मुलं अभ्यास करायचं म्हटलं की कि्रकीर करतात, काय करावे?

लहान मुलांचा अभ्यास घेणे म्हणजे पालकांसाठी खूप मोठे जबाबदारीचे काम.मुलांना अभ्यास कर असे म्हटले की मुलांचा चेहरा पडलेला असतो. आणि त्यात जर आपला मुलगा एखाद्या विषयामध्ये कमी हुशार असेल, मार्क चांगले मिळत नसतील तर पालकांना टेन्शन येते ते वेगळेच.

प्रत्येक पालकांची अपेक्षा असतें की,माझ्या मुलाने प्रत्येक विषयात उच्च स्थानावर असावे. शाळेमध्ये कायम वरच्या स्थानावर असावे.
परंतु त्याने व्यवस्थित अभ्यास केला तरच त्याचे भविष्य चांगले होईल. म्हणजे अभ्यास करणे या शिवाय मुलांना पर्याय नाही.
पण मुलांना अभ्यास हा प्रकार नको वाटतो.... त्यांना असे वाटते दिवसभर शाळेत अभ्यास करायचा, घरी आलो की परत आई - बाबा अभ्यासाला बसवतात नाहीतर tuition ला पाठवतात. त्यामुळे मुलांच्या मनामध्ये अभ्यासाविषयी एक वेगळीच संकल्पना निर्माण झाली आहे.


आता या मध्ये पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे.त्यामुळे मुलांना समजून घेण्यासाठी पालक नेहमी पुढे राहिले पाहिजेत.

मग आता यामध्ये पालकांनी काय करायचे?

1) मुलांची मानसिकता समजून घ्या.how to do

तुमच्या मुलांना तुम्हीच चांगल्या प्रकारे ओळखत असता. मुलांना सतत अभ्यासासाठी किरकिर करु नका. तुमची मुलं सकाळी 11 पासून ते 4 किंवा 5 वाजेपर्यंत शाळेत असतात.
( प्रत्येक शाळेच्या वेळा ह्या वेगवेगळ्या आहे. ☝️ एक उदाहरणं म्हणून टाइम लिहिला आहे.)
त्यात काही पालकांनी मुलांसाठी सकाळच्या वेळेत काही tuition सुद्धा लावलेल्या असतात. आणि शाळेतून घरी आल्यावर परत होमवर्क आहेच.
म्हणजे तुमचे मुलं tuition, school, आणि homework या सर्कल मध्ये फिरत राहते.


हेही वाचा....मुलांचा मानसिक ताण कसा कमी करावा?

या चक्रातून मुलांना थोडंसं बाहेर काढा. अभ्यासाबरोबर मुलांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी कडे सुद्धा लक्ष द्या. शाळेतून घरी आल्यावर मुलांना त्यांच्या मित्र मैत्रिणी बरोबर खेळू द्या. जे जेवढे खेळतील तेवढे ते जास्त ऍक्टिव्ह राहतील. जर तुम्हाला त्यांचा फ्रेंड सर्कल व्यवस्थित वाटत नसेल तर तुम्ही मुलांसाठी वेळ काढून खेळा. या खेळामध्ये अभ्यास ही संकल्पना घेऊ नका. अभ्यास सोडून आपण काहीतरी वेगळं करतोय अस मुलांना वाटू द्या. त्यांचे खेळून झाल्यावर तुम्ही न सांगता मुलं स्वतःच्या मनाने अभ्यासाला बसतील.

2) अभ्यास ही संकल्पना मुलांना वेगळ्या पद्धतीने शिकवा.how to do

अभ्यास म्हटलं की मुलांच्या डोळ्यापुढे येते ते फक्त पेन,वही आणि पुस्तकं. आणि या वही पुस्तकांचाच मुलांना कंटाळा असतो. कारण दिवसभर ते या वही पुस्तकाच्याच सोबत असतात.
आता अभ्यास म्हणजे वेगळे काय, आणि कसे?
तर मुलांबरोबर नेहमी बोलत राहा की अभ्यास म्हणजे शाळेतून दिलेला होमवर्क नाही किंवा परीक्षेसाठी केलेले वाचन नाही.


तर अभ्यास म्हणजे, खेळ जो तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी बरोबर खेळत असता.

