मोबाईल बाजूला ठेऊन दिवसभरात तुम्ही तुमच्या मुलांना किती वेळ देता?

कोणत्याही जोडप्यासाठी मुलांची जबाबदारी म्हणजे एक जोखीम. आपल्या मुलांना काही कमी पडू नये म्हणून आपण वाटेल ते करायला तयार असतो. मुलं जे काही मागतील ते सगळं काही आपण त्यांना पुरवत असतो.

मुलं जन्माला आल्यापासून ते त्याच शिक्षण पूर्ण होईपर्यंत, मुलं त्याच्या आयुष्यात व्यवस्थित सेट होईपर्यंत आपण आपल्या मुलांच्या पाठीमागे ठामपणे उभे असतो.


Table of content






आता मुद्दा हा आहे की, मुलांना हवं ते दिल म्हणजे आपली जबाबदारी संपली का? तर तस नाहीये. मुलांना खरी गरज कशाची असतें तर,


आपल्या आईवडीलांचा वेळ.




आजकाल नवरा बायको दोघेही कामासाठी बाहेर असतात, मग मुलांना पाळणा घरात सोडले जाते, यात काही गैर नाहीये. परंतु कामावरून आल्यानंतर तुमच्या मुलांना तुम्ही वेळ देता का?आणि तो किती?

सोशल मीडियाच्या या जगात प्रत्येकाला फक्त दुसऱ्याच्या ऍक्टिव्हिटी बघायच्या असतात. परंतु शेजारी आपलं मुलं काय करतंय या कडे कोणाचेच लक्ष नसते. बरोबर ना. मुलांना खूप वाटते की आपल्या आईने किंवा बाबाने आपल्या सोबत खेळावे, छान गोष्टी सांगाव्यात. मुलं आपल्याकडे त्यासाठी हट्ट सुद्धा करत असतें. पण आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो.

हेही वाचा......लहान मुलांचा मानसिक ताण कसा कमी करावा?

"माझं काम आत्ताच झालाय, मला आराम करु दे, मी थकलेय, जा जाऊन तुझ्या खेळण्यांसोबत खेळ" अस सहज उत्तर आपण मुलांना देतो.

मोबाईल वरती तासतास घालवायला आपल्याकडे वेळ आहे, पण स्वतःच्याच मुलासाठी आपल्याकडे वेळ नाही ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. मान्य आहे की तुम्ही कामात असता, दमून जाता. ऑफिस मध्ये काम करुन, किंवा घरातील काम करुन परंतु एक लक्षात घ्या. काम हे आयुष्यभर आहे.मुलांचं लहानपण परत येणार नाही.

मग आता करायचं काय.......how to do


1) एक फिक्स टाईम ठरवा जो फक्त मुलांसाठी असेल.

दिवस भरात तुम्ही मुलांना कधी वेळ देऊ शकता ते ठरवा.ज्या आपण quality time म्हणू. मुलांना तुमचे 24 तास नको असतात. पण जो काही थोडा वेळ असेल तो पूर्णपणे मुलांसाठी असेल.


अस नको की, तुम्ही मुलांबरोबर खेळताय आणि कानात हेडफोन घालून गाणी ऐकत बसताय. मुलं लहान जरी असली तरी ते खूप निरीक्षण करत असतात. या quality time मध्ये टीव्ही बंद ठेवा, मोबाईल लांब ठेवा. फक्त मुलांबरोबर खेळा. मान्य आहे की लहान मुलांबरोबर खेळण्याची मानसिकता आपल्यात नसते. आपल्याला लगेच कंटाळा येतो. पण लक्षात ठेवा. तुम्ही पालक म्हणून आत्ता वेळ नाही दिला तर मुलं दुसरीकडे वेळ घालवण्यासाठी गोष्टी शोधतात. आणि याचंच परिणाम म्हणजे मुलं मोबाईलच्या खूप आहारी गेली आहेत.

