मुलांचा मानसिक ताण म्हणजे नेमेके काय? तर चला या विषयी जाणून घेऊ.
आता तुम्ही म्हणाल आम्ही तर आमच्या मुलांना खूप छान जपतो, त्यांचे हवे ते लाड पुरवतो, हवी ती गोष्ट लगेच आणून देतो मग अजून काय करायचं. मुलांना हवं ते देण म्हणजे त्यांचं पालनपोषण करणं अस नाही.
(मुलांचं लहानपण एन्जॉय करा हे लहानपण परत येणार नाही )
तर तुमच्या मुलांची मानसिक अवस्था जाणून घ्या.how to do
म्हणजे कधी निरीक्षण केल आहे का? आपली मुलं अचानच शांत होतात, एका जागेवर खूप वेळ बसून राहतात, काही मुलं अचानक खूप चिडचिड करायला लागतात, काही मुलं वस्तूंची फेकाफेकी करतात हे सगळं का होत? तर कारण आहे मुलांच्या मानसिक अवस्थेमध्ये होणारा बदल.
1) तुमचं मुलं तुम्हाला काहीतरी सांगत असत पण आपण फक्त हं हं हं करत असतो.
लहान मुलं काय सांगतायत हे ऐकायला शिका, त्याच्या विचारांना बोलण्याला उत्तर द्या,ते तुम्हाला काही सांगत असेल तर फक्त हं हं हं न करता तुम्हीही त्याच्याबरोबर बोला यामुळे मुलांना तुमच्याबरोबर सगळं काही शेअर करण्याची सवय लागेल. मग भविष्यात मुलांना तुमच्याबरोबर काही बोलायचं असेल, काही अडचणी असतील तर ते घाबरणार नाहीत की माझे आई बाबा मला रागावतील.
2) मुलांना सतत ओरडणे.
3) घरातील वादविवाद
वादविवाद हे प्रत्येक घरात असतात. काळजी फक्त एवढ्या गोष्टीची घ्यायची की ते वादविवाद मुलांसमोर होणार नाहीत. बऱ्याच वेळेला आपण वाद करत असताना वेगवेगळे अपशब्द वापरतो आणि लहान मुलं आपल्या समोर असतात. ते सगळ्या गोष्टींच निरीक्षण करत असतात. यादरम्यान मुलांची मानसिक स्थिती बिघडते. जे शब्द आपण मुलांसमोर वापरतो तेच शब्द मुलं शिकतात लक्षात ठेवतात आणि मग भविष्यात आपल्याला तेच शब्द ऐकायला मिळतात.त्यामुळे मुलांसमोर कौटुंबिक वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.
4) घरात एकमेकांचा आदर करणे.how to do
मुलांसमोर एकमेकांचा आदर करा.मुलांना कळू द्या की आपलें आई बाबा एकमेकांना मान देतात किंवा आज्जी आजोबाला मान देतात. ते एकमेकांना कधी ओडरत नाहीत. यामुळे काय होईल की मुलांना पण कळेल की नाती कशी जपायची आहेत. नात्यांच महत्व काय आहे.
0 टिप्पण्या