अभ्यास म्हणजे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आपण दिवसभरात करत असतो.

अभ्यास म्हणजे आपण जिथे राहतो तिथल्या आजूबाजूच्या वातावरणाची माहिती.

अभ्यास म्हणजे आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीची माहिती. या पृथ्वीवर असणाऱ्या जीवजीवांची माहिती.

अभ्यास म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या अवयवांची माहिती.

अभ्यास म्हणजे आपण रोज वापरत असणाऱ्या वस्तूंची माहिती, वाहतूक साधनाची माहिती.

☝️ हे तुम्ही मुलांना रोज सांगत राहिलात तर मुलांच्या मनातील अभ्यासाविषयीचा कंटाळा दूर होईल.

3) मुलांना जे करायला आवडत त्यावर फोकस करा.

या गोष्टी कोणतेही स्कूल नाही करु शकत.शाळेचं काम आहे. त्या त्या वर्गाचा अभ्यासक्रम शिकवणे. आणि मुलं एका वर्गातून दुसऱ्या वर्गात कसे जाईल हे पाहणे.
परंतु तुमच्या मुलांना काय करायला आवडते हे तुम्हालाच माहिती असतें. त्यासाठी मुलांना सपोर्ट करा.


जर मुलांना सिंगिंग ची आवड असेल तर मुलांना शिकू द्या.

जर मुलांना कोणत्या स्पोर्ट मध्ये आवड असेल तर मुलांना त्यासाठी सपोर्ट करा.

जर मुलांना कोणत्या art ची आवड असेल तर त्यासाठी मुलांना क्लासेस लावा.

त्यांना आवडणाऱ्या गोष्टीसाठी काय काय करावे लागेल याविषयी त्यांच्याशी चर्चा करा.

वही पुस्तकांचा अभ्यास हा तेवढ्यापुरातच ठेवा.

जर मुलांना डॉक्टर, इंजिनियर मध्ये आवड असेल तर तुमची मुलं त्यासाठी नक्कीच अभ्यास करतील. पण जर आवड नसेल तर त्यांना फ़ोर्स करु नका.

4) अभ्यास केल्याने काय होत.... आपलं आयुष्य कस बदलत. याविषयी मुलांबरोबर सतत चर्चा करा.how to do

आता एका वर्गातून दुसऱ्या वर्गामध्ये जाण्यासाठी थोडासा का असेना अभ्यास तर करावाच लागेल. आणि मुलांना टॉप करायचं असेल तर मग मात्र मेहनत घ्यावी लागेल.

रात्री जेवण झाल्यावर मुलांबरोबर गप्पा मारा. त्यांच्या भविष्याविषयी. त्यांना मोठेपणी काय व्हायचं आहे हे त्यांच्याकडून जाणून घ्या. बऱ्याच मुलांना कॅरिअर म्हणजे काय, पैसे कसे कमवायचे असतात हे 10 वी ते 12 वी नंतर कळते.

कारण पालकांचा आणि मुलांचा न होणारा संवाद.

पैसे कमवण्यासाठी पालक काम करत असतात. जॉब किंवा व्यवसाय यामध्ये पालक व्यस्त असतात. दिवसभर काम करुन थकल्यानंतर मुलांबरोबर बोलण्यासाठी मानसिक स्थिती राहिलेली नसते. त्यामुळे मुलांशी हवे तेवढे बोलणे होत नाही.


करिअर म्हणजे काय याविषयी मुलं माहिती घेण्यासाठी  गुगल चा आधार घेतात. ह्याला त्याला विचारत असतात. थोडासा वेळ काढून मुलांचा sarching प्लॅटफॉर्म तुम्ही बना.

मुलांना समजून घेण्यात आणि समजून सांगण्यात पालकांचा सहभाग कायम असावा. त्यामुळे मुलांना सुद्धा अभ्यासाविषयी आवड निर्माण होते. सतत अभ्यास कर, अभ्यास कर अशी चिडचिड मुलांना करु नका. मुलांचा अभ्यास करण्याचा एक टाईम फिक्स करा आणि तुम्ही त्यांच्या बरोबर बसा. त्यांना काही अडचणी येत असतील तर त्यासाठी मार्गदर्शन करा. मुलांच्या कलाने घ्या. मुलं नक्की अभ्यास करतील.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या