कमवलेले पैसे जातात कुठे?

 कमवलेले पैसे जातात कुठे? महिन्याचा पगार झाला की महिना संपायच्या आतच आपला खिसा रिकामा होतो.आणि आपण विचार करत बसतो पैसे खर्च झाले कसे? मी तर जास्त खर्चही करत नाही.

मग आता आलेले पैसे जातात कुठे हे शोधायचं कस?how to do

1) आपली कमाई लिहा.

तुम्ही महिन्याला किती कमवता हे एका डायरी मध्ये लिहून काढा. म्हणजे तुम्हाला त्या पैशाचे नियोजन करता येईल. आणि पैशाचा हिशोब ठेवण्याची सवयही लागेल.


हेही वाचा......आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर हे करा.

2) आवश्यक खर्च

आता या मध्ये जर,
1) तुम्ही भाड्याने घर घेऊन राहत असाल तर ते घराचे भाडे लिहा.
 2) आपल्याला घरात किराणा सामान किती लागते ते लिहा.
3) गाडीसाठी पेट्रोल किती लागते ते लिहा.
 4) दवाखाना, शाळा, कॉलेज अशा विविध ठिकाणी आपला आवश्यक खर्च किती होतो ते त्या डायरी मध्ये नोट करुन ठेवा.

3) अनावश्यक खर्च

बऱ्याच वेळेला आपली कमाई जास्त असली की आपण काही अनावश्यक खर्चाकडे जास्त जातो.
उदा,

 1) कपड्याने कपाट भरलेले असले तरी अजून नवनवीन फॅशन चे कपडे खरेदी करणे.

2) फूटवेअरचे जोड असले तरी अजून नवीन प्रकारचे फूटवेअर खरेदी करणे.

3) सतत बाहेरचे पदार्थ खाणे.

4) पार्टी अटेंड करणे.

5) वेगवेगळ्या गरज नसणाऱ्या महागड्या वस्तूंची खरेदी करणे.


हेही वाचा.......आपली प्रगती का होत नाही?

आपल्या कमाईचे जेव्हा आपण नियोजन करतो ना तेव्हा आपल्या लक्षात येते की आपला पैसे हा आवश्यक कामावर किती खर्च होतो आणि अनावश्यक गोष्टीवर किती खर्च होतो. आणि हे फक्त लिहून उपयोगाच नाही तर आपल्या कमाईचे मार्ग कसे वाढवता येतील याचाही विचार आपण केला पाहिजे. 

गुंतवणूक,how to do

आपली कमाई खिशात आल्याबरोबर आपला लागणारा खर्च बाजूला काढून पैसे योग्य ठिकाणी गुंतवले तर त्याचा उपयोग आपल्याला पुढे भविष्यात नक्कीच होतो. कमाईचा थोडासा हिस्सा का असेना आपण गुंतवून ठेवला पाहिजे. मग तो तुम्ही स्वतःसाठी गुंतवा किंवा तुमच्या मुलांसाठी. पण ही गुंतवणुकीची सवय तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अडचणीपासून सुरक्षित ठेऊ शकते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या