील कधी चुकीचे सांगतच नाहीत. थोडे मोठे झाल्यावर शिकण्यात आणि स्वतःला आयुष्यात सेटल करण्यात काही वर्ष निघून जातात. सेटल झाले की घरचे लग्न लावून देतात. मग बायको, मुलं या सगळ्यात माणूस रमून जातो. त्यानंतर मुलांचे शिक्षण आणि त्यांना सेटल करण्यात तो स्वतःचा वेळ घालवतो. मग पन्नाशी त्यानंतर काही आजार पाठीमागे लागलेले असतात. खाण्याच्या बाबतीत मग पथ्य पाळावी लागतात. आणि एक दिवस माणसाचा अखेरचा दिवस येतो आणि तो शेवटचा श्वास घेऊन या जगाचा निरोप घेतो.


मग या सगळ्यात तो कधी स्वतःच्या मनाप्रमाणे जगला का? तर नाही.


आता स्वतःच्या मनाप्रमाणे जगणे म्हणजे काय?how to do


तर,

पहिले उदाहरणं,

लहान मुलं जेव्हा घरात पसारा करते तेव्हा आई लगेच ओरडते की पसारा करु नको, मी किती वेळा आवरायचं, मला एवढं एकच काम आहे का?

म्हणजे आईला घरातील काम असतें म्हणून ती मुलाला घरात पसारा करुन देत नाही. म्हणजे लहान मुलाला सुद्धा स्वतःच्या मनाप्रमाणे काही खेळता येत नाही.


दुसरे उदाहरणं,

कॉलेज मध्ये असताना वेगवेगळे पदार्थ खाण्याची किंवा वेगवेगळे कपडे घालायची खूप इच्छा असतें. परंतु बाबांनी जो पॉकेट मनी दिलेला असतो त्यातच महिना घालवायचा असतो. साहजिक आहे, कारण आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी आईबाबा स्वतःच्या इच्छेला आणि मनाला आवर घालत असतात.

परंतु दुसऱ्या मुलांचे राहणीमान पाहिले की आपल्या पण मनात येते की आपण सुद्धा आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी कराव्यात. मग आपण ठरवतो की जेव्हा मी कमवायला लागेल तेव्हा मला हवं ते सगळं काही करेल.


तिसरे उदाहरणं,

आयुष्यात सेटल झाल्यानंतर वय होत ते लग्नाचं. मग घरात आईला आणि बाबाला सून हवी असतें. तुमचा सुखाचा संसार पाहायचा असतो. लग्न झाल्यावर एक जबाबदारी वाढते. मुलं होतात आणि मग त्यांचे लाड आणि हट्ट पुरवण्यात आपला वेळ निघून जातो.

त्यानंतर आपण जगतो ते फक्त आपल्या मुलांसाठी. त्यांचं शिक्षण, त्यांचे लाड, त्यांची स्वप्न यातच आपलं जग असत.


हेही वाचा.....आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर हे करा.


चौथे उदाहरणं,

माणसाचं वय वाढल की तो स्वतःच्या काही इच्छा स्वतः पुरत्या ठेवतो. कारण तो विचार करतो आता आपलं वय झालं आहे. काही त्रास करुन घेण्यापेक्षा काही गोष्टींना आवर घातलेली बरी.

मग यामध्ये आहारावर कन्ट्रोल केल जात. कुठे फिरण्याची इच्छा मारली जाते. फ्रेंड सर्कल कामापुरता राहतो. जास्त बडबड नाही. कारण म्हाताऱ्या माणसाने केलेली बडबड फार कोणाला आवडत नाही म्हणून तो स्वतःच्या तोंडावर सुद्धा ताबा ठेवतो. आणि एक दिवस मरून जातो.


मान्य आहे की ज्या त्या वयात माणसाने आपली जबाबदारी पार पाडावी. पण तुम्ही कमवलेला पैसा जर तुम्ही स्वतःसाठीच खर्च नाही केला तर मग काय अर्थ आहे कमवण्याला.


आधी तुमच्या इच्छा पूर्ण करा. त्या ज्या वयामध्ये जे खावंसं वाटत ते खा. जिथे फिरावंसं वाटत तिथे फिरा. जिथे तुमची मत मांडावीशी वाटतात तिथे बोला. जबाबदारी ही प्रत्येकालाच असतें, पण त्या साठी स्वतःच मन मारून जगायची काहीच गरज नाही.

प्रत्येक माणसाला प्रत्येक वयामध्ये आवड निवड वेगळी असतें.

उदा,

1) 3 ते 9 वर्षाच्या मुलाला कॅटबरी, बिस्कीट, मॅगी, नूडल्स या सगळ्या खाद्यपदार्थाची आवड असतें.

2) 15 ते 25 वयोगटामध्ये मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड असतें. पिझ्झा, बर्गर या सगळ्या गोष्टी त्यांना खाव्याश्या वाटतात. कपडे, हेअर स्टाईल याबाबतीत एक वेगळी क्रेज असतें.

3) 28 ते 50 वयोगट. ह्या वयामध्ये जबाबदारी जास्त वाढते. या वयोगटामध्ये माणूस स्वतःला आवडणाऱ्या काही वस्तू फक्त दुकान्याच्या बाहेर उभारून बघत असतो. कारण घरी भाजीपाला न्यायचा असतो. महिन्याचा किराणा असतो, दूध बिल असतें, हॉस्पिटल खर्च असतो. मग स्वतःची आवड तो थोडी बाजूला ठेवते

4) पन्नाशी नंतर शरीर कोणत्या गोष्टीला साथ देत नाही. आणि काही खाल्ल तर पचतही नाही.



आपण जेव्हा आईसक्रीम खायला घेतो तेव्हा आपण ते वितळण्याच्या आधी खातो कारण वितळण्याच्या आधी आईसक्रीम खाण्यात मजा असतें. ते वितळल्यावर खाण्यात नाही. आयुष्याच सुद्धा तसंच आहे. जोपर्यंत शरीर साथ देत आहे तोपर्यंत मनाप्रमाणे सगळं काही करा. एकदा शरीराने साथ सोडली की काहीच उपयोग नाही.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या