नक्की वाचा..... लहान मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करावा?


2) तुम्हाला कंटाळा आलाय म्हणून मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका.

आपण काय करतो, जेव्हा आपलं मुलं त्याच्याबरोबर खेळण्यासाठी हट्ट करत असत, तेव्हा आपण त्याला मोबाईल देऊन त्यात गुंतवून ठेवतो... मग ते मुलं तासतास मोबाईल हातात घेऊन बसलेले असतें. म्हणजे आपणच आपल्या मुलांना मोबाईलची सवय लावून देतो.
जेव्हा तुमचे मुलं खेळण्यासाठी हट्ट करत असेल तर रिकाम्या वेळेत त्याच्याबरोबर खेळा.त्याला नवीन नवीन गोष्टी शिकवा. तुमच्या घरामध्ये असलेले कलर त्याला शोधायला लावा. वेगवेगळे आकार शोधायला लावा. यातून मुलांना शिकवूनही होईल आणि मुलांना वेळही देण होईल.

3) मुलांना झोपवताना मोबाईल हातात असणे.

बऱ्याच वेळेला आई मुलाला मांडीवर घेऊन झोपवत असतें आणि स्वतः हातात मोबाईल घेऊन बसलेली असतें. हे योग्य नाही. जर तुमच्या मांडीवर मुलं आहे तर त्याला छान गोष्ट सांगा.

                              how to do

 दिवसभरात त्याने काय काय केल हे त्याला विचारा.

तुम्ही मुलांना वेळ दिल्यामुळे ते तुमच्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करतात. त्यांच्याबरोबर काही चुकीचे होत असेल तर ते तुमच्या लक्षात येते.पण तुम्ही मुलांबरोबर वेळ काढून बोललाच नाहीत तर मुलं सुद्धा काही गोष्टी सांगायला घाबरतील. त्यामुळे जेवढं मुलांबरोबर बोलता येईल तेवढं बोला. ही सवय आजच्या काळात खूप महत्वाची आहे.

4) मुलांचे लहानपण एन्जॉय करा.how to do

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा


जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा लहान मुलांकडे बघून ही म्हण म्हणतो. खरच आहे. सगळं काही मिळत राहील, परंतु लहानपण कधीच परत येणार नाही. 

मुलं लहान आहेत तोपर्यंत त्यांच्यासाठी वेळ काढा. ती एकदा मोठी झाली की नवनवीन मित्र मैत्रिणी मध्ये रमून जातील. त्यांचं एक वेगळं आयुष्य सुरु होईल.तेव्हा तुम्हाला खूप वाटेल जी आपल्या मुलाने आपल्याजवळ बसावे, गप्पा माराव्यात पण तेव्हा त्यांच्या हातात मोबाईल असेल. कारण लहानपणापासून ते तुमच्या हातात मोबाईल बघत आलेत.


मुलांचं मन खूप निरागस असत. साधी सोप्पी अपेक्षा असतें की माझ्या आई बाबाने माझ्याबरोबर खेळावे, मला छान गोष्टी सांगाव्यात, माझ्याबरोबर बाहेर फिरायला यावे. मला गार्डन मध्ये घेऊन जावे.
मान्य आहे की या धावपळीच्या जीवनात हे सहज शक्य नाहीये, परंतु ठरवलं तर अवघड सुद्धा नाहीये. कारण तुमचा वेळ तुमच्या मुलासाठी आहे.शक्य तेवढा वेळ मुलांना द्या. ते सतत बडबड करत असेल तर रागावू नका. त्याला बोलू द्या. तुम्ही सुद्धा त्याच्या बोलण्याला प्रतिसाद द्या. आईवडील आणि मुलांमधील नातं यानेच तर घट्ट होत...बघा थोडासा विचार करा.


हेही वाचा......लहान मुलं व्यवस्थित खात नाही काय करावे?


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या