वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताय,परंतु वजन कमी होत नाहीये....मग नक्की वाचा.


बऱ्याच वेळेला खूप काही करुन सुद्धा आपले वजन आटोक्यात येत नाही. कितीही व्यायाम केला, आहारावर ताबा ठेवला तरी वजन आहे तेवढेच राहते. त्यात आपली अपेक्षा असतें कि माझे वजन पटापट कमी व्हावे तर असं होत नाही कारण वजन जेवढ्या गतीने वाढते त्याच्या उलट ते खूप मंद गतीने कमी होत असतें.


खूप प्रयत्न करुन सुद्धा वजन कमी का होत नाही?

वजन वाढण्याचे कारण ओळखा.

आपले वजन का वाढत आहे हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केले तरी काहीच फरक पडत नाही.

वजन का वाढते

1) स्त्रियांमध्ये मासिक पाळी वेळेवर न येणे.


एखाद्या बाईचे वजन अचानक वाढायला सुरुवात होते याचे कारण म्हणजे मासिक पाळीचे चक्र बिघडणे. ज्याला आपण PCOD असे म्हणतो.मासिक पाळी जर वेळेवर येत नसेल तर अचानक वजन वाढायला सुरुवात होते. मग अशा वेळेला आपण कितीही व्यायाम केला, डाईट केले तरी त्याचा काहीच फरक पडत नाही. या परिस्थितीमध्ये आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्याप्रमाणे उपचार करावेत.
अजून एक महत्वाचे म्हणजे मासिक पाळी मध्ये कमी प्रमाणात bleeding होणे. ही गोष्ट बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत होते परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि वजन वाढायला सुरुवात होते. कमी bleeding होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या. ते सांगतील त्याप्रमाणे उपचार घ्या.

2) थायरॉईडचा त्रास असणे.


थायरॉईडचा त्रास असलेल्या व्यक्तीचे वजन एकतर झपाट्याने वाढते नाहीतर झपाट्याने कमी होते. थायरॉईड झाल्यानंतर झपाट्याने वजन वाढणे हे थायरॉईड कमी होत असल्याचे लक्षण असतें. परंतु हे वाढलेले वजन आटोक्यात आणणे खूप अवघड जाते.
त्याचप्रमाणे थायरॉईड साठी चालू असणाऱ्या गोळ्यांनी सुद्धा बऱ्याच वेळेला वजन वाढते. शरीर सुस्त होते.सारखे झोपावेसे वाटते. त्यामुळे जर तुम्हाला थायरॉईड असेल आणि त्यासाठी तुम्ही ट्रेंटमेन्ट घेत असाल तर डॉक्टरांनी सांगितलेली पथ्य तंतोतंत पाळा. आहारावर नियंत्रण ठेवा आणि शरीराला व्यायामाची सवय ठेवा.

3) डिलेव्हरी झाल्यानंतर ( मुलं झाल्यानंतर ) वाढलेले वजन.


मुलं झाल्यानंतर वजन वाढणे ही नॉर्मल गोष्ट आहे. परंतु वाढलेले वजन लगेच कमी करण्याची घाई करु नका. जर डिलेव्हरी नॉर्मल असेल तर 4 महिन्यानंतर तुम्ही हळूहळू व्यायामाला सुरुवात करु शकता. आणि जर डिलेव्हरी
C- section द्वारा असेल तर 8 महिन्यापर्यंत व्यायाम करु नका. कारण C - section मध्ये पोटाच्या आतल्या लेयर कट केलेल्या असतात. ती जखम भरुन येण्यासाठी खूप वेळ लागतो. अशात जर आपण व्यायाम सुरु केला तर जास्त त्रास होतो.
मुलं जोपर्यंत आईचे दूध पीत आहे तोपर्यंत आईने डाईट करु नये. कारण आईच्या दुधातून मुलाला सगळे पोषण आणि ताकत मिळत असतें.मुलासाठी आपण सगळे काही खात राहावे. जेव्हा मुलं वरचे अन्न व्यवस्थित खायला सुरुवात करेल तेव्हा आईने डाईट सुरु करायला हरकत नाही.


4)  तासंतास एका जागेवर बसून काम करत राहणे.


कामानिमित्ताने आपण बऱ्याच वेळ एका जागेवर बसून राहतो. 8 ते 9 तास एका जागेवर बसून राहिल्यामुळे आपल्या पोटाची चरबी वाढायला सुरुवात होते. हिप्स वाढायला सुरुवात होतात. त्यात जर शरीराला व्यायामाची सवय नसेल तर वजन अजून पटापट वाढायला लागते. कामाच्या नादामध्ये जेवणाची वेळ बऱ्याच वेळेला चुकते. वेळेवर जेवण आणि नाष्टा न झाल्यामुळे आहार पचन होण्यास समस्या निर्माण होतात. काही वेळेला काम करत असताना चहा आणि कॉफीचे प्रमाण वाढते. त्यामुळे अति प्रमाणात कॅलरीज आपल्या शरीरात जाते.
त्यामुळे तुम्ही 8 ते 9 तास एका जागेवर बसून काम करत असाल तर सकाळी शरीराला व्यायामाची सवय ठेवा. जेवणाची वेळ पाळा. सकाळचा नाष्टा आवर्जून करा. अधून मधून उठून थोडंसं फिरा. त्यामुळे वजन आटोक्यात राहील.

5) वेळेवर झोप न घेणे.


माणूस मोबाईल च्या एवढा आहारी गेला आहे कि त्या मोबाईलच्या नादात आपल्या दिवसाच वेळापत्रक तो विसरून जातो. रात्री 1 ते 3 वाजेपर्यंत मोबाईल हातातून सुटत नाही आणि मग आपल्या शरीराला जेवढी झोप हवी आहे, तेवढी मिळत नाही. उशिरा झोपल्यामुळे दुसऱ्या दिवशी लवकर उठणे होत नाही. मग या सगळ्या दरम्यान शरीराला नाष्टा, जेवण ज्या वेळेमध्ये हव आहे त्या वेळेमध्ये मिळत नाही. एकूण काय या सगळ्याचा परिणाम शरीरावर होतो.
एखादी व्यक्ती खूप कमी प्रमाणात जेवण करते तरी सुद्धा त्या व्यक्तीचे पोट किंवा पूर्ण शरीर लठ्ठ झालेले असतें याला कारण म्हणजे अपुरी झोप.आपण वेळेवर झोपलो तरच दुसऱ्या दिवशी आपला दिनक्रम व्यवस्थित राहील.त्यामुळे झोपेचे वेळ निश्चित करा.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या